ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
Makeup Hacks: डल मेकअप रिफ्रेश करण्याच्या सोप्या टिप्स

Makeup Hacks: डल मेकअप रिफ्रेश करण्याच्या सोप्या टिप्स

मेकअप करणं महिलांना आवडतंच. पण मेकअप केल्यानंतर काही वेळातच मेकअप डल होऊ लागतो अर्थात चेहऱ्यावरील मेकअप कमी होतो. सकाळी मेकअप केला असेल तर साधारण दुपारपर्यंत चेहऱ्याचा मेकअप उतरू लागतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संध्याकाळी पार्टीला जायचं  असेल तर पुन्हा मेकअप करणं सोपं नाही. सकाळी केलेला मेकअप जेव्हा डल होतो तेव्हा तुम्ही पुन्हा मेकअप करण्यापेक्षा तोच मेकअप रिफ्रेश करू शकता. पण बऱ्याच जणांना हाच मेकअप कसा रिफ्रेश करायचा याची माहिती नसते. कोणत्याही कार्यक्रमाला जाताना कोणते फेस मेकअप प्रॉडक्ट्स वापरायचे याचीही माहिती हवी. तीच माहिती आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुम्हाला वेळ नसेल तर पटकन 5 मिनिट्समध्ये कशाप्रकारे डल मेकअप रिफ्रेश करायचा याच्या सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत. तुम्ही याचा वापर करून नक्कीच पुन्हा एकदा नव्या मेकअपप्रमाणे सुंदर आणि ताजेतवाने दिसू शकता. जाणून घेऊया काय आहेत या सोप्या टिप्स. 

फाऊंडेशन

Shutterstock

चेहऱ्यावर फाऊंडेशन अथवा बीबी क्रिम लावल्यास, काही तासातच मेकअप डल होऊ लागतो. पावसाळ्याच्या दिवसात तर हा मेकअप काही वेळच टिकतो. मेकअप रिफ्रेश करण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर स्पंजच्या मदतीने फाऊंडेशन लाऊ शकता. स्पंज ओला करून घ्या. ओल्या स्पंजमुळे चेहऱ्यावर मेकअपचा वापर कमी होतो. तसंच तुम्हाला तुमची त्वचा अधिक चमकदार दिसून येते. तुम्ही अधिक रिफ्रेश दिसता.

ADVERTISEMENT

मेकअप किटमधील concealer चा असा करतात उपयोग

काजळ

Shutterstock

बऱ्याचदा सर्वात पहिल्यांदा चेहऱ्यावरील मेकअपमधील डोळ्यांना लावलेले काजळ निघून जाते. त्यामुळे मुळात अशा काजळाचा वापर करा जे किमान 8 तास टिकेल. पण तरीही तुम्हाला जास्त घाम येऊन काजळ जात असेल तर तुम्ही पुन्हा एकदा मेकअप अर्थात टचअप देताना काजळाचा एक स्ट्रोक डोळ्यांना लावा. डोळ्यांना थोडं जाडसर काजळ लावल्यास, पटकन निघत नाही हे लक्षात ठेवा. केवळ काजळ आणि लिपस्टिक लाऊनही तुमचा चेहरा अधिक रिफ्रेशस दिसू शकतो. त्यामुळे हे दोन साहित्य तुम्ही नेहमी तुमच्या पर्समध्ये ठेवायलाच हवे. 

ADVERTISEMENT

परफेक्ट मेकअपसाठी जाणून घ्या 5 सोप्या टिप्स

ब्लशर

Shutterstock

मेकअप रिफ्रेश करण्यासाठी तुम्ही ब्लशर लाऊ शकता. ब्लश तुम्ही गालाला लावा. यामुळे तुमचा डल मेकअप जाऊन तुमचा चेहरा चमकदार आणि सुंदर दिसेल. तसंच तुम्हाला अति मेकअपही करावा लागणार नाही. ब्लशर तुम्हाला अधिक तजेलदार चेहरा दाखवण्यास मदत करतो. तसंच ब्लशर लावल्याने गालावर चमक येते आणि तुमचे गालही उठावदार दिसतात. 

ADVERTISEMENT

हायलाईटर

Shutterstock

मेकअप रिफ्रेश करण्यासाठी तुम्हाला अजून एक चांगला पर्याय आहे तो म्हणजे हायलाईटर. हायलाईटरचा वापर तुम्ही चेहऱ्याच्या हाय पॉईंटवर करा. गालावर व्यवस्थित पॉईंटरवर तुम्ही चेहरा रिफ्रेश करण्यासाठी हायलाईटर लावा. अति हायलाईटर वापरू नका. हे वापरताना योग्य ब्रशचा वापर करा. हायलाईटर लावल्याने चेहऱ्यावर एक वेगळीच चमक मिळते. 

मेकअप करताना असा करा टिश्यू पेपरचा वापर

ADVERTISEMENT

गडद लिपस्टिक

Shutterstock

डल झालेला मेकअप रिफ्रेश करण्यासाठी ओठांवर गडद लिपस्टिकचा वापर करू शकता. ब्राईट अर्थात गडद लिपस्टिक ओठांवर लावल्याने तुमचा चेहरा अधिक फ्रेश दिसतो. तुमचा चेहरा डल दिसत असल्यास, मेकअपमधील इतर कोणतंही साहित्य वापरण्यापेक्षा गडद लिपस्टिक वापरली तरीही फायदेशीर ठरते. ब्राईट रंगात तुम्ही लाल, फुशिया पिंक (गुलाबी), मजेंडा या रंगाचा वापर करू शकता.  तसंच तुम्ही चॉकलेटी रंगाचाही वापर करू शकता. 

महागड्या मेकअप प्रोडक्टसाठी बजेट फ्रेंडली पर्याय (Best Makeup Dupes In Marathi)

ADVERTISEMENT

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

14 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT