प्रत्येक मुलीकडे लिपस्टिक तर असतेच आणि लिपस्टिक हे प्रत्येकाचे आवडते मेकअप उत्पादन आहे. महिलांना लिपस्टिक लावणं खूपच आवडतं. पण लिपस्टिक जितकी सुंदर ओठांवर दिसते, तितकीच वाईट शर्टावर लिपस्टिकचा डाग लागल्यावर दिसते. बऱ्याचदा अगदी प्रेमाच्या भरात ही लिपस्टिक मुलांच्या शर्टांवरही लागते. बऱ्याचदा बसच्या गर्दीत अथवा धक्काबुक्कीतही लिपस्टिकचा डाग शर्टाला लागण्याची शक्यता असते. लिपस्टिकचा डाग कितीही धुतला तरीही पटकन जात नाही असं म्हटलं जातं आणि आता शर्ट पुन्हा घालता येणार नाही असंही वाटतं. पण असं अजिबातच नाही. शर्टावर लिपस्टिकचा डाग लागल्यास, तुम्ही काही सोप्या टिप्स वापरून हा शर्टावरील डाग काढून टाकू शकता. आता तुम्हाला शर्टावर लिपस्टिकचा डाग लागल्यास, घाबरण्याची अजिबातच गरज नाही.आम्ही तुम्हाला सांगत आहोत ते उपाय तुम्ही करून पाहा आणि शर्टावरील डाग पटकन घालवा. त्यासाठी काय सोप्या टिप्स वापरायच्या जाणून घ्या.
शेव्हिंग क्रिम
Shutterstock
प्रत्येकाच्या घरात शेव्हिंग क्रिम तर असतंच. तुम्ही शेव्हिंग क्रिमच्या मदतीने लिपस्टिकचा डाग घालवू शकता. शर्टावर जिथे लिपस्टिकचा डाग लागला आहे त्यावर तुम्ही शेव्हिंग क्रिम लावा आणि हा भाग घासा अथवा हाताने स्क्रब करा. त्यानंतर काही वेळ शर्ट तसाच राहू द्या. नंतर हा शर्ट तुम्ही धुवा. तुम्हाला लिपस्टिकचा डाग शर्टावर दिसणार नाही. ही अतिशय सोपी आणि सहज पद्धत आहे.
हेअर स्प्रे
Shutterstock
तुमच्याकडे हेअर स्प्रे असेल तर शर्टावरील लिपस्टिकचा डाग घालविण्यासाठी तुम्ही याचाही उपयोग करून घेऊ शकता. शर्टावर ज्या ठिकाणी लिपस्टिकचा डाग लागला आहे तिथे तुम्ही स्प्रे करा आणि साधारण 15 मिनिट्स तसंच राहू द्या. त्यानंतर गरम पाणी घ्या आणि डाग असलेल्या ठिकाणी रगडा. मात्र शर्टाचे धागे निघतील इतका जोर लाऊ नका. डाग निघतील अशा पद्धतीने तुम्ही शर्ट रगडा. लिपस्टिकचे डाग निघून जातील.
कपड्यावरील डाग काढण्याचा होतोय त्रास, करा हे सोपे उपाय (How To Remove Stains From Clothes)
टूथपेस्ट
Shutterstock
कोणत्याही डागांवर टूथपेस्ट हा उत्तम उपाय आहे. शर्टावरील लिपस्टिकचा डाग हादेखील टूथपेस्टच्या वापराने जातो. डाग असणाऱ्या ठिकाणी तुम्ही टूथपेस्ट लावा. त्यानंतर हलक्या हाताने स्क्रब करा आणि पाच ते दहा मिनिट्स झाल्यावर पाण्याने शर्ट धुवा. लिपस्टिकचा डाग निघून गेलेला दिसून येईल.
सोप्या घरगुती उपायांनी घालवा कपड्यांवरील जिद्दी डाग
बेकिंग पावडर
Shutterstock
बेकिंग पावडरदेखील उत्तम पर्याय आहे. बेकिंग पावडर हे ब्लीचप्रमाणे काम करते. थोड्याशा पाण्यात बेकिंग पावडर भिजवून ठेवा. डाग लागलेल्या ठिकाणी हे बेकिंग पावडरची पेस्ट लावा. काही वेळ शर्ट तसाच राहू द्या. बेकिंग पावडर मुरू द्या. त्यानंतर शर्ट हलक्या हाताने रगडून धुवा. शर्टावरील लिपस्टिकचा डाग तुम्हाला निघून गेलेला दिसेल.
होळीच्या रंगाचे डाग कसे काढायचे, सोपी पद्धत
डाग काढताना घ्या काळजी
कपड्यांवरून डाग काढताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. डाग लागल्यावर जास्त वेळ तसाच ठेऊ नये. लवकरात लवकर हा कपडा धुवायला घ्यावा. डाग लागलेले कपडे फोल्ड करू नका नाहीतर तो डाग अन्य ठिकाणीदेखील लागण्याची शक्यता असते. डाग लागलेल्या ठिकाणी जोरात रगडू नका अन्यथा कपडा फाटण्याची भीती असते. हलक्या हाताने रगडूनच तुम्ही हा कपडा धुवा. वरील दिलेल्या गोष्टींचा वापर केल्यास, डाग जाण्यास मदत मिळेल.
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा