मेकअप करणे एक कला आहे. ज्यांना ही कला आत्मसात करायला आवडत असेल तर तुम्हाला मेकअपमधील अनेक बारकावे शिकणेही गरजेचे असते. मेकअपमध्ये अनेक प्रोडक्टस येतात. हे सगळे प्रोडक्ट वापरताना ते योग्य पद्धतीने वापरणे फारच गरजेचे असते. मेकअप लावण्याची एक विशिष्ट पद्धत असते. मेकअप लावण्यासाठी खास मेकअप ब्रश वापरण्यात येतात. असे मेकअप ब्रश तुमच्या मेकअप पाऊचमध्ये असायलाच हवे.पण असे करताना तुमचे बजेटही विचारात घेणे आवश्यक असते. म्हणूनच आम्ही तुमच्या बजेटमध्ये बसतील असे काही खास मेकअप ब्रश किट्स निवडले आहेत. जे तुमच्या बजेटमध्ये आहेत आणि वापरायलाही फारच सोपे आहेत. चला करुया सुरुवात
मेकअपच्या साहित्यांमध्ये अत्यंत नावाजलेली अशी Vega ही कंपनी आहे. जर तुम्हाला बजेटमध्ये आणि एकाच किटमध्ये तुम्हाला मेकअपसाठी वेगवेगळे ब्रश मिळतील. 9 ब्रशच्या सेटमध्ये तुम्हाला फाऊंडेशन ब्रश, ब्लशर ब्रश, मस्कारा ब्रश, आयशॅडो ब्रश, आयलायनर ब्रश, लिप फिलर, लिप लायनर ब्रश असे ब्रश मिळतात. जे फारच फायदेशीर असतात.
फायदे (Pros) : सलोन आणि घरगुती मेकअपसाठी या ब्रश किटचा फारच उपयोग होतो.
तोटे (Cons) : याची ग्रीप लाकडाची असल्यामुळे अनेकदा भिजल्यानंतर हा ब्रश सुकवणेही तितकेच महत्वाचे असते.
ब्युटी प्रोडक्टसाठी आणखी एक अग्रगण्य ब्रँड म्हणजे Body Shop. अगदी केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंत वेगवेगळे प्रोडक्टस मिळतात. यांचा मिनी किट हा तुमच्या रोजच्या मेकअपसाठी फारच फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही याचा उपयोग अगदी आरामात आणि सहजपणे करु शकता. हा एक मिनी मेकअप ब्रश किट असून यामध्ये एक फाऊंडेशन, आयशॅडो, कॉन्टोरिंग, लिपस्टिक ब्रश आणि परिपूर्ण मेकअपसाठी कन्सीलर आहे.
फायदे (Pros) : जर तुम्ही सतत प्रवास करत असाल आणि तुम्हाला मोठा मेकअप ब्रश किट कॅरी करणे शक्य नसेल तर तुम्ही हमखास हे कॅरी करु शकता.
तोटे (Cons) : काहींनी हे ब्रश कमी वाटतात. प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टसाठी हा किट फायद्याचा नाही. शिवाय चार ब्रशचा सेट असूनही याची किंमत खूप आहे.
मेकअपमध्ये मॅक ही एक अग्रगण्य कंपनी आहे. मेकअप किटमध्ये एखादा तरी Mac चा ब्युटी प्रोडक्ट असावा असे मेकअप शौकिनांना नक्कीच वाटते. प्रोफेशनल वापरासाठी मॅकचा हा मेकअप ब्रश सेट फारच चांगला आहे. तुम्हाला यामध्ये बरेच वेगळे पर्याय ही मिळू शकतील. फाऊंडेशन, आयशॅडो, आयलायनर, ब्लशर, लिपस्टिक असे 6 प्रकारचे ब्रश तुम्हाला यामध्ये मिळू शकतात परिपूर्ण मेकअप टिपांसाठी.
फायदे (Pros) : मॅकचे ब्रश हे वापरासाठी फार सोपे आणि सांभाळायला ही फार सोपे असतात.
तोटे (Cons) : किमतीचा विचार केला तर प्रत्येकाच्या खिशाला परवडतील असा हा ब्रश सेट नाही. त्यामुळे याची किंमत तुम्हाला खटकू शकते.
सेफोरा हे नाव देखील मेकअप विश्वासामध्ये फारच प्रसिद्ध आहे. या ब्रशची किंमत ही खूप जास्त असली तरी अनेक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट याचा वापर अगदी हमखास करतात. 10 ब्रशचा सेट असलेला हा प्रोफेशन मेकअर ब्रश किट यामध्ये तुम्हाला वेगवेगळे मेकअप ब्रश मिळतील. फाऊंडेशन, ब्लशर, स्पुली, आयलायनर, आयशॅडो आणि कॉन्टोरिंग असे वेगवेगळे ब्रश तुम्हाला यामध्ये मिळतील.
फायदे (Pros) : याची आकर्षक पॅकिंग आणि या ब्रशचा फिल छान आहे. हे ब्रश त्वचेवर अत्यंत चांगल्या पदंधतीने मेकअप लावण्यास मदत करते.
तोटे (Cons) : याची किंमत सर्वसामान्य मेकअप करणाऱ्यांसाठी खूप आहे. पण जर तुम्ही मेकअपचा उपयोग रोज करणार असाल तर तुम्हाला हा सेट परवडणारा नाही.
अगदी बजेटमध्ये बसतील आणि तुम्हाला सहजरित्या वापरता येतील असे हे द लॉरीअल पॅरिसचा मेकअप ब्रश सेट आहे.या मेकअप ब्रश सेटमध्ये तुम्हाला 5 ब्रश मिळतात. यामध्ये तुम्हाला ब्लशर, हायलाईटर, आयलायनर असे वेगवेगळे ब्रश दिसतील जे तुमच्या मेकअप किटला पूर्ण करतील.
फायदे (Pros) : किमतीच्या तुलनेत हा ब्रश एकदम बेस्ट आहे. अत्यंत कमी दारात तुम्हाला हे ब्रश मिळतात त्यामुळे तुमचे बजेट बिघडत नाही.
तोटे (Cons) : अनेकांना हे ब्रश फारसे आवडत नाही. कारण याचा फिल महागड्या ब्रशच्या तुलनेत फारसा चांगला नाही असे अनेकांना वाटते. पण तुम्ही ब्रश फार वापरत नसाल तर तुम्हाला हा ब्रश वापरण्यात काहीच हरकत नाही.
एखादा मेकअप ब्रश किट दिसायला सुंदर असेल तर तो आहे सिग्मा ब्युटीचा हा ब्रश कप सेट. याचे आकर्षक पॅकिंग याला इतर ब्रश सेटच्या तुलनेत अधिक चांगला बनवते. या मेकअप ब्रश सेटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींसाठी फायदेशीर असे मेकअप ब्रश मिळतात. जे वापरासाठी आणि ठेवण्यासाठी फारच सोपे असतात. मेकअप ब्रश किट उघडल्यानंतर याचे दोन कप्स होतात यामध्ये तुम्हाला ब्रश ठेवणे आणि शोधणे फार सोपे जाते.
फायदे (Pros): याचा सुंदर रंग आणि ब्रशची संख्या.. तुम्हाला बरेच ब्रश मिळतात. शिवाय ते ठेवणेही फार सोपे असते.
तोटे (Cons) : याची किंमत थोडीशी जास्तच आहे असे म्हणायला हवे.
मेकअपमध्ये कलरबारचेही नाव चांगलेच आहे. Colorbar मध्ये मिळणारा हा ब्रश किट 5 ब्रशचा सेट आहे. यामध्ये तुम्हाला आयशॅडो, ब्लशर, फाऊंडेशन, कान्टोरिंग, आयब्रोज ब्रश असे वेगवेगळे ब्रश यामध्ये तुम्हाला मिळतात.
फायदे (Pros) : याचे पॅकिंग आकर्षक आहे. ब्रश ठेवण्यासाठी तुम्हाला एक छान आकर्षक पाऊच मिळते जे तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता. शिवाय याची किंमतही अगदीच कमी आहे.
तोटे (Cons) : अनेक प्रोफेशनल आर्टिस्टना हे ब्रश मुळीच आवडत नाही. शिवाय अनेकांना हे ब्रश हाताळणे सोपे वाटत नाही.
इकोटुल्समध्ये तुम्हाला बजेटमध्ये चांगले ब्रश मिळतात. Ecotools चा हा 5 ब्रशचा सेट फारच चांगला आहे. लाकडाचे हँडल असलेला हा ब्रश सेट तुम्हाला एक छान ट्रेमध्ये मिळतो. यामध्ये फाऊंडेशन, आयलायनर, आयशॅडो, आयब्रोज, न्यूड लिपस्टिक असे महत्वाचे 5 ब्रश मिळतात. जे दिसायला आणि कामासाठी एकदम उत्कृष्ट आहे.
फायदे (Pros) : हे ब्रश दिसायला तर सुंदर आहेतच शिवाय ते बजेटमध्येही बसणारे आहेत. हा तुमच्या मेकअपप्रेमी मैत्रिणींसाठी चांगले गिफ्ट असू शकते.
तोटे (Cons) : याचे विशेष असे तोटे नाहीत. पण तरीही काहींना या ब्रशचा फिल आवडत नाही.
तुमच्या बजेटमध्ये बसणारा आणखी एक ब्रँड म्हणजे Basicare चा हा ब्रश सेट फारच फायदेशीर आहे. या ब्रश सेटमध्ये तुम्हाला आयशॅडो, लिप, ब्राओज, ब्लशर आणि शॅडोज लावण्यासाठी ब्रश तुम्हाला यामध्ये मिळतील. हे ब्रश फारच बजेट फ्रेंडली आहेत.
फायदे (Pros) : 500 रुपयांपेक्षाही कमी बजेटमध्ये तुम्हाला हे ब्रश मिळतात. तुम्ही फार मेकअप करत नसाल तर तुमच्यासाठी हा ब्रश किट फारच फायद्याचा आहे.
तोटे (Cons) : प्रोफेशल मेकअप आर्टिस्टसाठी हा मेकअप ब्रश फार फायद्याचा नाही. कारण अनेकांना हा ब्रश किट फार आवडलेला नाही.
जर तुम्ही खूप मेकअप करत असाल आणि तुम्हाला सातत्याने ब्रश लागत असतील तर तुमच्यासाठी PAC चा हा मेकअप ब्रश किट फारच उत्तम आहे. तुम्हाला या ब्रश किटमध्ये 14 वेगवेगळे ब्रश मिळतील. अगदी आयब्रोजच्या ब्रशपासून तुम्हाला यामध्ये फाऊंडेशन, आयब्रोज,आयशॅडो, कॉन्टोरिंग, ब्लशर, कॉन्टोरिंग, लिपस्टिक आणि अँग्युलर ब्रश मिळतात. हे ब्रश प्रोफेशन युजर्ससाठी फार महत्वाचे आहेत.
फायदे (Pros) : हा ब्रश सेट हा परिपूर्ण असा किट आहे. त्यामध्ये तुम्हाला सगळे ब्रश एकाच किटमध्ये मिळतात.
तोटे (Cons) : याची किंमत खूप जास्त आहे त्यामुळे अनेकांच्या बजेटमध्ये हा ब्रश किट बसत नाही.
हो मेकअप ब्रश घरी स्वच्छ करणे फारच सोपे असते. कोणताही माईल्ड सोप किंवा क्लिनझर घेऊन त्यामध्ये घालून ब्रश स्वच्छ करता येतात. ब्रश स्वच्छ करण्यासाठी खास लिक्वीडही मिळतात तुम्ही त्याचा उपयोग करुनही ब्रश स्वच्छ करु शकता. त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी न करता मेकअपब्रश स्वच्छ करु शकता.
जर तुम्ही स्वत:साठी मेकअप ब्रश वापरत असाल तर तुम्ही तुमचा मेकअप ब्रश 4-5 वापरानंतर धुतला तरी चालू शकतो. जर तुम्ही गडद रंगाचा वापर करत असाल तर मात्र पुढच्या वापराच्या वेळी तुम्ही ब्रश धुवायला हवा. ब्रश हा तुमच्या त्वचेच्या फार जवळ असतो. एखाद्या मेकअपमुळे तुम्हाला त्वचेसंदर्भात तक्रारी होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही शक्य असेल तेव्हा मेकअप ब्रश स्वच्छ करा.
फाऊंडेशन हा मेकअपचा बेस असतो. तो जर चेहऱ्याला नीट लावला तरच तुमचा मेकअप चेहऱ्याला नीट लागतो. शिवाय तुमचा हातही स्वच्छ राहतो. फाऊंडेशन लावण्यासाठी तुम्ही या ब्रशचा उपयोग केला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
जर तुम्ही मेकअप स्वच्छ करण्याचा विचार करत असाल तर सध्याच्या काळात काही चांगले व्हाईप्स आणि क्लिनर तुम्हाला कोरोनापासून वाचवू शकतील. त्यासाठी या उत्पादनाची खरेदी करा