निरोप समारंभ म्हटला की त्याची तयारी साधारण दहावीच्या वर्गापासून सुरू होते. आपण शाळा सोडतानाचा तो निरोप समारंभ सर्वात आधी डोळ्यासमोर येतो. त्यानंतर अनेक ठिकाणी आपले असे निरोप समारंभ होत असतात. अशावेळी निरोप समारंभ शायरी, गाणी अशा अनेक गोष्टींच्या आठवणींंचा साठा असतो. आपल्या जवळच्या व्यक्तीला निरोप देताना भावनिक व्हायला होतं आणि अशावेळी मराठीतील चारोळी अथवा शायरी साहजिकच आपण शोधू लागतो. आपल्याला कविता लिहिता येत असतील तर नक्कीच आपल्या जवळच्या माणसांसाठी भावनिक शब्द गुंफणे यासारखं मोठं गिफ्ट नाही. पण आपल्या जवळच्या व्यक्तीला निरोप देताना बऱ्याचदा शब्द अपुरे पडतात. मग अशावेळी निरोप समारंभ शायरी कामी येते. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचे शेर शायरी आम्ही तुमच्यासाठी लिहीली आहे.
Table of Contents
- Emotional Farewell Shayari In Marathi – भावनिक निरोप समारंभ शायरी
- Farewell Shayari For Students In Marathi – 10 वी निरोप समारंभ शायरी
- Nirop Samarambh Kavita – निरोप समारंभ चारोळ्या
- Funny Nirop Samarambh Shayari – मजेशीर निरोपाची शायरी
- Teachers Nirop Samarambh Shayari – शिक्षकांसाठी निरोप शायरी
- Office Farewell Shayari In Marathi – सेवानिवृत्ती शुभेच्छा शायरी
Emotional Farewell Shayari In Marathi – भावनिक निरोप समारंभ शायरी
कोणालाही निरोप देताना आपण नेहमीच भावनिक होतो. त्यातही जवळची व्यक्ती असेल तर आपल्या भावना रोखणं अत्यंत कठीण होऊन जातं. विशेषतः नातं संपवताना निरोप हा अधिक जीवघेणा असतो. अशाच काही भावनिक शायरी मराठीत तुमच्यासाठी. निरोप समारंभ शुभेच्छा संदेश खास मराठीतून तुमच्यासाठी.
1. दिवसामागून दिवस सरले
अनेक वर्षे सहज सरले
दिवस उजाडला निरोपाचा
आता सारे काही आठवणीतच उरले
बांधूनी घेऊ जगलेले
क्षण सारे गोड मनाशी
गाठू सारे उत्तुंग यश शिखरे
झेप घेऊनी आकाशी – विवेक र. उरकुडे
2. निरोप तुझा घेताना लागे ठेच मनी
तुझे रूप तुझा संग जागे मग लोचनी
निरोप तुझा घेताना बघते मागे वळूनी
डोळ्यातील मोती मनाचे अंगण जाते मन भरूनी
निरोप तुझा घेताना मिटते मी पापणी
अंधारही येई तेव्हा तुझाच चेहरा घेऊनी
निरोप तुझा घेताना पाऊस गातो गाणे
चातकाप्रमाणे मग मीही तुझ्या आठवणीत नहाते…
3. निरोप तुझा घेताना ऊर भरूनी येतो
विरह तुझा सख्या जीव माझा घेतो
मिलनाची आस वेड लावी या जीवा
स्वप्नांंचा भंग पुन्हा हा छळूनी जातो
4. सारं काही जीवनात असतं
तरी का बरं दुःख पाठिशी राहातं
आनंदाचे दोन क्षण आणि दुःखाचे चार क्षण
असं का बरं ओंजळीत येतं
दुःख कितीही झाकून ठेवलं तरीही ते झटकन बाहेर पडतं
कोणाला तरी निरोप देता ते जवळून अनुभवता येतं
5. निरोपाच्या प्रत्येक क्षणी डोळ्यात पाणी का येतं?
पुन्हा भेटू म्हणत म्हणत आतून दाटून येतं
काळजाच्या ठोक्याला आता काबूत आणा
हीच भेट शेवटची हेच आता मनात आणा
काय झालं? काय होईल?
सारं आभाळ खाली येईल
गळ्यातला शब्दानशब्द रक्तामध्ये गोठून जाईल
काळजाच्या ठोक्याला आता पुन्हा सैल सोडा
नक्की होईल भेट पुन्हा हीच आशा बांधून ठेवा – स्नेहा ताम्हाणे
6. भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे
वरून शांत असलो तरीही हृदयातून रडत आहे
जात आहेस सोडून मला नाही अडवणार मी तुला
असशील तिथे सुखी राहा याच शुभेच्छा तुला
7. जा तू प्रिय जा, तू माझी होऊ नकोस
स्वप्नातही तू मला आता पाहू नकोस
तुला हवं ते आज नाही माझ्यापाशी
प्रेमाचे शब्द भरवीन पण तरी राहशील उपाशी
8. पाणावल्या डोळ्यांनी तूज निरोप देताना सुचली मज कविता…
आजही तुझा भास होताना
आईन्यात स्वतःला न्याहाळताना
तुझी साथ आहे असा मनाला दिलासा देताना
तू दूर आहेस हेसुद्धा कळताना
अन् तुझा निरोप देताना
स्फुरली मज कविता…
9. थांबविण्याचा घाट त्याने आज पूर्णपणे घातला होता
तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे त्याचा हाताचा पिसारा फुलला होता
लागाबांधा नसलेलं मन तिचं, डोळे मिटून तिनं आवरलं होतं
डोळ्यांत साठवलेलं अनामिक दुःख, क्षणात गालावरती कोसळलं होतं
शेवटच्या भेटीचा सांगावा घेऊनी, वळण मनाचंच भरकटलं होतं,
अर्धमेल्या होऊन राहिलेल्या अपेक्षांनी घुसमटण्या आतुर केलं होतं – मयुरी उबाळे
10. ‘Farewell’ म्हणजे आयुष्याचा शेवट नाही
आपण कोणाशिवाय किती दृढपणे जगतो
याची ती पहिली पायरी आहे
11. निरोप बाप्पाला
आठवणीतल्या एका कप्प्याला
आशीर्वाद, सुख, समाधान देणाऱ्या
आपल्या बाप्पाला
12. जगाचा निरोप घेताना
माणूस इथून काहीही नेऊ शकत नाही
यावर माझा विश्वास नाही
आयुष्यभर ठसठसत असलेली
पण न सांगता येणारी दुःख तो आपल्याबरोबर नेतो – व. पु. काळे
13. जाते म्हणतेस हरकत नाही
कढत अश्रू पाहून जा
नाते तोडतेस हरकत नाही
विझता श्वास पाहून जा
जाणून सारे संपवताना हीच एवढी विनंती
हसते आहेस हरकत नाही
बुडती नाव पाहून जा
जाळते आहेस हरकत नाही
जळणारे गाव पाहून जा! – निखिल
14. सखे नाते हे आपले होते प्रेमाचे
निरोप देता उचंबळून येते मन दुःखाचे
सोडून जाता तुला मला हुरहूर वाटे
आठवणी तुझ्या जीवनी कदापिही ना मिटे
आपल्यांनीच माझ्यावरती लावला आरोप
तर मला तुला द्यावा लागत आहे निरोप
कढ आलंय हृदयात अश्रू डोळ्यात दाटलंय
कशी आली ही वेळ ढग आभाळी जमलंय – तोशन जाधव
15. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छाचा सण आहे,
पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे
निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात
हासू अन् दुसऱ्यात आसु
मन नितळ नितांत आठवणीत
आम्ही जातो मम ग्रहासी देवा निरोप द्यावा सख्याहारी
Farewell Shayari For Students In Marathi – 10 वी निरोप समारंभ शायरी
सर्वात पहिला निरोप समारंभ असतो तो 10 वी च्या वर्गातील. आपल्या 10 वर्षांपासूनच्या मित्रमैत्रिणी आणि शाळेतील शिक्षकांना निरोप देणं हे अत्यंत कठीण असतं. पण आपल्यासमोर आपली पुढची स्वप्नंही असतात. अशाच काही निरोप समारंभ शायरी
1. शानदार या विद्यासागरी हुरहूर लागे त्या मायपित्यांची
असे ओढ त्या मित्रांची ध्यान न लागले तरी
पदन्यास केला वर्षे दोन, कर्मविरांच्या वटवृक्षाने
विणले जाळे आयुष्याचे, रूकडीमध्ये एक फांदी
द्विगुणित करत आली तिच्या गर्दछायेत,
यज्ञ मांडला ज्ञानाचा, वटवून भूमिका आम्ही
हर्षभराने जातो मायभू, निरोप द्या आज आम्हाला
रोप घेऊन जातो माघारी, परम आण्णांंना ठेऊन साक्षी
सजवू बालके ज्ञानतुऱ्यांनी, मातापित्यासम करून माया
रंग भरू त्यांच्या जीवनी, भव्य शिदोरी ही घेऊनी
2. घेताना आज निरोप शाळेचा
आले भरूनिया डोळे,
10 वर्षातील दिवस बनले स्मरणांच्या पुस्तिकेतील पाने
आले तेव्हा होते सारेच मातीचा गोळा
घडविले शिल्प या मायेने आता
कुंडीतल्या मातीतले लहानसे रोपटे
उद्या लागणार जगाच्या मातीत
शाळा म्हणजे घर अशी मनाची पकड
घेताना आज निरोप त्या घराचा
प्रश्न पडला हा सगळ्यांना
3. शाळेतला शेवटचा दिवस निरोप समारंभ
जणू काही भावला मनी
म्हणूनच आजपर्यंत जिवंत आहेत आठवणी
सुखदुःखाचे मिश्रण असलेला तो दिवस
अजूनही आहे ध्यानी
एकीकडे ध्येय होते तर
दुसरीकडे शाळा सोडतोय याची खंत मनी – निकिता जाधव
4. शाळेचा हा निरोप आता
आले मन आठवणींनी भरून
मैत्री – प्रेमाने भिजले मन
डोळे गेले अश्रूधारांनी भरून
निरोप तुमचा घेताना लागे ठेच उरी
तुम्ही दिलेले ज्ञान हीच जन्माची शिदोरी – गिरीष दारूंटे
5. कशी विसरायची ही आई?
जिने दिले वळण आयुष्याला
आता करूनही इच्छा नाही बसता येणार
प्रेमाच्या विटांनी बांधलेल्या भिंतीच्या त्या वर्गात
शिक्षकांच्या मायेची, प्रेमाची होती साथ
त्यांच्याच कठोरपणाच्या आधारावर, झाले सर्वच गुणवान
एकच वास्तू देते आईची माया व तीच दाखवते वडिलांची कठोरता
प्रेम, बंधुता, माणुसकीची शिकवण जिची
झाशी, शिवबांची शिकवली थोरता जिने
उद्याच्या जगाला तोंड देण्यासाठी दिले आव्हान जिने
आज त्याच शाळेचा निरोप घेणार, नाही करवत कल्पना आता
पहिल्या दिवशी होती मनाची जी स्थिती
आज जातानाही मन तसेच झाले,
येताना होती भीती मनात, पण जाताना प्रेमाची आठणवीची शिदोरी
जगात झाले जरी सर्व विद्यावान
तरी प्रत्येकाकडची ही शिदोरी
कधीच नाही होणार शिळी – संजीवनी जोशी
6. निरोपाचा क्षण नाही
शुभेच्छांचा सण आहे
पाऊल बाहेर पडताना
रेंगाळणारं मन आहे
7. देते निरोप सुखाने
पावन झाले तवस्मृतीने
विद्यादाने पवित्र केले
सावित्रीचे लेणे
8. उडत्या पाखरांना तमा नसावी
नजरेत सदा नवी दिशा असावी
घरट्याचं काय आहे बांधता येईल केव्हाही
क्षितीजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी
9. काय बोलू मी आज शब्द शब्द गोठलेला
आठवणींच्या हिंदोळ्यावर थेंब थेंब साचलेला
नभी पेटले काहूर मनी असे हुरहूर
काय बोलू मी आज शब्द शब्द आठवेना
मन पाखरू पाखरू किती सावरू सावरू
दुःख दाटले आत किती आवरू आवरू
जवळ आला क्षण कसे उदासले मन
गडगडले ढग टप टपते थेंब – प्राध्यापक गिरधर जाधव
10. एक दिवस आपण सगळे वेगळे होणार
आपण आपले बोलणे, मस्ती, स्वप्नं सगळं मिस करणार
दिवस महिने वर्ष जातील कॉन्टॅक्ट होतील कमी
पण शेवटच्या क्षणापर्यंत शाळेतील मस्ती मिस करणार
Nirop Samarambh Kavita – निरोप समारंभ चारोळ्या
चार ओळींमध्ये आपल्या भावना व्यक्त करणं हे अत्यंत सोपं वाटतं. पण तसं अजिबात नाही. आपल्या संपूर्ण भावना चारोळीमध्ये बसवणं कठीण असतं. अशाच काही निरोप समारंभ चारोळ्या तुमच्यासाठी
1. जुन्या वर्षाला देत निरोप
नाविन्याची कास धरू
नवीन स्वप्न, नवीन ध्येयासह
नवीन वर्षाचे स्वागत करू
2. निरोप तुझा घेताना
मन माझे भारावले होते
तू प्रयत्न केलास लपवायचा
पण तुझे डोळेही पाणावले होते
3. निरोप बाप्पाला देणं
नेहमीच दुःख देतं
पण तो सदैव जवळच आहे
त्याचा चेहरा पाहून मन आनंदी होतं – मनिषा
4. निरोप तुझा घेताना
पायात प्राण घुटमळले
असे का होत असेल
हे मलाच नाही उमगले – कल्पना हलगे वानरे
5. निरोप तुला देताना शब्द गोठून गेले
पाझरणाऱ्या डोळ्यातून
व्यक्त होऊन गेले – रूपाली जाधव
6. सगळ्या गोष्टी
सोप्या वाटतात मला
पण निरोप घेणं
जातं कठीण आयुष्यात
7. करून जावे बरेच काही
निघून येथून जाताना
गहीवर यावा जगास साऱ्या
निरोप शेवटी घेताना
8. निरोपाच्या वेळी
तू हजर पाहिजे गं
तुझी आणि माझी अशी
एकमेकांत नजर पाहिजे गं
9. निरोप घेणे
महत्त्वाचे असते
कारण आयुष्यात
पुन्हा पुन्हा भेटायचे असते
10. आज निरोप देताना तुला
आले डोळे भरून
देवाकडे आता एकच प्रार्थना
इच्छा साऱ्या तुझ्या द्याव्या पूर्ण करून
11. प्रेमाची खरी किंमत
निरोप घेतल्यावर कळते
कितीही दुर्लक्ष केलं तरी
नजर सारखी तिथेच वळते
12. तू भेटतेस तेव्हा तुला डोळे भरून पाहतो
निरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणतो
असे का बरे होते, हेच का ते नाते
ज्याला आपण प्रेम म्हणतो
13. दाटला जरी कंठ तरी
निरोप देतो हर्षाने
माहीत आहे बाप्पा मला
येणार तू वर्षाने
14. चूक माझी कळण्याआधी
नजरेआड तू निघून गेली
निरोप तुला देता देता
हृदयाची धडधड माझ्या बंद झाली
15. जगी यातना भोगल्या कितीही
सोडली साथ नियतीने जरी
सुख दुःखात होतो सोबती
का घेतला निरोप, गेले सोडून एकटी
Funny Nirop Samarambh Shayari – मजेशीर निरोपाची शायरी
प्रसंग कोणताही असो भावनिक असला तरीही त्याला मजेशीरपणाची झालर मिळाली की आयुष्य सोपं होऊन जातं. निरोप हा भावनिक असला तरीही त्याला मजेशीरपणाचा साज नक्कीच चढवता येतो.
1. सायंकाळी निवांत वेळी, आळस झटकूनी टाका
पाणीपुरीच्या वा मिसळीच्या दुर्लक्षू नका त्या हाका
चक्कर मारा बाईकवर वा करा मोकळे पाय
बागेत रंगवा गप्पाष्टक वा केवळ हॅलो हाय
नंतर येईल रात्र सुखाची, तब्येतीने जेवा
भानगडींच्या सिरीयल्स पाहून करा स्वतःचा हेवा
सौं. चे कौतुक करा जोडा स्तुतीसुमनांची पुस्ती
आणि नंतर बघा जमते का थोडी चावट मस्ती
चित्र असेल हे आपल्या साध्या संसाराचे
निवृत्ती मग रंगत जाईल, येता दिवस सुखाचे! – गोविंद करमरकर
2. इतकी वर्षे नोकरी केल्यानंतर आज थोडे निवांत घ्या
सेवानिवृत्त होताय आता तरी थोडे दमाने घ्या
3. नोकरीपासून सुटका झाली आयुष्यातून नाही..
आता तरी तुमच्यासाठी जगा… दुसऱ्यांसाठी नाही
4. मस्त मजेचे आयुष्य, गाडी थांबली वळणावर
जरा विश्रांती करायची आहे सेवानिवृत्त झाल्यावर
5. तुला दिलेल्या निरोपाचा अर्थ असा होतो की,
तुझ्या जीवनातील उत्कृष्ट भूमिकेसाठी
तुला मिळालं प्रमोशन
6. पुन्हा एकदा जगण्या बालपण
करण्या नवी हुल्लडबाजी
हा निरोप देणं
गरजेचा आहे आमच्यासाठी
7. जमाखर्च दुःखाचे करत
इथे रात्री बसली
निरोप देऊन तिजला
माझ्यासाठी नवी पहाट सजली
8. माझेच शब्द होते, माझेच सूर होते
माझ्याच पापण्यांना दाटून पूर होते
पण त्याने केली पूरपूर आणि
माझ्या चेहऱ्यावर आले नूर होते
9. असताना तुम्ही प्रश्न सुटत होते झटपट
आता आम्हाला निरोपही द्या पटपट
10. निरोप घेणं म्हणजे नक्की काय रे बाबा
तर कामासाठी जगणं थांबवतो
आणि जगण्याचे काम सुरू करतो
Teachers Nirop Samarambh Shayari – शिक्षकांसाठी निरोप शायरी
शिक्षक हा आपल्या आयुष्यातली सर्वात पहिला जवळचा मित्र असतो एकप्रकारे. त्यांच्याशिवाय विद्या मिळणं कठीणच आहे. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जरी त्यांना दिल्या. तरी आपल्या आवडत्या शिक्षकांना निरोप घेताना नेहमीच अंतःकरण जड होते. खास शिक्षकांसाठी निरोप शायरी
1. निरोप नव्हे हा
ओलावा माणुसकीचा
विसरू कसे आम्ही
क्षण हा सौख्याचा
2. निरोप तुमचा घेताना
कंठ दाटून येतो
स्मृतींच्या दर्पणात
हलकेच डोकावतो
3. तुमच्याशिवाय शाळेच्या या भिंती
शाळेतील क्लासरूम्स होतील फिके फिके
आयुष्यातील आणि शाळेची ही पोकळी
कधीही भरून न निघणारी आहे
4. प्रत्येक शिक्षक कधी ना कधीतरी निवृत्त होतच असतो
पण त्यांनी दिलेली शिकवण आणि वारसा
प्रत्येक विद्यार्थ्यासह कायम जपला जातो
पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा!
5. आपल्या अनुपस्थितीतही
देणार तुम्ही प्रेरणा
तुमच्या नसण्याने
येणार आमचे डोळे पाणावून
तुम्ही दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी मनापासून धन्यवाद!
6. आमच्या आयुष्याचं झाड हे नेहमी फुललेलंच राहील
याची आहे मला खात्री
कारण त्याची बी तुम्ही पेरली आहे
या झाडाला तुम्ही मोठं केलं आहे
पुढच्या वाटचालीस भरभरून शुभेच्छा!
7. चुका झाल्यावर कान पकडले
पण आयुष्याची नवी दिशा दाखविण्यासाठीही तत्पर राहिलात
तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे तर भाग्यच
तुम्ही दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी मनापासून धन्यवाद!
8. अंधारातही प्रकाश दाखवणारा
मिणमिणता दिवा आहात तुम्ही
आयुष्यात कसं वागायचं याची
उत्कृष्ट मिसाल आहात तुम्ही
शाळेतील असेल जरी शेवटचा दिवस
मनात कायमस्वरूपी राहाल तुम्ही!
9. कोणाच्याही छायेखाली वाढू नका ही शिकवण तुमची
पण तुमच्या छायेखाली कसे वाढलो कळलंच नाही
आयुष्यात उत्तम माणूस होण्यासाठी दिलेली ही शिकवण कधीच विससता येणार नाही
तुम्ही आमच्या मनात कायम राहाल
10. शिक्षक येतात आणि जातात
पण त्यांनी दिलेली शिकवण कायम आयुष्यात कामी येते
तुम्ही शाळेतून जात असाल पण आमच्या वागण्यातून कायम दिसाल
Office Farewell Shayari In Marathi – सेवानिवृत्ती शुभेच्छा शायरी
कितीही वर्ष आपण ऑफिसमध्ये राहिलो आणि कंपनीसाठी काम केलं. तरी प्रत्येक कंपनीसाठी आणि एखाद्यासाठी आपल्या मनात खूपच भावना असतात. मैत्री असते. अशाच काही ऑफिसमधून सेवानिवृत्त होताना खास मराठीत केलेल्या शायरी
1. सेवानिवृत्तीचा दिवस आला..
अगदी मनासारखं काहीतरी करण्याचा काळ आला..
जे जे तुम्ही ठरवलं ते सगळं करावं…
तुम्हाला जे जे हवे ते सारे मिळावे.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
2. सोडून चाललात ऑफिस तरी
मनातून दूर तुम्ही कधीच होणार नाही
खात्री आहे आम्हाला
दिवसातून एक फोन केल्याशिवाय तुम्हाला करमणारच नाही
3. त्या ऑफिसमधील गप्पा,
तुमचा ओरडा सगळेच आता पुन्हा होणार नाही
तुमच्यासारखा बॉस मला पुन्हा मिळणार नाही
सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा!
4. जीवन आहे एक आगगाडी, ती धावे आशेच्या रुळावरी
धुरे सोडी निराशेचा अन थांबी सहानुभूतीचे स्टेशनवरी सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
5. जरी डोळ्यात पाणी येत असलं तरी ते गालावर आणायचं नसतं
निरोपाच्या वेळी असे गुंतवायचे नसतात हातात हात केवळ स्पर्श सांभाळायचा असतो
6. मखमली हृदयात गेलेले काही सुखाचे क्षण घालीत असतात.
मधून साद मात्र आपण द्यायचा नसतो प्रतिसाद
निरोपाच्यावेळी फक्त एकच करायचं असतं, दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी आपल्या डोळ्यात घ्यायचं असतं.
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा! – आशिष देशपांडे
7. नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात, रंगीत कळ्या रोजच उमलत असतात
नजरेत भरणारी सर्वच असतात पण हृदयात राहणारी माणसं फारच कमी असतात
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा! – आशिष देशपांडे
8. सुरवंटाचे झाले पाखरु,सर्वत्र लागले भराऱ्या मारु
नवे जग, नव आशा, शोध घेण्याची जबर मनिषा, सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
9. बाहेर पडता येणार नाही..
त्यावेळी तुम्हाला / मला
ऑफिसची आठवण आल्यावाचून राहणार नाही
10. सतत घरातल्यांची तक्रार होती तुम्ही कुठे नेत नाही
म्हातारे झालात तरी प्लॅनिंग काही संपत नाही
आता करा वेळेचा सदुपयोग आणि मस्त करा जीवनाची नवी सवारी
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
पुढे वाचा –