हे खाद्यपदार्थ एकत्र खाण्यामुळे कमी होऊ शकते प्रतिकारशक्ती, वेळीच व्हा सावध

हे खाद्यपदार्थ एकत्र खाण्यामुळे कमी होऊ शकते प्रतिकारशक्ती, वेळीच व्हा सावध

कोरोनाची भिती आजही लोकांच्या मनातून जात नाही. या भितीतून मुक्त होण्यासाठी आधी कोरोना नामक महामारीला स्वीकारा आणि त्यानुसार स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. लक्षात ठेवा कोविड 19 चा संसंर्ग सर्वात आधी त्यांनाच होतो ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी असते. यासाठीच या काळात अशा सर्व गोष्टी आवर्जून करा ज्यातून तुमची प्रतिकार शक्ती वाढेल. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदात अनेक काढे आणि आहार सांगितलेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आपण या डाएट टिप्स नक्कीच करत आहोत. पण काही पदार्थ एकत्र खाण्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती कमजोर देखील होऊ शकते. 

कोणते पदार्थ एकत्र खाण्यामुळे प्रतिकार शक्तीवर होतो चुकीचा परिणाम

काही लोकांना सर्व पदार्थ एकत्र करून जेवायची सवय  असते. मात्र असं करणं मुळीच चांगलं नाही. कारण आयुर्वेद शास्त्रात काही पदार्थ एकत्र खाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. यासाठी जाणून घ्या कोणते पदार्थ तुम्ही एकत्र अथवा एकसाथ खाऊ शकत नाही.

दूधासोबत काय खाऊ नये -

दूध हे शरीरासाठी कितीही पोषक असलं तरी दूधासोबत काही पदार्थ एकत्र करून मुळीच खाऊ नयेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही दूध पिणार असाल तेव्हा उडदाच्या डाळीचे पदार्थ, पनीर, अंडे, मटण, हिरव्या भाज्या खाऊ नका. थोडक्यात जेवणानंतर लगेच दूध पिऊ नका अथवा दूध पिण्यानंतर हे पदार्थ जेवणातून खाणे टाळा. कारण यामुळे तुमची पचनशक्ती कमी होते आणि याचा थेट परिणाम तुमच्या प्रतिकार शक्तीवर होतो.

दह्यासोबत काय खाणे अयोग्य -

आहारात दह्याचा समावेश केल्यामुळे तुम्हाला नैसर्गिक प्रो बायोटिक मिळतात. मात्र जर तुम्ही दही खाणार असाल तर त्यासोबत आंबट फळे, मासे खाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही दही आणि आंबट फळे एकत्र खाता तेव्हा या दोन्ही पदार्थांमधील आंबट घटक एकत्र येतात आणि तुमची पचनशक्ती मंदावते. त्याचप्रमाणे जेव्हा दही हा एक थंड पदार्थ आहे तो कधीच उष्ण पदार्थांसोबत खाऊ नये. यासाठी जेव्हा तुम्ही मासे आणि दही एकत्र खाता तेव्हा तुमच्या शरीरावर चुकीचा परिणाम होतो. 

मधासोबत काय खाणे टाळावे -

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मध कधीच गरम करून खाऊ नये. शिवाय जर तुम्हाला ताप असेल तर मधाचे चाटण अथवा मध घेऊ नये. असं केल्यामुळे तुमच्या शरीरातील पित्त वाढू शकतं. मध आणि लोणी एकत्र करून खाऊ नये. तूप आणि मधही एकत्र करून खाणं चुकीचं आहे. एवढंच नाही तर पाण्यात मध अथवा तूप मिसळून पिण्यामुळे तुमच्या शरीराचं नुकसान होऊ शकतं. 

हे पदार्थ कधीच एकत्र खाऊ नयेत -

थंडपाण्यासोबत तूप, टरबूज, द्राक्षे,काकडी, जांभूळ आणि शेंगदाणे खाऊ नयेत. यासाठीच हे पदार्थ खाल्यावर लगेचच थंड पाणी पिऊ नये. त्याचप्रमाणे काकडी आणि चिंच, फणस एकत्र खाणे टाळावे. भाताच्या कोणत्याही पदार्थामध्ये व्हिनेगर मिसळू नये.


वर दिलेले पदार्थ एकत्र खाण्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळे कोरोनाच्या काळात निरोगी राहायचं असेल तर या गोष्टींची नीट काळजी घ्या.