ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
ऑनलाईन फाऊंडेशन आणि कन्सीलर खरेदी करताना लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी

ऑनलाईन फाऊंडेशन आणि कन्सीलर खरेदी करताना लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी

सध्या बाहेर जाऊन खरेदी करणं म्हणजे थोडं जोखीमीचं काम आहे. त्यामुळे बऱ्याचशी गोष्टी आपण ऑनलाईनच खरेदी करत असतो. पण त्यातही मेकअपमधील फाऊंडेशन आणि कन्सीलरसारख्या गोष्टींची खरेदी ऑनलाईन करायची म्हटली की आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचे आहे. कारण आपला स्किनटोन आणि आपल्या त्वचेचा टाईप पाहून आपल्याला फाऊंडेशन आणि कन्सीलरची खरेदी करावी लागते. आपण दुकानात जाऊन हातावर अथवा गळ्यावर या गोष्टी तपासून पाहतो. पण ऑनलाईन खरेदी करताना तसं करता येणं शक्य नसतं. मग अशावेळी या वस्तूंची खरेदी नक्की कशी करायची असा प्रश्न पडतो. तर आता तुम्हाला त्याची चिंता करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहोत. तुम्ही त्या फॉलो केल्यास तुम्हाला ऑनलाईन फाऊंडेशन आणि कन्सीलरची खरेदी करणं सोपं होईल. तुम्हीही ऑनलाईन खरेदी करताना जर परफेक्ट शेड शोधण्यात गडबड करत असाल तर तुम्हाला या लहानसहान गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. जाणून घेऊया काय आहेत या महत्त्वाच्या गोष्टी. 

स्किन टाईप (त्वचेचे टेक्स्चर)

Shutterstock

ऑनलाईन फाऊंडेशन अथवा कन्सीलर खरेदी करताना सर्वात पहिले तुम्ही आपल्या त्वचेचा टाईप ओळखायला हवा. त्यानंतर तुम्हाला ठरवायचे आहे की, तुम्हाला मॅट लुक हवा की ग्लॉसी लुक हवा. यासह तुम्ही फुल कव्हरेज फाऊंडेशन अथवा लाईट कव्हरेज फाऊंडेशन खरेदी करू शकता. हे तुम्हाला जेव्हा माहीत असेल तेव्हाच तुम्ही स्वतःसाठी उत्कृष्ट फाऊंडेशन निवडू शकता आणि तुम्हाला शेड्स निवडतानाही कोणतीही अडचण येणार नाही. 

ADVERTISEMENT

Perfect Pout साठी ट्राय करा ‘या’ सोप्या 5 Tricks!

या गोष्टी ठेवा लक्षात

Shutterstock

ऑनलाईन फाऊंडेशन आणि कन्सीलर खरेदी करताना बऱ्याचदा शेड्स निवडताना चूक होते. फोनच्या लायटिंगमुळे ऑनलाईन शेड समजण्यात बऱ्याचदा तारांबळ उडते. त्यामुळे तुम्ही जेव्हा ऑनलाईन फाऊंडेशन खरेदी करत असाल आणि शेड समजत नसेल तेव्हा तुम्ही तुमच्यानुसार एक शेड लाईट घ्या. जर तुम्हाला योग्य शेड दिसत असेल तर लाईट कलर फाऊंडेशन घ्या. तुमचा रंग जर डार्क असेल तर तुम्ही डार्क फाऊंडेशन वापरा आणि जर अधिक गडद असेल तर तुम्ही मॉईस्चराईजर मिक्स करून फाऊंडेशनचा वापर करता येईल अशा तऱ्हेचे फाऊंडेशन निवडा. 

ADVERTISEMENT

परफेक्ट मेकअपसाठी जाणून घ्या 5 सोप्या टिप्स

ऑनलाईन ही शेड खरेदी करा

तुम्हाला फाऊंडेशन आणि कन्सीलरच्या दोन्ही शेडमध्ये निवड करणं कठीण जात असेल तर तुम्ही नेहमी लाईट शेडचीच निवड करा. लाईट शेडचा वापर त्वचेवर अगदी सहजरित्या करता येतो. कन्सीलरची लाईट शेड लावल्यास तुम्हाला ब्राईटनेस अधिक मिळतो. तर त्यात लाईट शेडमध्ये तुम्ही लिक्विड ब्रॉन्झर मिसळल्यास, तुमच्या त्वचेची शेड तुम्हाला उपलब्ध होऊ शकते. तुम्ही हा प्रयोगही करून पाहू शकता. 

रिव्ह्यू

ऑनलाईन शॉपिंग करताना तुम्ही नेहमी रिव्ह्यू वाचायला हवा. कारण रिव्ह्यू वाचल्याने तुम्हाला उत्पादन नक्की कसे आहे याची कल्पना येते. तसंच या उत्पादनाचा दर्जा काय आहे आणि बऱ्याचदा याचा नक्की कसा रंग आहे याबद्दलही यातून माहिती मिळते. तसंच रिव्ह्यूमध्ये तुम्हाला खरे फोटो आणि व्हिडिओदेखील दिसतात ज्यातून उत्पादनाची योग्य माहिती मिळते आणि फसण्याची भीती राहात नाही. त्यामुळे ऑनलाईन खरेदी करत असताना त्या फाऊंडेशन आणि कन्सीलरचे रिव्ह्यू तपासून घेणे आवश्यक आहे. तुम्हाला जर चांगले फाऊंडेशन अथवा कन्सीलर हवे असेल तर तुम्ही आमच्या MyGlamm च्या साईटवर जाऊन नक्की ऑनलाईन शॉपिंग करू शकता.

घरच्या घरी करा असा मेकअप जो तुम्हाला देईल प्रोफेशनल लुक (How To Do Makeup At Home In Marathi)

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

14 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT