मेष राशींच्या व्यक्ती असतात तरी कशा, जाणून घ्या वैशिष्ट्य

मेष राशींच्या व्यक्ती असतात तरी कशा, जाणून घ्या वैशिष्ट्य

महिन्यानुसार 21 मार्च ते 19 एप्रिलदरम्यान जन्म झालेल्या व्यक्तींची रास मेष आहे असं मानलं जातं. मात्र ही रास इंग्रजी महिन्यानुसार असते. तुमच्या पत्रिकेनुसार तुमची रास मेष असू शकते. मेष ही रास अग्नीची रास आहे. त्यामुळे साहस, नेतृत्व आणि क्रोध या तिन्ही गोष्टींचा संगम या राशीमध्ये दिसून येतो. तुमच्या जवळच्या व्यक्तींपैकी कोणी मेष राशीचे असतील तर त्यांचा नक्की स्वभाव कसा आणि त्यांची काय वैशिष्ट्य आहेत हे एकदा आम्ही दिले आहे त्याप्रमाणे आहे की नाही ते पडताळून नक्की पाहा. प्रत्येकाला माणूस कसा आहे आणि त्याचा स्वभाव कसा आहे जाणून घ्यायची इच्छा नक्कीच असते आणि आपल्याकडे राशीवरून माणसांची परीक्षा नक्कीच करता येते. मेष राशीच्या व्यक्तींची नक्की काय वैशिष्ट्य आहेत आणि या व्यक्तींचा स्वभाव कसा आहे ते आपण या लेखातून जाणून घेऊया. 

मार्च महिन्यात जन्म घेणाऱ्या व्यक्ती कशाअसतात, जाणून घ्या

मेष राशीच्या व्यक्ती नक्की कशा असतात (Aries sign people Positive and Negative Characteristics in Marathi)

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक माणसाच्या जन्म, महिना आणि वर्षानुसार त्याचा स्वभाव आणि इतर वैशिष्ट्य ही अवलंबून असतात. त्याच आधारावर त्याचा स्वभावही आपल्याला सांगता येतो. आपण या लेखातून मेष राशींच्या व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत. 

 • मेष राशीच्या व्यक्तींना स्वतःची प्रशंसा ऐकून खूपच आनंद होतो. जेव्हा त्यांच्या आवडत्या व्यक्ती त्यांच्यासाठी वेळ काढतात तेव्हा या व्यक्तींचा आनंद गगनात मावत नाही. 
 • या व्यक्ती अतिशय संवेदनशील असतात. दुसऱ्यांच्या भावना लवकर समजून घेतात. मात्र आपल्या भावना सांगताना त्यांना थोडा त्रास होतो. इतरांना योग्य सल्ला देतात मात्र जेव्हा स्वतःवर वेळ येते तेव्हा त्याच गोष्टीमध्ये चुकतात
 • मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या व्यक्तींमध्ये नेतृत्व गुण असतात. यांच्यासाठी कर्क, तूळ आणि धनु या मित्र राशी असून मिथुन, सिंह आणि कन्या या शत्रु राशी आहेत
 • अग्नि तत्वाची रास असल्याने यांना बऱ्याच गोष्टींची जाणीव आधीपासूनच होत असते आणि त्यामुळे त्याचप्रमाणे या राशीच्या व्यक्ती विचार करतात. यांच्यामध्ये चांगला आत्मविश्वास असतो. यांना मूर्ख बनविणे सहजसोपे नाही. समोरची व्यक्ती फसू शकते मात्र या व्यक्ती फसत नाहीत. यांचे डोके नेहमी काही ना काही विचारात मग्न असते. या व्यक्ती बऱ्याचदा सकारात्मक विचारच करतात. 
 • जोडीदार म्हणून मेष रासीच्या व्यक्ती या स्वतंत्र विचाराच्या असतात. या व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत खूपच उत्साही असतात. तसंच आपल्या जोडीदारावर यांना हक्क गाजवायला आवडतो. तसंच यांना आपल्या आयुष्यात कोणीही लुडबुड केलेली आवडत नाही. मग अगदी कितीही जवळची व्यक्ती असो.  
 • या राशीच्या व्यक्तींना साहस खूपच आवडतं पण त्याचबरोबर मनाला शांतताही त्यांना तितकीच प्रिय असते. यांचे व्यक्तीमत्व हे त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. तसंच या व्यक्ती अतिशय प्रेमळ आणि दयाळू असतात. आपल्या आयुष्यात स्थिरता लाभणार नाही अशी यांना सतत काळजी वाटत असते आणि कोणत्याही नात्यातून आपण वेगळे तर होणार नाही ना याचीही त्यांना चिंता असते. तसंच कंटाळवाणे आयुष्य जगायला या व्यक्तींना आवडत नाही. 
 • यांचा स्वभाव अतिशय जिद्दी असून एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती पूर्ण झाल्याशिवाय त्यांना समाधान मिळत नाही. दुसऱ्यांकडून कोणतीही गोष्ट करून घेण्यात या व्यक्ती माहीर असतात. या व्यक्तींवर लोक डोळे बंद करून विश्वास  ठेवतात. 
 • मेष राशीच्या व्यक्ती या आकर्षक असतात. यांचे व्यक्तीमत्वही आकर्षक असल्यामुळे गर्दीतूनही या व्यक्ती आपला वेगळेपणा दाखवू शकतात. यांच्या लुक आणि अदांवर अनेक लोक फिदा असतात. 
 • या राशीच्या व्यक्ती खूपच उत्साही आणि उत्साहवर्धक असतात. यांच्यामध्ये खूपच ऊर्जा असते. मेष राशीचा ग्रह मंगळ असल्यामुळे यांचा शुभ दिवस मंगळवार मानण्यात येतो
 • मेष राशीच्या ताकदीच्या बाबतीत सांगायचे झाले तर यांची ऊर्जा आणि उत्साह या दोन्ही त्यांना यश मिळवून देण्यासाठी मदत करतात. तर दुसऱ्या बाजूला या व्यक्ती बऱ्याचदा केवळ स्वतःच्या बाबतीच विचार करतात. जी यांची सर्वात मोठी कमतरता आह आणि त्यामुळे बऱ्याच जणांना या व्यक्ती आवडत नाहीत. 
 • या व्यक्ती आपले प्रत्येक काम हे अव्वल दर्जाचेच करतात. यांचा भाग्यशाली क्रमांक 1 आहे. त्यामुळे कोणत्याही शुभ कामाला जाण्यासाठी तुम्ही 1 क्रमांकाला सहसा प्राधान्य द्यावे
 • या व्यक्तींसाठी परफेक्ट मॅच म्हणजे धनु राशीच्या व्यक्ती. कारण यांच्या बऱ्याच गोष्टी आणि स्वभाव हा सारखाच असतो. दोघांचा दृष्टीकोनही सारखाच असतो. दोघेही बऱ्याच प्रमाणा फटकळ आणि एकमेकांसारखेच असतात. दोघेही सामाजिक कार्यातही एकत्र काम करू शकतात. तसंच यांच्यामध्ये प्रेमापेक्षाही मैत्री अधिक असते. त्यामुळे भांडणं जास्त होत नाहीत. आपल्या आयुष्यात दोघेही मजा मस्ती करत राहतात. 

या राशीच्या व्यक्ती असतात धडाकेबाज, कोणत्याही गोष्टीला घाबरत नाहीत

भाग्यशाली क्रमांक - 9, 36, 13, 69, 53, 67

राशी स्वामी - मंगळ

भाग्यशाली रंग - मंगळ असल्यामुळे भाग्यशाली रंग लाल आहे. लाल रंग आपल्यामध्ये एक वेगळी शक्ती निर्माण करून आत्मविश्वास देतो. त्याचप्रमाणे या व्यक्तींसाठी पांढरा, लेमन ग्रीन अथवा हिरवा रंगही लाभदायक आहे. 

भाग्यशाली दिवस - मंगळवार, गुरूवार आणि रविवार

भाग्यशाली खडा - पोवळे 

बॉलीवूड सेलिब्रिटी ज्यांची रास आहे मेष - राणी मुखर्जी, अजय देवगण, कंगना राणौत, इमरान हाश्मी, लारा दत्ता, जितेंद्र, अक्षय खन्ना, जितेंद्र, जयप्रदा

जन्मभर एकमेकांना साथ देतात ‘या’ चार राशीच्या व्यक्ती

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक