ADVERTISEMENT
home / Family
Charoli In Marathi

Charoli In Marathi | प्रेम भावना व्यक्त करा मराठी चारोळी सोबत

चार ओळी म्हणजे चारोळी हे सर्वांनाच माहीत आहे. मराठीमध्ये अशा अनेक चारोळ्या आहेत. पण सर्वात जास्त या चारोळ्या प्रसिद्ध झाल्या त्या चंद्रशेखर गोखले यांच्यामुळे. चार ओळींमध्ये सर्व भावना व्यक्त करणारे शब्द आणणं म्हणजे कसबच. हा काव्य प्रकार कवी, लेखक आणि साहित्यिक असणाऱ्या चंद्रशेखर गोखले यांनी साधारण 90 च्या दशकात निर्माण केला आणि त्यानंतर याची एक लाटच पसरली. आपल्या भावना सहजपणे या चार ओळीतून व्यक्त करणं सोपं जाऊ लागलं. अगदी शाळा आणि कॉलेजमध्येही याचं प्रमाण वाढलं. मित्र असो वा सखा, सुख असो वा दु:ख या प्रत्येक भावनेसाठी चारोळी हा पर्याय योग्य ठरू लागला. आम्ही या लेखातून खास तुमच्यासाठी काही भावना व्यक्त करण्यासाठी खास मराठी चारोळी (charoli in marathi) आणल्या आहेत. तुम्हालाही कोणाकडे आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील तर तुम्ही या चारोळ्यांचा नक्की आधार घेऊ शकता.

चारोळी म्हणजे नेमकं काय ? (What Is Charoli In Marathi)

आजही तरूण पिढी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मराठी चारोळीचा (marathi charoli) आधार घेताना दिसते. या चारोळीमधून तुम्ही तुमच्या भावना तुम्हाला जशा हव्या तशा त्या व्यक्तीपर्यंत सहज पोहचवू शकता. हा खरं तर भावनांच्या बाजूने असणारा शब्दांचा खेळ आहे. पण त्याचा उपयोग नक्कीच खेळखंडोबा होण्यासाठी करता येऊ शकत नाही. कोणत्याही भावना काही ठराविक शब्दात चार ओळींमध्ये यमक जुळवून व्यक्त करणं म्हणजे चारोळी. ती तुम्ही अगदी कोणत्याही भावनांवर रचू शकता. फक्त एक त्यातील शब्दांनी तुमच्या मनामध्ये जागा करायला हवी. चारोळी म्हणजे नेमकं काय हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अशाच काही चारोळ्या ज्या तुमच्या मनाचा नक्की ठाव घेतील. 

माझे बाबा कविता (Marathi Kavita Baba)

15 Charoli In Marathi On Friendship | मित्रमैत्रिणींसाठी 15 चारोळी

Charoli In Marathi On Friendship
Charoli In Marathi On Friendship

इतर सर्व नाती ही आपल्या जन्माबरोबरच आपल्याला मिळतात. पण मैत्री हे असं एक नातं आहे जे आपण निर्माण करतो आणि ते जन्मभर जपायचा प्रयत्न करतो. आपल्या आयुष्यात अगदी जीवाला जीव देणारे मित्रमैत्रिणी असतात. तर काही केवळ कामापुरतेही असतात. पण साथ देणाऱ्या मित्रमैत्रिणींसाठी आपणही नेहमी तयार असतो. मैत्रीचे बंध हे अतूट असतात. त्याच्यासाठी शब्दांची गरज भासत नाही. पण तरीही कधीतरी अशी वेळ येते की, नेहमीचं बोलणं अपुरं पडतं आणि त्यावेळी अशा चारोळींची गरज भासते. मित्रमैत्रिणींसाठी खास स्टेटस ठेवले जातात. खरं तर मैत्री ही व्यक्त करायची नसते तर निभवायची असते असं म्हटलं जातं. पण व्यक्त केलेली मैत्री अधिक घट्ट होते हेदेखील तितकंच खरं आहे. अशाच आपल्या जीवलग मित्रमैत्रिणींसाठी काही चारोळ्या

ADVERTISEMENT

1. मैत्री अशी असावी
भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी
सुकलेल्या फुलांना बहर आणणारी
दु:खाच्या वाळवंटात सुखाचा पाझर फुटवणारी

2. मैत्रीची वाट जितकी कठीण
तितकीच ती छानही आहे
आयुष्याच्या घडीत एक धागा मैत्रीचा
तर एकामध्ये प्राण आहे

3. चांगल्या मैत्रीला गरज नसते 
वचन आणि अटींची
एकाने निभावले 
तर दुसरा नक्कीच समजू शकेल

4. श्रीमंत मित्राबरोबर वावरताना
गरीब दुर्लक्षित नाही झाला पाहिजे
गरीब मित्राबरोबर वावरताना
श्रीमंतीचा आवाज नाही झाला पाहिजे

ADVERTISEMENT

5. चांगल्या काळात हात धरणे
म्हणजे मैत्री नव्हे
तर वाईट काळात हात न सोडणे
म्हणजे खरी मैत्री 

6. मैत्र जीवाचे
न सजवायची असते
न गाजवायची असते
ती तर फक्त सजवायची असते

7. तू साथ दिल्यावर 
मैत्रीचं नातं फुललं
म्हणूनच तुझं माझं मन
छान जुळलं 

8. मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा
मैत्री एक अनमोल भेट जीवनाची
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची

ADVERTISEMENT

 9. तुझ्या मनाला माझ्या मनाचा
रस्ता छान कळू दे
मैत्रीच्या नात्याने मग 
दोघांची ओंजळ पूर्ण भरू दे

10. मैत्री म्हणजे एक झाड
वळणावर वाढणारं
आपली सावली होण्यासाठी 
उन्हासोबत लढणारं 

 11. मैत्री आपल्या दोघांची
मनात छान रुजलेली
वर्षानुवर्ष भावनांच्या 
थेंबाथेंबात भिजलेली

 12. एकमेकांना भेटण्याची 
दोघांनाही आस आहे
आपल्या मैत्रीमध्ये
हीच एक गोष्ट खास आहे

ADVERTISEMENT

13. मैत्री म्हटली की,
आठवतं ते बालपण
आणि मैत्रीतून मिळालेलं 
ते खरंखुरं शहाणपण

14. मैत्रीचं नातं हे 
सगळ्या नात्यात श्रेष्ठ
हे नातं टिकवण्यासाठी 
नको खूप सारे कष्ट

 15. मैत्रीचे बंध सारे
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे

वाचा – विनोदी स्टेटस (Funny Status In Marathi)

ADVERTISEMENT

15 Marathi Charoli On Love | प्रेमाच्या चारोळ्या

प्रेम व्यक्त करणं हे एक कसबच आहे. प्रेम व्यक्त करताना अगदी पूर्वीपासून कवितांचा आधार घेण्यात आला आहे. नव्वदीच्या दशकापासून चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळींचाही खूपच आधार घेण्यात आला. काहींनी तर आपल्या आपण मराठी चारोळी (charoli in marathi) बनवून प्रेम जिंकण्याचा प्रयत्न केला आणि तो सफल झाल्याचीही अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला दिसतात. अगदी या चार ओळींमध्ये आपल्या मनातील प्रेमाची भावना उत्कटतेने सांगणं म्हणजे एखाद्याचा मनाचा ठाव घेणं. अशा चारोळ्यांमधून पटकन प्रेमाची भावना व्यक्त होत असते. इतकंच नाही तर यामुळे जास्त बोलायची गरजही भासत नाही. अशा प्रेमाच्या चारोळ्यांनी समोरच्या व्यक्तीचा मनाचा ठाव पटकन घेता येतो आणि त्या व्यक्तीशी पटकन समरसून जाता येतं. व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा (valentine day quotes in marathi)निमित्ताने अशाच काही निवडक प्रेमाच्या चारोळ्या पाहूया.

Marathi Charoli On Love
Marathi Charoli On Love

1. प्रेमात असचं थांबायचं नसतं
मागे न वळता पुढे चालायचं असतं
एकमेकांची साथ घेऊन 
जग जिंकायचं असतं

2. माझ्या मनात काय आहे
ते तू अचूक ओळखतेस
मग असे असूनही
तू मला पुन्हा पुन्हा तेच का विचारतेस

3. तुझ्या डोळ्यात पाहता
मीच मला दिसते
तुझ्या डोळ्यात असलेली मी पाहून
गालातल्या गालात हसते

ADVERTISEMENT

4. तू समोर असल्यावर
आसपास इतर कुणी नसावं
एकसारखं तासनतास
वाटतं तुला पाहात बसावं

5. तुझ्या मिठीतील गोडवा
नेहमीच मला भावतो
जसा थंडीच्या दिवसातील गारवा
क्षणार्धात निघून जातो

6. माझ्यासमवेत जगताना 
तू किती भावूक होतोस
सर्व काही मला देऊन 
तू रिकामा कसा राहतोस

 7. हे सांगू ते सांगू म्हणत
हवे ते सांगायचेच राहिले
तिचे ते मुके शब्द
माझ्या डोळ्यांनीच पाहिले

ADVERTISEMENT

8. आयुष्याची स्वप्नं पाहताना
वास्तवाला विसरायचं नसतं
गुलाबाला स्पर्श करताना
काट्याचं भान ठेवायचं असतं

9. प्रेमाला नात्यात बसवणं
खूपदा प्रेमाला घातक ठरतं
पण ते तसं नाही बसवलं तर
लोकांच्या दृष्टीने पातक ठरतं

10. काही नाती अमूल्य असतात
त्यांची किंमत करू नये
जपावं हाताच्या फोड्यासारखं
उगाचच गंमत करू नये

11. कितीही ठरवलं तरी
तुझ्यावर रूसून राहता येत नाही
उघड्या डोळ्यांनी तुला टाळलं तरी
मिटल्यावर त्यांना तुझ्याशिवाय पर्याय उरत नाही

ADVERTISEMENT

12. जेवढं बांधावं काव्यात
तेवढी तू निराकार होत जातेस
समजून सोडवावं म्हटलं तर
आणखीनच गुंतत जातेस

13. जन्मभर नजरकैदेत राहण्याची
तयारी आहे माझी
पण कैद जरी माझी असली 
तरी नजर कायम तुझी असावी

14. ओठ शांत असताना
तुझे डोळे खूप काही बोलून जातात
जरा कुठे स्थिरावलेल्या मनावर
एक वादळी थैमान घालून जातात

15. काल रात्री म्हणे गावात
गोंधळ माजला होता
जमिनीवरचा चंद्र पाहून 
आकाशातील चंद्रही लाजला होता

ADVERTISEMENT

वाचा – आईसाठी करा खास आईच्या कविता

15 Charoli In Marathi For Sadness | दु:खातही जवळच्या वाटणाऱ्या चारोळ्या

सुखाप्रमाणे दु:खातही मराठी चारोळी (marathi charoli) नक्कीच आपली साथ देते. खरं तर दु:खात असे काही शब्द आपली साथ देत असतात. त्यामुळे अशा वेळी तुम्ही अशा प्रकारच्या चारोळ्या लिहिता किंवा नक्कीच वाचू शकता. प्रेम..प्रेमाची गंमत..प्रेमाची व्याख्या सांगणारे Love Quotes आपण नेहमी वापरतो. शब्द तुम्हाला सुखामध्ये आणि दु:खामध्ये आधार देण्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरतात. वाचता वाचता पटकन चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या अशा बऱ्याच चारोळ्या असतात. अगदी इतकंच नाही हल्ली सर्रास बरेच जण चारोळ्या तयार करतात.

Charoli In Marathi For Sadness
Charoli In Marathi For Sadness

1. तुझा हात सोडताना 
आभाळ भरलं होतं
गेला देहातून प्राण
प्रेत माझं उरलं होतं

2. भावनांना कागदावर उमटवणे
तितकेसे सोपे नसते
अश्रुंना लपवण्याइतके 
तेसुद्धा कठीण असते

ADVERTISEMENT

3. मनातले त्याला कळले असते
तर शब्द जोडावे लागले नसते
शब्द जोडता जोडता जग
सोडावे लागले नसते

4. त्या येऊन जाणाऱ्या लाटेशी
या बिचाऱ्या किनाऱ्यानं कसं वागावं
ती परकी नसली तरी त्यानं
तिला आपलं कसं मानावं

5. आसवांशी मी मैत्री केली
कारण कुणाचाच मला सहारा नव्हता
अथांग समुद्रात असलेल्या या नावेला
तुझ्या प्रेमाचाही किनारा नव्हता

6. आठवण तुझी येताच
निराश होऊन तरसतो
वाटेवरती तुझ्याच
आस लावून परततो

ADVERTISEMENT

7. मुक्या हुंदक्याचे गाणे कोणाला कळावे
छळावे स्वत:ला निखारे क्षणांचेच व्हावे
जडे जीव ज्याचा
त्याच्याच का रे नशीबी असे घाव यावे

8. जमलंच तर तुला
आणखी एक जादू करून जा
निरोप घेताना सखे
तू तुझ्या आठवतीही घेऊन जा

9. झरे आणि डोळे यांना माहीत असते फक्त वाहणे
फरक एवढाच की, 
झरे वाहतात तळ्याच्या साठवणीत
आणि डोळे वाहतात कुणाच्या तरी आठवणीत

10. आग दु:खाची 
कोणत्याही अश्रूच्या पाण्यानं विझत नाही
तरीही दोन अश्रू पाझरल्याशिवाय
मन मात्र हलकं होत नाही

ADVERTISEMENT

11. कितीही म्हटलं तरी
मला तितकंसं व्यवहारीपणे वागता येत नाही
आभाळावर केलेल्या त्या बेहिशेबी प्रेमाचं
या चातकाल व्याज मागता येत नाही

12. तुझ्या आठवणीत मी जगतो
असं मी कधीच म्हणणार नाही
कारण आठवण्यासाठी मुळात
मी तुला कधी विसरतच नाही

13. कुठे तरी काही तरी घडलंय
त्याचं कोणासोबत तरी बिनसलंय
मग उगाचच नाही मन माझं
माझ्यापासून दूर गेलंय

14. किती सहज म्हणून गेलीस
वेळ पाहून लिहित जा
माझ्यावर रागवण्यापेक्षा 
तू तुझ्या आठवणींनाच थोडंसं बजावत जा

ADVERTISEMENT

15. माझी कहाणी ऐकून
आज तोही रडला
लोकं मात्र म्हणाली
अरे आज पाऊस कसा पडला

वाचा – निरोप समारंभ शायरी, आपल्या खास जवळच्या व्यक्तींसाठी

15 Funny Charoli In Marathi | मजेशीर चारोळी

नेहमीच्या धावपळीच्या आणि त्रासाच्या आयुष्यात चेहऱ्यावर हास्य येणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अशावेळी अशा मजेशीर चारोळ्या तुमच्या चेहऱ्यावर सहज हसू आणू शकता. 

Funny Charoli In Marathi
Funny Charoli In Marathi

1. तो तिला म्हणाला, क्या हुआ तेरा वादा
ती म्हणाली
आता मी दुसरा पकडलाय
आजपासून तू माझा दादा

ADVERTISEMENT

2. मिळावा पुढचा जन्म डासांचा वाटते
मिळावा पुढला जन्म डासांचा
तेवढाचा घेता येईल सुंदर अप्सरांच्या
गालाचा चावा

3. सावन का महिना
पवन करे सोर
मतदान करू तरी कोणाला
इथे सगळेच उभे आहेत चोर

4. परीक्षा शब्दाचा नवीन अर्थ
मन लावून अभ्यास करून परीक्षा दिलीस
तर कदाचित परी मिळेल
नाहीतर रिक्षा आहेच

5. रस्ते साधे होते
तेव्हा माणसेही साधी होती
आता रस्ते डांबरी झाले तेव्हापासून
माणसेही डांबरट झाली

ADVERTISEMENT

6. तुका म्हणे
आपुल्या पैशाने करावी पार्टी
नाहीतर जग म्हणेल
मित्राच्या नादाने वाया गेली कार्टी

7. बायकोने लाटणे फेकले
तरी आवाज होत नाही
याचा अर्थ नाही
की नवऱ्याला इजा होत नाही

8. अशी बायको हवी
तोंड हे अंग नसलेली
अशक्यातली गोष्ट आहे पण
देवानी अशी नाही सोडलेली

9. जडावलेल्या पापण्या
मिटायला तयार होत्या
तेव्हाच त्याच्या घोरण्याच्या
सीमा पार होत होत्या

ADVERTISEMENT

10. लग्नाच्या पत्रिकेवर 
दोघांचं नाव होतं
फक्त तिचं आत होतं 
आणि माझं कार्डावर होतं

11. आयुष्य खूपच
बोअरिंग झालं आहे
देवा एकदाच नेऊ टाक
गोव्याच्या बीचवर

12. प्रिये तू मला हवी आहेस
माझ्याबरोबर हॉटेलमध्ये 
ऐकायचे आहेत ते प्रेमाचे तीन शब्द
मी बील भरते

13. लाल पिवळी कोंबडी
तिचे करडे करडे पाय
बरेच दिवस तुमचा एसएमएस नाही
बर्ड फ्लू झाला की काय? 

ADVERTISEMENT

14. भरून आले सारे आसमान
रडू लागले संत
सर्वांची एकच खंत
आली कुठून ही राखी सावंत

15. जेव्हा तुला अगदी एकटं वाटेल
नजरेसमोर धुकं वाटेल
आसपास कोणीच दिसणार नाही
तेव्हा मी तुला डोळ्यांच्या डॉक्टरांकडे नक्कीच घेऊन जाईन

फ्रेंडशिप डे मैसेज

18 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT