महिलांना वारंवार लघवी येणे यावर उपाय जाणून घ्या (Home Remedies For Frequent Urination)

महिलांना वारंवार लघवी येणे यावर उपाय

प्रत्येक स्त्रीचं वॉशरुममध्ये अथवा लघवीला जाण्याचे वेळपत्रक निरनिराळं असू शकतं. दिवसभरात कमीत कमी सहा ते सात वेळा लघवीला होणं हे अगदीच सामान्य आहे. मात्र यापेक्षा अधिक वेळा जर तुम्हाला लघवीला होत असेल किंवा रात्रीच्या वेळीही सतत लघवीला जावं लागत असेल तर तुम्हाला यावर उपाययोजना करण्याची नक्कीच गरज आहे. यासाठीच महिलांमध्ये आढळणाऱ्या या आरोग्य समस्येची कारणं आणि त्यावरील काही घरगुती उपचार जरूर जाणून घ्या. 

Table of Contents

  Shutterstock

  महिलांना वारंवार लघवीला होण्याची कारणे (Causes Of Frequent Urination For Women In Marathi)

  चुकीच्या सवयी, आरोग्य समस्या अथवा जीवनशैलीत अचानक झालेले बदल अशी अनेक कारणे यामागे असू शकतात. 

  अती पाणी पिणे (Drinking Too Much Water)

  जर तुम्हाला अती प्रमाणात पाणी अथवा पेय पिण्याची सवय असेल तर तुम्हाला वारंवार लघवीला होऊ शकतं. कारण शरीराला आवश्यक नसलेलं पाणी ते शरीराबाहेर टाकून देतं. तुम्ही दिवसभरात किती हालचाल करता, काय काम करता, कोणत्या वातावरणात राहता यावरून तुमच्या शरीराला किती पाण्याची गरज आहे हे ठरत असतं. त्यामुळे जर तुम्हाला वारंवार लघवीला येणे होत असेल तर तुम्ही अती प्रमाणात पाणी पित आहात का हे तपासून पाहा.

  Shutterstock

  अल्कोहोल आणि कॅफेन जास्त प्रमाणात घेणे (Excessive Consumption Of Alcohol)

  जर तुम्ही वारंवार मद्यपान करत असाल किंवा सतत कॅफेनयुक्त पेय घेत असाल तरी तुम्हाला वारंवार लघवीला होण्याचा त्रास जाणवू शकतो. जर तुम्हाला हा त्रास जाणवत असेल तर मद्यपान आणि कॅफेनयुक्त पेयांचे सेवन कमी करा.

  युरिनरी ट्रॅक इनफेक्शन (UTI) असणे (Urinary Tract Infection)

  महिलांना त्यांच्या आयुष्यात एकदा तरी या इनफेक्शनला सामोरं नक्कीच जावं लागू शकतं. याचं कारण सार्वजनिक शौचालय वापरणं, सेक्स करताना सुरक्षेची काळजी न घेणं, मासिक पाळी दरम्यान अस्वच्छता राखणं अशा अनेक गोष्टींमुळे हे इनफेक्शन होऊ शकतं. त्यामुळे जर तुम्हाला वारंवार लघवीला होत असेल तर त्याचे कारण काय ते डॉक्टरकडे जाऊन तपासून घ्या. 

  वाचा - फंगल इनफेक्शनचे प्रकार आणि नैसर्गिक उपाय

  Shutterstock

  व्हजानल इनफेक्शन (Vaginal Infection)

  व्हजानल इनफेक्शनमुळे तुमचा योनीमार्ग अथवा व्हजायनाचा भाग सूजतो आणि तिथे जळजळ होते. हे इनफेक्शन होण्याचीही अनेक कारणं असू शकतात. मात्र जळजळ, खाज आणि दाह यासोबतच यामुळे तुम्हाला वारंवार लघवीला होण्याची शक्यता असते. 

  मूतखडा अथवा किडनी स्टोन (Kidney Stone In Marathi)

  मूतखडा साधारणपणे नैसर्गिक पद्धतीने तुमच्या मूत्राशयामध्ये निर्माण होतो. बऱ्याचदा हा त्रास पुरूषांना जाणवतो मात्र कधी कधी महिलांनाही होण्याची शक्यता असते. मूतखडा झाल्यामुळे तुम्हाला वारंवार लघवीला होऊ शकतं. कारण यामुळे मूत्रमार्गात अडथळा निर्माण झाल्यामुळे एकाच वेळी मूत्रविसर्जन व्यवस्थित होऊ शकत नाही. 

  प्रेगनन्सी (Pregnancy)

  गरोदरपणात महिलांच्या गर्भाशयाच्या आकारात वाढ झाल्यामुळे त्यांच्या मूत्राशयावर याचा ताण निर्माण होतो. ज्यामुळे त्यांना सतत लघवीला जावे लागते. प्रेगनन्सीमधील ही एक सामान्य समस्या आहे. यासाठी कोणत्याही औषधउपचारांची गरज नसते. कारण बाळंतपणानंतर हा त्रास कमी होऊ शकतो. 

  Shutterstock

  मेनोपॉज (Menopause)

  रजोनिवृत्ती अथवा मेनोपॉज हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यात येणारा एक टप्पा आहे. या काळात महिलांच्या शरीरात होणाऱ्या हॉर्मोनल बदलांमुळे त्यांच्या शरीरात अनेक बदल जाणवतात. वारंवार लघवीला होणं हा त्याचाच एक भाग असू शकतो. अशा महिलांना रात्रीच्यावेळी लघवीला जाण्याची समस्या जास्त प्रमाणात आढळते. 

  योनीमार्गाचे स्नायू सैल पडणे (Loosening Of Vaginal Muscles)

  मूत्रमार्गातून मूत्र बाहेर पडण्यासाठी योनीमार्ग आणि  मूत्रमार्गाजवळील अनेक स्नायू कारणीभूत असतात. जेव्हा वय, गरोदरपण, बाळंतपण अशा काही कारणांमुळे योनीमार्गाचे स्नायू सैल पडतात तेव्हा मूत्र विसर्जनावरील ताबा कमी होतो. ज्यामुळे अशा महिलांना सतत लघवीला जाण्याची गरज लागते. 

  ताणतणाव आणि चिंताकाळजी (Stress And Anxiety)

  कधी ताणतणाव, चिंताकाळजी, उदासिनता, नैराश्य या गोष्टीही यासाठी कारणीभूत असू शकतात. कारण मनातील चिंताचा तुमच्या संपूर्ण शरीरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला वारंवार लघवीला होत असेल तर यामागे तुमच्या कामाची शैली, ताण, घरच्या जबाबदाऱ्या, मुलांची काळजी या गोष्टी कारणीभूत असू शकतात.

  Shutterstock

  मधुमेह (Diabetes)

  सतत आणि वारंवार लघवीला होण्यामागे टाईप 1 आणि टाईप 2 असे दोन्ही मधुमेहाचे प्रकार कारणीभूत असतात. कारण या आजारांमुळे तुमच्या मूत्राशयात जास्तप्रमाण मूत्राची निर्मिती होते. जेव्हा तुमच्या रक्तात अती प्रमाणात साखरेची पातळी वाढते तेव्हा शरीर ते बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे जर तुम्हाला सारखं लघवीला होत असेल तर तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता असू शकते. मधुमेहाचे हे प्राथमिक लक्षण आहे हे लक्षात ठेवा. 

  वारंवार लघवीवर घरगुती उपाय (Home Remedies For Frequent Urination In Marathi)

  काही घरगुती उपचार करून तुम्ही तुमची ही आरोग्य समस्या कमी करू शकता. 

  लघवी रोखून धरू नका (Don't Hold Urine)

  जर तुम्हाला वारंवार लघवीला होत असेल तर यावर करण्यासारखा सर्वात महत्वाचा प्राथमिक उपाय म्हणजे लघवी रोखून ठेवू नका. जेव्हा जेव्हा लघवीला जाण्याची ईच्छा होईल तेव्हा लघवीला जा. लघवीला जाणे टाळण्यामुळे तुमचा त्रास अधिकच वाढू शकतो. दर दोन ते तीन तासांनी तुम्हाला लघवीला जाणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही लघवीला जाणे टाळता तेव्हा मूत्राशयात लघवी साठून राहिल्यामुळे बॅक्टेरिआ निर्माण होतात. 

  Shutterstock

  व्हिटॅमिन सी युक्त पदार्थाचे सेवन करा (Eat Food Rich In Vitamin C)

  व्हिटॅमिन सी आहारात मुबलक असेल तर तुम्हाला या समस्येपासून सुटका मिळू शकते. कारण व्हिटॅमिन सीमुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढते ज्याचा महिलांना या आरोग्य समस्येशी लढण्यासाठी फायदा होऊ शकतो. यासाठीच आहारात आंबट फळे, भोपळी मिरची, ब्रोकोली अशा गोष्टींचा समावेश करा. 

  Shutterstock

  कॅनबेरीचा बिनसाखरेचा ज्यूस प्या (Drink Cranberry Juice)

  कॅनबेरी या बेरीजचा रस हा या समस्येवरील एक चांगला घरगुती उपाय आहे. या ज्यूसमुळे तुम्हाला युरिनरी ट्रॅक इनफेक्शनचा धोका टाळता येऊ शकतो. कॅनबेरीमध्ये असे काही घटक असतात ज्यांच्यामुळे जंतूसंसर्ग रोखणे सोपे जाते. चांगल्या परिणामासाठी या रसात साखर घालणे टाळा. 

  भोपळ्याच्या बियांचा आहारात समावेश करा (Pumpkin Seeds)

  भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. शिवाय यामध्ये अॅंटि इनफ्लैमटरी घटक असतात ज्यामुळे तुमच्या शरीरातील दाह कमी होतो. एका संशोधनानुसार भोपळ्याच्या बियांचा आहारात समावेश केल्यामुळे युरिनरि ट्रॅक इनफेक्शन अथवा त्यासंबधीत आजार बरे होऊ शकतात. 

  Shutterstock

  तीळ आणि गुळ खा (Eat Sesame And Jaggery)

  तीळाचा वापर केल्यामुळे तुम्हाला या समस्येपासून नक्कीच सुटका मिळू शकते. तिळामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स आणि पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या मूत्राशयाचे कार्य सुधारण्यात मदत होते. जर तुम्हाला वारंवार लघवीला होत असेल तर तीळ आणि  गुळ मिक्स करा आणि दिवसातून दोनदा घ्या. संक्रातीला आपण तिळगूळ वाटतो ती एक प्रथा नसून ते तुमच्या आरोग्यासाठीही उत्तम असते. 

  आवळ्याचा रस प्या (Drink Amla Juice)

  आवळ्यामुळे मूत्राशय स्वच्छ होते आणि मू्त्राशयातील स्नायू मजबूत होतात. सहाजिकच यामुळे तुम्हाला तुमच्या मूत्रपिंडावर नियंत्रण ठेवता येते. चांगल्या परिणामासाठी आवळ्याचा रस मधासोबत घ्या. आवळ्याचा रस आणि  पिकलेली केळी दिवसातून दोनदा अथवा तीनदा खाण्यामुळेही तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. 

  Shutterstock

  तुळशीची पाने चघळा (Chew Basil Leaves)

  कधीकधी मूत्रमार्गातील इनफेक्शमुळे तुम्हाला वारंवार लघवीला होतं. अशावेळी तुळशीच्या पानांचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. कारण तुळशीच्या पानांच्या रसामुळे तुमचे इनफेक्शन कमी होऊ शकते. यासाठी सकाळी उठल्यावर दोन ते तीन तुळशीची पाने चुरडून त्याचा रस मधासोबत घ्या.

  रीठाचा रस प्या (Drink Spinach Juice)

  रीठा फक्त केसांसाठी अथवा स्वच्छतेसाठीच उपयुक्त आहेत असं नाही. रीठाचा वापर करून तुम्ही तुमची वारंवार लघवीला होण्याची आरोग्य समस्याही दूर करू शकता. यासाठी रात्री ताज्या रीठा भिजत ठेवा आणि सकाळी अनोशीपोटी अथवा उपाशीपोटी त्याचा रस प्या. आठवड्यातून एकदा हा उपाय करा आणि वारंवार लघवीला होण्याची समस्या दूर ठेवा. 

  Shutterstock

  जिऱ्याचं पाणी नियमित प्या (Drink Cumin Water Regularly)

  जिऱ्यामुळे महिलांमध्ये युरिन इनफेक्शन नक्कीच कमी होऊ शकते. यासाठी चमचाभर जिरे कपभर पाळण्यात उकळून घ्या. पाणी आटून अर्धे झाले की थंड करून ते प्या. यात थोडं मध टाका आणि दिवसातून दोनदा घ्या.

  आहारात प्रोबायोटिकचे प्रमाण वाढवा (Increase Probiotics In Life)

  प्रोबायोटिक्समुळे तुमच्या आतड्यांना आवश्यक असणारे पोषक सूक्ष्मजीव तुम्हाला आहातून मिळतात. ज्यामुळे तुमचे आरोग्य सुधारते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते. आजकाल प्रोबायोटिक्स सप्लीमेंटच्या स्वरूपात बाजारात मिळतात. मात्र तुम्ही दही, लोणचे, पोहे अशा काही अन्नपदार्थांतूनही ते मिळवू शकता. यासाठी आहारात प्रोबायोटिक्स असतील याची काळजी घ्या. 

  ओटीपोटाला हॉटबॅगने शेकवा (Soothe Stomach Pain With Hotbag)

  मासिकपाळीतील इनफेक्शन अथवा इतर काही इनफेक्शनमुळे तुम्हाला वारंवार लघवीला होत असेल तर हा उपाय जरूर करा. ओटीपोटावर कोमट केलेले कोणतेही नैसर्गिक तेल लावा आणि हॉटबॅगने तो भाग शेकवा. ज्यामुळे तुमची पोटदुखी कमी होईल. हा उपाय केल्यामुळे इनफेक्शन कमी होईल आणि लघवीला होणेदेखील थांबेल 

  Shutterstock

  किगल व्यायाम करा (Exercise Regularly)

  योगीमार्ग आणि मूत्रमार्गाचे स्नायू मजबूत करण्यासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे. बाळंतपणानंतर आणि इतर काही कारणांनी आलेली योनीमार्गाची शिथिलता यामुळे कमी होते. यासाठी लघवी रोखल्याप्रमाणे काही सेंकदासाठी योनीमार्गाचे स्नायू ताणून ठेवा. एकावेळी कमीत कमी पाचवेळा असे पाच सेंकदासाठी स्नायू ताणून ठेवा. दिवसभरात दहा वेळा तुम्ही हा व्यायाम करू शकता. व्यायाम करत असताना तुमचा श्वास मंद गतीने सुरू ठेवा. शिवाय पोट, मांड्या, नितंब ताणून नका. तुम्हाला फक्त तुमच्या योनीमार्गाचे स्नायू रोखून ठेवायचे आहेत. 

  महिलांना वारंवार लघवीला होण्याबाबत मनात असलेले प्रश्न - FAQ's

  1. वारंवार लघवीला होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे का ?

  होय, कारण वारंवार लघवीला होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. तुम्हाला युरिनरी भागात अथवा योनीमार्गात कोणते इनफेक्शन झाले आहे का हे डॉक्टर तपासून सांगू शकतात. ज्यामुळे उपचार करणे सोपे होते. 

  2. रात्रीला लघवीला होणे थांबवण्यासाठी काय करावे ?

  रात्री झोपल्यानंतर जर तुम्हाला वारंवार लघवीला होत असेल तर झोपण्यापूर्वी दोन तास आधी पाणी अथवा काहीही खाणे टाळा. झोपण्यापूर्वी लघवीला जाणे लक्षात ठेवा. ज्यामुळे झोपल्यावर लघवी झाल्यामुळे तुमची झोपमोड होणार नाही.

  3. घरगुती उपचारांमुळे बरे वाटले नाही तर काय करावे ?

  जर वर दिलेल्या कोणत्याही घरगुती उपचारांनी तुम्हाला बरे वाटत नसेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.