ADVERTISEMENT
home / Festive
सणासुदीला ट्राय करा खणापासून तयार केलेले हे हटके आऊटफिट

सणासुदीला ट्राय करा खणापासून तयार केलेले हे हटके आऊटफिट

 

 

नवरात्रीच्या उत्सवाला नुकतीच सुरूवात झाली आहे. दसरा दिवाळी म्हणजे सणासुदीचे दिवस… अशा सणासुदीच्या दिवसांसाठी खास तयार व्हायचं म्हणजे काही पांरपरिक, एथनिक लुक करणं हे ओघाने आलंच. यंदा कोरोनामुळे सणासुदीसाठी उत्साहाचं वातावरण नसलं तरी घरच्या घरी अथवा अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आपण सण नक्कीच साजरा करू शकतो. यासाठीच यंदा सणासाठी तयार होताना हे पाच लुक तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील. विशेष म्हणजे हे पाचही लुक तुम्ही महाराष्ट्रातील पारंपरिक खण या कापडापासून तयार करू शकता. 

खणाची साडी –

 

खण हे महाराष्ट्रातील एक पांरपरिक वस्त्र आहे. खणाचे कापड हातमागावर केले जाते. त्यामुळे ते मऊ आणि तलम असते. खणाला पारंपरिक वस्त्राचा मान मिळत असल्यामुळे तुम्ही कोणत्याही सणाला खणाची साडी नक्कीच घालू शकता. ग्राहकांची आवड पाहत अनेक उद्योजकांनी सध्या खणाच्या साडयांचे विविध प्रकार आणि ट्रेंड बाजारात आणले आहेत. त्यामुळे यंदा सणाला खणाची साडी नक्कीच ट्रेंडमध्ये आहे. खणाच्या साड्यांमध्ये विविध रंग आणि पॅटर्न सध्या उपलब्ध आहेत. कस्टमाईझ केलेले टू इन वन कलर किंवा इरकल, पैठणीचे काठ लावून या साड्यांमध्ये वैविध्य आणलेले आहे. नथ, झुमका अशा काही पारंपरिक डिझाईन्सनां जास्त मागणी आहे. प्रतिपदा कलेक्शनसाठी ऋतुजा बागवेने परिधान केलेली ही आकर्षक साडी पाहा. यानुसार तुम्ही तुमच्या साध्या पारंपरिक साडीला एक स्टायलिश लुक नक्कीच देऊ शकता. प्रतिपदा क्लोदिंगचे खण कलेक्शनही खूप लोकप्रिय आहे.

खणाचे ब्लाऊज –

 

जर तुम्हाला खणाची साडी नसेल नेसायची तर मिस्क मॅच कॉम्बिनेशन करत खणाचा ब्लाऊज आणि कोणतीही ट्रेडिशनल साडी हा लुकही मस्त दिसेल. खण हा कापडाचा प्रकार असा आहे की तुम्ही तो मिक्स आणि मॅच करून नक्कीच वापरू शकता. कॉटन, सिल्कच्या साड्या, लीनन साडी अशा साड्यांवर हे ब्लाऊज जास्तच उठून दिसतात. सायली राजाध्यक्ष ब्रॅंडची हॅंडलूम साड्या आणि ब्लाऊज ही खासियतच आहे. तुम्ही तुमच्या साड्यांसाठी या ब्रॅंडचे तयार ब्लाऊज नक्कीच मागवू शकता. 

ADVERTISEMENT

खणाचे पंजाबी ड्रेस –

 

साडी नेसणं आणि ती सावरणं जर तुम्हाला नको वाटत असेल तर खणाचा पंजाबी ड्रेस हा एक उत्तम पर्याय आहे. या पंजाबी ड्रेसवरील ओढण्या इतक्या मोठ्या आणि आकर्षक असतात की तुम्ही तुमची खणाची साडी नेसण्याची हौस यात भागवू शकता. शिवाय अशा मोठ्या, पारंपरिक काठ असलेल्या ओढण्या तुमच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात. शर्मिष्ठा राऊतप्रमाणे वस्त्रघरमधून तुम्ही निरनिराळे ड्रेस आणि त्यावर मॅचिंग मास्कची खरेदी करू शकता.

खणाचे वनपीस –

 

सध्या खणाचे वनपीसदेखील ट्रेंडमध्ये आहेत. सेलिब्रेटी लुक करण्यासाठी हा ऑप्शन नक्कीच बेस्ट आहे. खणाच्या  कापडाचा अतिशय उत्तम वापर करत तुम्हाला हे वनपीस बनवून मिळतात. वापरण्यासाठी सूटसुटीत आणि दिसायला बेस्ट असल्यामुळे किशोरवयीन मुलींमध्ये असे खणाचे वनपीस सध्या जास्त लोकप्रिय होताना दिसत आहेत. अभिनेत्री पूजा सावंतने परिधान केलेला हा हिरव्या कंच रंगाचा वनपीस पाहा किती छान वाटत आहे. या वनपीसमध्ये पदराचा वापर गळ्याभोवती करत या ड्रेसला एक आकर्षक टच दिला आहे. 

खणाच्या बॅग –

 

पैठणीप्रमाणेच खणाच्या कापडापासून शिवलेल्या बॅग हा ही फॅशनेबल दिसण्यासाठी छान ऑप्शन आहे. तुमच्या कोणत्याही पारंपरिक लुकला पूर्ण  करण्यासाठी तुम्ही त्या ड्रेस अथवा साडीला मॅच खणाची बॅग कॅरी करू शकता. यात क्लचपासून  ते अगदी स्लीक बॅगपर्यंत अनेक पर्याय तुम्हाला मिळू शकतात. अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने तिच्या या टू पीस आऊटफिटवर कॅरी केलेला असा पारंपरिक बटवादेखील तुम्हाला शोभून दिसेल. अशा प्रकारे स्वतःच्या आवडीनुसार हवे तशा बॅग तुम्ही खणापासून तयार करून वापरू शकता. तेजस्विनी पंडीतच्या तेजाज्ञा ब्रॅंडमध्ये तुम्हाला अशा अनेक खणाच्या फॅशनेबल वस्तू मिळू शकतात.

 

तुम्हाला हे खण कलेक्शन कसं वाटलं आणि फेस्टिव्ह सीझनसाठी तुम्ही यातील कोणता लुक केला हे आम्हाला जरूर कळवा. तुम्ही कोणताही लुक करा मात्र तो कम्पीट करण्यासाठी तुमची मदत करतील मायग्लॅमचे मेकअप प्रॉडक्ट तेव्हा ते खरेदी करायला मुळीच विसरू नका. 

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

साड्यांवर ऑफशोल्डर ब्लाऊज निवडताना

नवरंगामध्ये न्हाऊन निघाल्या आहेत मराठी तारका

ADVERTISEMENT

फेस्टिव्ह सीझनसाठी तुमच्याकडे हवेत हे फुटवेअरचे पर्याय

19 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT