टिश्यू पेपरचा वापर आपल्याला दैनंदिन जीवनात निरनिराळ्या पद्धतीने करता येतो. मात्र आपण आज या टिश्यू पेपरचा वापर मेकअपसाठी अथवा सौंदर्योपचारांसाठी कसा करू शकतो हे जाणून घेणार आहोत. एक साधा टिश्यू पेपर तुमचा मेकअप काढण्यापासून ते तुमच्या ग्लॉसी लिपस्टिकला मॅट करण्यापर्यंत निरनिराळ्या गोष्टींसाठी वापरता येतो. यासाठी या ब्युटी हॅक्स तुमच्या नक्कीच फायद्याच्या ठरतील.
पील ऑफ मास्क –
जर तुमच्याकडे बाजारात विकत मिळणारा पील ऑफ मास्क नसेल तर मुळीच काळजी करू नका. कारण तुमच्या टिश्यू पेपरने तो तुम्ही घरीच तयार करू शकता. यासाठी एका अंड्याचा पांढरा भाग, लिंबाचा रस आणि थोडंसं बदामाचं तेल एकत्र करा. फेसपॅक ब्रशने त्याचा एक कोट तुमच्या चेहऱ्यावर लावा. टिश्यूपेपर घ्या व तुमच्या फेसमास्कवर प्रेस करा. टिश्यू पेपरवर फेसमास्कचा आणखी एक कोट लावा. वीस मिनीटे मास्क चेहऱ्यावर ठेवा. जेव्हा त्वचा ओढली जाऊ लागेल तेव्हा मास्क पील ऑफ करा. लक्षात ठेवा तुम्हाला मास्क एकाच स्ट्रोकमध्ये काढून टाकायचा आहे. ज्यामुळे तुमच्या त्वचेतील सर्व धुळ, माती, प्रदूषण, मेकअप निघून जाईल आणि तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येईल.
ग्लॉसी लिपस्टिक मॅट करण्यासाठी –
तुमची ग्लॉसी लिपस्टिक तुम्ही टिश्यू पेपर वापरून मॅट करू शकता. यासाठी तुमची रेग्युलर लिपस्टिक ओठांवर लावा आणि त्यावर टिश्यू पेपर प्रेस करा. तो काढल्यावर तुमची एखादी फेस पावडर ओठांवर लावा. ज्यामुळे तुमच्या ओठांना फॅट फिनिश लुकचा लिप कलर मिळेल.
Shutterstock
मेकअप करताना पसरलेली आयशॅडो पुसण्यासाठी –
जेव्हा तुम्ही मेकअप करता तेव्हा तुमच्या आयशॅडोचे काही कण गाल अथवा इतर ठिकाणी विखुरले जातात. जर ते तसेच राहिले तर तुमचा मेकअप खराब होऊ शकतो. यासाठीच एका कोरड्या टिश्यूने ते रंग टिपून घ्या. म्हणजे तुमचा मेकअप खराब होणार नाही. आयशॅडो लावण्यापूर्वी तुम्ही तुमच्या गालावर टिश्यू ठेवू शकता. ज्यामुळे आयशॅडो गालावर पडणार नाही.
ब्लॅकहेड्स काढण्यासाठी –
ब्लॅकडेडस् ही एक खूप मोठी डोकेदुखी असते. सतत वाढणारे ब्लॅकहेड्स काढण्यासाठी वारंवार पार्लरमध्ये जाणं नक्कीच शक्य नसतं. म्हणून ते काढण्यासाठी एका गरम पाण्यात बुडवलेला टॉवेल पिळून तुमच्या चेहऱ्यावर ठेवा. ज्यामुळे पोअर्स मोकळे होतील. मग एका अंड्याचा पांढरा भाग आणि एक दोन थेंब टी ट्री ऑईल घ्या त्याचा मास्क ब्लॅकहेडसवर लावा टिश्यू पेपरच्या एका छोट्या पट्टीने तो छाका आणि पंधरा मिनीटांनी काढा. ज्यामुळे तुमचे ब्लॅक हेड्स निघून जातील. वॅक्स करण्यासाठीही तुम्ही टिश्यू पेपरचा वापर करू शकता.
हेअर स्टाईल करताना केसांचे संरक्षण करण्यासाठी –
केसांच्या सुरक्षेसाठी ही एक सोपी युक्ती आहे. केस आयर्न करताना तुमच्या स्ट्रेटनरला टिश्यू पेपर गुंडाळा. ज्यामुळे तुमच्या केसांचे उष्णतेपासून संरक्षण होईल.
लिपस्टिक जास्त काळ टिकवण्यासाठी –
तुमची लिपस्टिक अथवा लिप कलर जास्त काळ टिकवण्यासाठही तुम्ही टिश्यू पेपर वापरू शकता. यासाठी ओठांवर लिपस्टिकचा एक कोट द्या. दोन सेकंद ओठांवर टिश्यू पेपर दाबून धरा. टिश्यू पेपर काढा आणि ओठांवर दुसरा कोट द्या. ज्यामुळे तुमचे ओठ सुंदर दिसतील आणि लिपस्टिक जास्त काळ राहील.
Shutterstock
फोटोसौजन्य – शटरस्टॉक आणि इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
घरच्या घरी करा स्वतःचा ब्रायडल मेकअप, फॉलो करा या सोप्या टिप्स
तुमच्या त्वचेसाठी योग्य कन्सिलर कसं निवडाल (How To Use Concealer In Marathi)
उत्कृष्ट 10 वॉटरप्रूफ आयलायनर, जे वाढवतील तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य (Waterproof Eyeliner)