नारळपाण्याने चेहरा धुवा आणि त्वचेच्या समस्यांपासून मुक्त व्हा

नारळपाण्याने चेहरा धुवा आणि त्वचेच्या समस्यांपासून मुक्त व्हा

दिवसभरात दोन ते तीन वेळा चेहरा धुणं हे त्वचेची निगा राखण्यासाठी महत्त्वाचं आहे. चेहरा नियमित धुतल्यामुळे त्वचेवरील धुळ, माती, प्रदूषण, मेकअप साहित्याचे राहिलेले कण निघून जातात. चेहऱ्याचे पोअर्स मोकळे झाल्याने तुम्हाला फ्रेश वाटतं. चेहरा साध्या पाण्याने धुतल्यामुळे तुम्हाला फायदा मिळेलच. पण जर चेहरा धुण्यासाठी तुम्ही नारळपाण्याचा वापर केला तर तुम्हाला अफलातून फायदे मिळतील. यासाठी जाणून  घ्या नारळपाण्याने चेहरा धुण्यामुळे त्वचेवर काय चांगले परिणाम होतात.

Shutterstock

चेहऱ्यावरील डाग, व्रण कमी होतात -

जर तुम्हाला तुमची त्वचा नितळ व्हावी असं वाटत असेल. तर नारळपाणी पिण्यासोबतच त्याचा वापर त्वचेवरही करा. नियमित चेहरा नारळपाण्याने धुण्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग, व्रण, काळेपणा कमी होण्यास मदत होते. अशा प्रकारे चेहऱ्यावरील काळेपणा कमी झाल्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने ग्लो करू लागते.

पिंपल्स कमी होतात -

पिंपल्स येणं ही तरूण मुलं- मुली आणि तेलकट त्वचा असलेल्या लोकांसाठी एक मोठी समस्याच आहे. पिंपल्स येण्याची कारणं कोणतीही असली तरी या नैसर्गिक उपायाने तुम्ही पिंपल्स येण्याचे प्रमाण रोखू शकता. यासाठी चेहऱ्यावर ज्या भागावर जास्त प्रमाणात पिंपल्स येतात त्या भागावर कापूस अथवा कॉटन पॅडच्या मदतीने नारळपाणी लावा. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सचा आकारा हळू हळू कमी होईल आणि त्यामुळे निर्माण झालेली सूजही उतरू लागेल. नियमित नारळपाण्याने चेहरा धुतल्यामुळेही तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स, आणि ब्लॅकहेड्स कमी होतील.

Shutterstock

सनटॅन निघून जाते -

सन टॅनही आजकाल उन्हाळ्यातच नाही तर कोणत्याही ऋतूत निर्माण होणारी एक भयंकर समस्या आहे. कारण जर तुम्हाला भटंकती, प्रवास करण्याची आवड असेल तर तुम्हाला सनटॅन हे होतंच. यासाठीच जर तुम्ही तुमचा चेहरा नारळपाण्याने धुण्याची सवय स्वतःला लावायला हवी. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील सनटॅन कमी होऊ लागेल आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने मनसोक्त फिरण्याचा आनंद लुटता येईल.

सुरकुत्या कमी होतात -

वाढतं वयच नाही तर आजकाल धुळ, प्रदूषण, चिंता काळजी, अयोग्य आहार यामुळेही तुमच्या त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. म्हणूनच या सुरकुत्या कमी करण्यासाठी नारळपाण्याचा वापर करा. नारळपाणी पिणे, नारळपाण्याने चेहरा धुणे, फेसपकमध्ये नारळपाणी मिसळून लावणे असे अनेक उपाय तुम्ही यासाठी करू  शकता.

त्वचेसाठी उत्तम मॉईश्चराईझर -

चेहरा साबण अथवा क्लिंझरने धुण्यामुळे तुमची त्वचा कोरडी होते. मात्र जर तुम्ही चेहरा धुण्यासाठी नारळपाण्याचा वापर केला तर तुमच्या त्वचेला चांगल पोषण मिळतं. नारळपाणी त्वचेवर एकाद्या नैसर्गिक मॉईश्चराईझर प्रमाणे काम करतं. शिवाय यामुळे त्वचा जास्त तेलकट अथवा चिकटही होत नाही. 

Shutterstock

कोरड्या त्वचेसाठी उपयुक्त -

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर त्वचेची योग्य काळजी घेणं फार गरजेचं आहे. कारण वारंवार चेहरा धुण्यामुळे तुमची त्वचा शुष्क आणि निस्तेज होऊ शकते. मात्र जर तुम्ही नियमित नारळपाण्याने चेहरा धुत असाल तर तुमची त्वचा हायड्रेट राहते आणि नैसर्गिक पद्धतीने मऊ, मुलायम होते.

डार्क सर्कल्स कमी होतात -

अपुरी झोप, अती ताण, चिता-काळजी, वाढणारे वय अशा अनेक गोष्टींमुळे डोळ्यांच्या खाली काळेपणा निर्माण होतो. नारळपाणी हे एखाद्या अंडर आय क्रिमप्रमाणे तुमच्या डोळ्यांची काळजी घेते. डोळ्यांच्या खालील भागावर नियमित नारळपाणी लावा ज्यामुळे तुमच्या डार्क सर्कल्सची समस्या कमी होईल. 

Shutterstock