लॉकडाऊनमुळे सध्या गेले पाच महिने बरेच जण घरातूनच काम करत आहेत. अशावेळी घरात असल्यामुळे सतत काही ना काहीतरी खायला हवं असतं आणि आपण बरंच खातही आहोत. पण यामुळे घरबसल्या वजन वाढण्याचा धोका अधिक वाढला आहे. आधी केवळ भूक लागल्यावरच खाणं पोटात जायचं. पण आता बऱ्याचदा वेळफळं जात नाही म्हणूनही खाल्लं जातं. मग अशावेळी नक्की काय खायचं? घरबसल्या खूप खात असलात तर पौष्टिक आणि लो कॅलरीचे कोणते पदार्थ खावेत याबद्दल आम्ही जाणून घेतले आहे मेयेर विटाबायोटिक्स अँड फिटनेस अँन्ड न्यूट्रिशन तज्ज्ञ आणि उपाध्यक्ष असणारे डॉ. रोहित शेलटकर यांच्याकडून. या लेखातून त्यांनी आपल्या आहारामध्ये अशा कोणत्या पदार्थांचा समावेश केल्यास, वजन वाढणार नाही आणि तब्बेतीची काळजी घेतली जाईल याबद्दल सांगितले आहे. तसंच शरीराला योग्य पोषण मिळून हेल्दी खाणं तुमच्या पोटात जाईल याची कशी काळजी घ्यायची आणि काय खायचं यासाठी महत्त्वाच्या टिप्स
तुम्हाला जेव्हा काही गोड खावंसं वाटत असेल तेव्हा चॉकलेट अथवा मिठाईच्या ऐवजी तुम्ही फायबरयुक्त फळांची निवड करा. लिची, प्लम, पीच, चेरी अशी फळं तुम्ही अशावेळी खा. तुम्हाला यातून फायबर मिळेल आणि मिठाईतून शरीरात जाणारी साखर शरीरात न जाता नैसर्गिक साखर पोटात जाईल आणि पोटही भरलेले राहील. त्यामुळे तुम्हाला अशावेळी खावंसं वाटेल तेव्हा अशी फळंच खाल्ली जातील याकडे लक्ष द्या.
बऱ्याचदा आपण तोंड चाळवलं की तळलेल्या वेफर्सकडे मोर्चा वळवतो. पण त्याऐवजी तुम्ही बेक केलेले वेफर्स अथवा रताळं याची निवड करा. तसंच तुम्हाला माहीत असलेल्या काही भाज्या अर्थात गाजर, बीट आणि रताळं हे हुम्माज डीपमध्ये तुम्ही बुडवून खाऊ शकता. पण या भाज्या ओव्हनमधून मस्तपैकी भाजून घ्या. या भाज्यांमधून तुम्हाला प्रोटीन तर मिळतंच. त्याशिवाय संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. तसंच तुम्हाला लागलेली भूक याने पटकन मिटते.
म्हणून आहारात हमखास हवी शेपूची भाजी
नट बटरच्या काही भागासह तुम्ही सफरचंद आणि केळीच्या फोडी करून खाल्लंत तरीही तुमच्या शरीरासाठी हे पोष्टिक ठरतं. तुम्हाला अरबट चरबट खाण्यापेक्षा घरात असलेली ही फळं तुम्हाला जास्त चांगला आधार देतात. सफरचंदातून शरीराला फायबर मिळतं तर केळ्यातून शरीराला पोटॅशियम मिळतं आणि यातून केवळ 100 कॅलरीज तुमच्या शरीरामध्ये जातात. त्यामुळे तुम्हाला वजन वाढण्याची चिंताही नाही.
निरोगी आरोग्याचं रहस्य, सकाळी रिकाम्या पोटी खा 'हे' पौष्टिक पदार्थ
भूक लागल्यावर अन्य पौष्टिक खाणं म्हणजे सुका मेवा. साखर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि आयर्नचे योग्य मिश्रण असणारे मिनरल्स यातून शरीराला मिळतात. सर्व सुका मेवा एकत्र करून तुम्ही काम करताना खाल्लं अथवा दुपारी साधारण चहाच्या वेळेत खाल्लं तर शरीराला चांगली ऊर्जा मिळते. तसंच तुम्हाला वजन न वाढण्यासाठीही याची मदत मिळते.
तुम्हाला जर तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर त्याऐवजीदेखील तुम्ही पौष्टिक खाण्यावर भर द्या. तुमच्या शरीराला अशा पदार्थांची गरज असते. असे पदार्थ खाल्ले गेले तरी तुम्ही योग्य वेळेवर योग्य व्यायाम करा. तसंच लो कॅलरी खाणं खाण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुमचं वजन वाढणार नाही आणि तुम्ही फिट राहाल आणि तुमच्या शरीराला या अति खाण्याचा त्रासही होणार नाही.
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा