काहीतरी नवे शिकण्यासाठी आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी तुम्ही पुस्तक वाचत असाल तर आत्मचरिपर कादंबरी या तुमच्या आयुष्याला नेहमीच कलाटणी देणाऱ्या ठरतील. सध्याचे दिवस पाहता घरात राहून फारच कंटाळा आणि नैराश्याने आपल्या सगळ्यांना ग्रासले आहे. आयुष्याची दिशा सापडणे हे अनेकांना कठीण झाले आहे. अशावेळी मन शांत करुन काहीतरी चांगलं वाचावं यासाठी आम्ही मराठीतील प्रसिद्ध आत्मचरित्रपर कादंबरीची निवड तुमच्यासाठी केली आहे. त्यामुळे वाचते व्हा! अशाच वाचनप्रेमींसाठी काही उत्कृष्ट कांदबरीही. मराठी थ्रिलर, रोमँटिक, हॉरॉर कांदबरीही आम्ही तुम्हाला सांगितल्या होत्या. आता अधिक याबद्दल जाणून घेऊया.
Table of Contents
चरैवति! चरवैति!
लेखक: राम नाईक
प्रकाशन: इन्किन इनोव्हेशन
किंमत: 300 रुपये
परीक्षण: महाराष्ट्राच्या दुष्काळी गावात एका शिक्षकाच्या पोटी राम नाईक यांचा जन्म झाला. शिक्षणांनतर नोकरीसाठी त्यांनी मुंबई गाठावी लागली. चाकोरीबद्ध नोकरीच्या जीवनाला अचानक कलाटणी मिळाली ते त्यांच्या संघटनेच्या कामामुळे. नोकरी सोडून त्यांनी अवाढव्य अशा मुंबईचे नेतृत्व केले. सलग 8 निवडणुका जिंकल्या. अनेक संकटावर मात करत त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाची धुरा सांभाळली. चरैवति!चरैवति! म्हणजे चालत राहा. त्याच्या या आत्मचरित्रातून हाच धडा सगळ्यांनी घ्यावा. मराठीतील दर्जेदार साहित्य तुम्ही आवर्जून वाचायला हवे.
एक होता कार्व्हर
लेखक: वीणा गवाणकर
प्रकाशक: राजहंस प्रकाशन
किंमत: 250 रुपये
परीक्षण :जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या जीवनावर आधारीत ही कादंबरी असून तुम्हाला आयुष्य वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची दृष्टी देऊन जाईल. कार्व्हर यांचा जन्म 1864 झाली झाला. निसर्गाच्या सानिध्यात रमत त्यांनी कृषी मध्ये शिक्षण केले. त्यातच अध्यापन केले. आयुष्यात यशाची पायरी चढताना त्यांनी आपले नाते जमिनीशी घट्ट ठेवले. त्यामुळेच ते आयुष्यात यशस्वी झाले. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण आणि उपयोग मानवी जीवनासाठी किती आवश्यक आहे ते त्यांनी यात सांगितले. त्याचा अनुवाद वीणा गवाणकर यांनीही अगदी तसाच रसाळ केला आहे.
मन मैं है विश्वास
लेखक: विश्वास नांगरे- पाटील
प्रकाशक: राजहंस प्रकाशन
किंमत: 280 रुपये
परीक्षण: विश्वास नांगरे पाटील हे नाव माहीत नसेल अशी एकही व्यक्ती नाही. 26/11 दहशतवादी हल्ल्यात अत्यंत हुशारीने ताज हॉटेलमध्ये जाऊन आतंकवाद्यांशी हुशारीने त्यांनी दोन हात करत अनेकांचे प्राण वाचवले. पण त्यांचे संपूर्ण आयुष्य हे एका धड्यापेक्षा कमी नाही. त्यांच्या या आत्मचरित्रपर कादंबरीत त्यांनी याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. त्यांच्या या पुस्तकातून लोकांनी आदर्श घ्यावा अशीच त्यांचीही इच्छा आहे.
मुसाफिर
लेखक: अच्युत गोडबोले
प्रकाशक: मनोविकास प्रकाशन
किंमत: 280 रुपये
परीक्षण: अर्थशास्त्र,राजकारण,समाजशास्त्र आणि संगीत अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मुसाफिर करणाऱ्या अच्युत गोडबोले यांच्या कारकिर्दीचा वेध घेणारे हे पुस्तक आहे. वेगवेगळ्या विषयांचा सखोल अभ्यास करणारे अच्युत गोडबोले यांनी पुस्तक रुपात त्यांचा हा प्रवास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सोलापूरमध्ये शाळेत शिकत असल्यापासून ते आयआयटी आणि आदिवासी भागापासून ते परदेशातील आयटीक्षेत्रापर्यंतचा प्रवास या पुस्तकात मांडला आहे. गोडबोले यांच्या विचारांना बुद्धिमत्ता, उर्जा आणि चिंतनाची जोड मिळाली आहे. त्यामुळे पुस्तक एकाच वेळा माहितीपूर्ण आणि सकारात्मक जगण्याचा मंत्र देण्याचा ठरेल.
प्रकाशवाटा
लेखक: डॉ. प्रकाश बाबा आमटे
प्रकाशन: समकालीन प्रकाशन
किंमत: 200 रुपये
परीक्षण: आपले डॉक्टरचे उत्तम करीअर सोडून आदिवासी लोकांसाठी लढणाऱ्या डॉ. बाबा आमटे यांचा जीवनप्रवास ऐकला की आजही अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. नक्षली भागात असलेल्या हेमलकसा या भागात राहून आदिवासी लोकांची सेवा करण्याचे काम आमटे यांनी केले. त्यांच्या बाबांचे स्वप्न साकारण्यासाठी ते तिथे गेले. पण त्यांच्या कामाची दखल सगळ्या जगाने घेतली. मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश आमटे यांच्या या प्रवासाची गोष्ट म्हणजे ‘प्रकाशवाटा’ मध्ये त्यांनी सांगितले आहे. हे पुस्तक वाचताना संपूर्ण आनंदवन,हेमलकसा तेथील जीवन आपल्या डोळ्यासमोर आल्यावाचून राहात नाही.
लोक माझे सांगाती
लेखक: शरद पवार
प्रकाशन: राजहंस प्रकाशन
किंमत: 475 रुपये
परीक्षण: महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांचे नाव अगदी हमखास घेतले जाते ते म्हणजे शरद पवार. गेली साडेपाच दशकं देशाच्या जडणघडणीत त्याचा महत्वपूर्ण असा सहभाग आहे. त्यांच्या राजकीय वाटचालीचा वेध घेणारे हे आत्मचरित्र असून राजकीय आत्मकथा आहे. राजकारणात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिने हा अनुभव अगदी वाचण्यासारखा आहे.
कृष्णाकांठ यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र
लेखक: यशवंतराव चव्हाण
प्रकाशन: रोहन प्रकाशन
किंमत: 300 रुपये
परीक्षण: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे एक अग्रणी नेते होते. त्यांनी मुख्यमंत्री पदच नाही तर उपपंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री अशी महत्वाची पदे भूषविले आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या आयुष्यातील 1912 ते 1946 या कालखंडाचा आढावा घेणारे ‘कृष्णाकाठ’ हे आत्मचरित्र असून आहे. त्यांनी याची पहिली आवृत्ती 7 फेब्रुवारी 1984 साली प्रकाशित करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या अनेक घडामोडींचा यामध्ये समावेश करण्यात आले आहे.
एका योग्याची आत्मकथा
लेखक: स्वामी परमहंस योगानंद
प्रकाशन: आनंद संघ
किंमत: 325 रुपये
परीक्षण: आधुनिक हिंदू संताच्या असामान्य जीवनाविषयी आणि त्यांच्या शक्तिंविषयी सांगणाऱ्या आत्मचरित्रामध्ये आपल्याला हिंदू संस्कृतीची ओळख होते. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या पुस्तकाचे भाषांतर करण्यात आले असले. स्वामी परमहंस योगानंद हे अनेकांच्या परिचयाचे त्यांचे स्वानुभाव कथन करणाऱ्या आत्मचरित्रात त्यांच्या जीवनगाथेचा समावेश आहे. जो सगळ्यांनीच वाचावा असा आहे.
मीचि मज व्यायलो
लेखक: प्रवीण कुलकर्णी
प्रकाशन: उन्मेष प्रकाशन
किंमत: 200 रुपये
परीक्षण: एका सर्वसामान्य माणसांचे आयुष्य कसे असते हे सांगणारे प्रवीण कुलकर्णी यांचे आत्मचरित्र आहे. सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आल्यानंतर असलेल्या अनेक व्याधी आणि त्यातून मार्ग काढत केलेला प्रवास हा कोणत्याही सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी नक्कीच असू शकतो. आत्मचरित्र कोणीही लिहू शकतं आणि त्यासाठी काही खास आयुष्य असावे लागते असे मुळीच नाही. तर तुमचा अनुभव अनेकांना समृद्ध करणारी प्रेरणा हवी.
स्वगत
लेखक: अशोक समेळ
प्रकाशन: डिंपल पब्लिकेशन
किंमत: 400 रुपये
परीक्षण: अशोक समेळ हे मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते. अनेक नाटकं, चित्रपट मालिकांमधून त्यांनी काम केले आहे. बालपणीच्या अनेक आठवणींचा साठा त्यांनी या आत्मचरित्रपर कादंबरी केला आहे. अभिनेत्याचे आयुष्य हे कितीही ग्लॅमरस असले तरी या पदापर्यंत येण्याचा त्यांचा प्रवास हा काहीसा कठीण, सुखावणारा आणि अनेक व्यवधान आणणारा असतो. त्यांच्या या अनुभवातून आयुष्यात हार न मानणे हाच मंत्र आपल्याला मिळतो.
तुकडा तुकडा जिलेबी
लेखक: विष्णू मनोहर
प्रकाशन: मायमिरर पब्लिशिंग हाऊस
किंमत: 195 रुपये
परीक्षण: आपल्या खमंग रेसिपीजनी घराघरात जाऊन पोहोचलेले शेफ विष्णून मनोहर आज फार प्रसिद्ध आहेत. पण ही प्रसिद्धी मिळवण्यापूर्वी त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली. त्यांचे बालपण, त्यांची स्वयंपाकाची आवड, कुकरी शो आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या गोष्टी त्यांनी मांडल्या आहेत. तुम्हालाही या क्षेत्रात यायचे असेल तर तुम्हाला त्यांचा हा प्रवास नक्कीच मार्गदर्शन ठरणारा ठरेल.
कुमुदच्या आईची लेक
लेखक: कुमुद ओक
प्रकाशन: राजहंस प्रकाशन
किंमत: 300 रुपये
परीक्षण: कुमुद ओक यांनी वयाच्या 92 व्या वर्षी लिहिलेले हे आत्मचरिक्ष असून त्यांनी या पुस्तकात त्यांच्या अनेक आठवणींचा संग्रह केला आहे. विसाव्या शतकातून आताच्या 21व्या शतकात जाताना झालेले अनेक बदल घेतलेले अनुभव त्यांनी या पुस्तकात लिहिले आहेत. कुमुद नारायण म्हसकर असे त्यांचे लग्नापूर्वीच नाव . एका सुशिक्षित आणि प्रतिष्ठित घरात त्यांचा जन्म झाला. गावात राहूनही त्यांनी अनेक गोष्टींमध्ये प्राविण्य मिळवले. लग्नानंतर त्या नाशिक येथे राहू लागल्या. स्वातंत्र्यसैनिक रावसाहेब ओक यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्याचे बदललेले आयुष्यही त्यांनी यामध्ये मांडले आहेत.
तशाच मराठीत अनेक रोमँटिक कादंबरी आणि इतर पुस्तकांची भरभरून रेलचेल आहे. जे तुम्ही वाचायलाच हवे. पु. ल. देशपांडे, ग. दी. माडगूळकर, जयंत दळवी, व. पु. काळे अशी न संपणारी यादी मराठीतील उत्कृष्ट लेखकांची आहे. यांची पुस्तके तर तुम्ही चाळायला हवीतच. तुम्ही वाचाल तरच तुम्ही तुमच्या लहान मुलांनाही वाचनाची गोडी लाऊ शकाल. वाचाल तर वाचाल!