विजयादशमीच्या दिवशी होवो संकटाचा नाश, पाठवा दसरा संदेश (Dussehra Wishes In Marathi)

विजयादशमीच्या दिवशी होवो संकटाचा नाश, पाठवा दसरा संदेश (Dussehra Wishes In Marathi)

नवरात्रीचे नऊ दिवस देवीची मनोभावे सेवा केल्यानंतर देवीला निरोप देणारा दिवस म्हणजे ‘विजयादशमी’ अर्थात ‘दसरा’ हिंदू संस्कृतीत या सणाला फारच महत्व आहे.दसरा हा अश्विन शुद्ध दशमीला येतो. अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्र सुरु होते आणि दहा दिवसांनी दसरा येतो. दसरा हा सण पराक्रमाचा आहे. या संदर्भात एक पौराणिक कथा आहे ती अशी की, दसऱ्याच्या याच दिवशी महिषासूर या राक्षसाने थैमान घातले होते. त्याचा वध करण्याचे काम देवीने केले. हा विजय दिवस म्हणून याला विजयादशमी असे म्हटले जाते. शिवाय प्रभू रामचंद्रांनी देखील याच दिवशी रावणावर हल्ला चढवत विजय मिळवला होता.त्यामुळेच या दिवसाला पौराणिक दृष्ट्या फार महत्व आहे. दसरा साजरा करण्याची पद्धत अनेक ठिकाणी वेगळी आहे. या दिवशी रावणदहनाचा मोठा कार्यक्रम अनेक ठिकाणी केला जातो. याच दिवशी आपट्याची पानं वाटत भरभराटीच्या शुभेच्छा दिल्या जातात. साडेतीन मुहुर्तापैकी एक मुर्हुत असलेला हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. अशा दिवशी एकमेकांना शुभेच्छा द्यायलाच हव्यात.नवरात्रीच्या या कालावधीत तुम्ही नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्य नसतील. तर दसऱ्याचे  औचित्य साधत तुम्ही तुमच्या आप्तेष्टांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा पाठवायलाच हव्यात. चला तर जाणून घेऊया दसरा शुभेच्छा संदेश

Table of Contents

  दसरा शुभेच्छा संदेश (Happy Dussehra Wishes In Marathi)

  दसऱ्याच्या दिवशी आप्तेष्टांना काही शुभेच्छा संदेश पाठवण्याचा विचार करत असाल तर काही निवडक संदेश तुमच्यासाठी

  • सीमा ओलांडून आव्हानांच्या 
   गाठू शिखर यशाचे!
   प्रगतीचे सोने लुटून!
   सर्वांमध्ये हे वाटायचे!! 
   दसऱ्याचा शुभेच्छा! 
  • दिन आला सोनियाचा 
   भासे घरा ही सोनेरी 
   फुलो जीवन आपुले 
   येवो सोन्याची झळाळी 
   दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • लाखो किरणी उजळल्या दिशा, 
   घेऊनी नवी उमेद, नवी आशा, 
   होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा
   दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • बांधू तोरण दारी,
   काढू रांगोळी अंगणी..
   उत्सव सोने लुटण्याचा…
   करुनी उधळण सोन्याची,
   जपू नाती मनाची
  • जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार भेदभाव
   सोने लुटूया प्रगत विचारांचे..
   करुन सिमोल्लंघन, 
   साधूया लक्ष विकासाचे…
   आपणा सर्वांना दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • दिन आला सोनियाचा,
   भासे धरा ही सोनेरी,
   फुलो जीवन आपुले,
   येवो सोन्याची झळाळी,
   दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • सोनं घ्या...सोन द्या… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 
  • वाईटावर चांगल्याची मात
   महत्व या दिनाचे असे खास 
   जाळोनिया द्वेष- मत्सराची कात
   मनोमनी वसवी प्रेमाची आस
   विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • सदिच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयुष्यात
   दसऱ्याचा हा सुवर्णक्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात 
   शुभमुहूर्ताचा हा दसरा होवो आपणांस लाभाचा
   आपल्या जीवनात बरसो पाऊस सुवर्णांचा..
   दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • झाली असेल चूक तरी
   या निमिनत्ताने आता ती विसरा 
   वाटून प्रेम एकमेकांस
   साजरा करु यंदाचा हा दसरा!
  • देऊ-घेऊ सोनं-चांदी
   आज एकमेकांस स्वचेच्छा
   सदैव मिळावं यश उदंड
   दसऱ्याच्या शुभेच्छा!
  • सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
   सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
   सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
   केवळ सोन्यासारख्या लोकांना 
   हॅप्पी दसरा!
  • लाखो किरणांनी उजळल्या दिशा,
   घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
   होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा..
   दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • आपट्याची पाने, झेडुंची फुले घेऊनी आली
   अश्विनातली विजयादशमी 
   दसऱ्याच्या आज शुभ दिनी
   सुख नांदो तुमच्या जीवनी!
  • रम्य सकाळी, किरण सोनेरी
   सजली दारी तोरमे ही साजिरी,
   उलगगे आनंद मनी,
   जल्लोष हा विजयाचा हसरा रम्य उत्सव प्रेमाता 
   तुम्हांस सुखसमृद्धी देवो हा दसरा!!

  पाठवा दसरा संदेश (Dussehra Messages In Marathi)

  दसरा हा सण आनंद घेऊन येतो हा आनंद आपण सगळ्यांसोबत साजरा करायला हवा. म्हणून पाठवा हे दसरा संदेश

  Instagram

  • दसऱ्याचा सण आणि सुवर्णाचे दान
   सुर्वण म्हणून आपटयाा पानाचा मान,
   झेंडुच्या फुलांनाही महत्व फार
   त्याच्या तोरणांनी सजले प्रत्येकाचे दार…
   दसऱ्याच्या शुभेच्छा! 
  • तोरण बांधू दारी..
   रांगोळी रेखू अंगणी..
   उधळण करु सोन्याची...
   नाती जपू  मना-मनांची
   विजयादशमीच्या शुभेच्छा!
  • कष्टाचं मोल सरत नाही
   ते आयुष्यभर टिकतं
   म्हणूनच कदाचित खरं सोनं काळ्या मातीमध्ये मिळतं.
   दसऱ्याच्या शुभेच्छा!
  • झेंडूची तोरण आज लावा दारी
   सुखाचे किरण येऊद्या घरी
   पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा
   विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
  • अज्ञानावर ज्ञानाने
   शत्रुवर पराक्रमाने..
   अंधारावर प्रकाशाने
   क्रोधावर प्रेमाने
   विजय मिळवण्याचा सण म्हणजे विजयादशमी!
  • परक्यांना ही आपलसं करतील असे गोड शब्द असतात,
   शब्दांनाही कोडं पडावं अशी गोडं माणसं असतात
   किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
   सोन्यासारखे तर तुम्ही सर्व आहातच
   सदैव असेच राहा
   तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा!
  • चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा!!
   आपुलकीच्या साखरेचा स्वाद करा!!
   तुमचा चेहरा आहेत हसरा!!
   उद्या सकाळी खूप गडबड,
   म्हणून तुम्हाला आताच म्हणतो, शुभ दसरा!!
  • झेंडूची फुले केशरी,
   वळणा वळणाचं तोरण दारी,
   गेरुचा रंग करडा तपकिरी,
   आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,
   कृतकृत्याचा कलश रुपेरी,
   विजयादशमीची रीत न्यारी
   दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • श्रीरामाचा आदर्श घेऊन
   रावणरुपी अहंकाराचा नाश करत
   दसरा साजरा करुया
   विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • रम्य सकाळी,
   किरणे सोज्वळ अन सोनेरी
   सजली दारी,
   तोरणे ही साजिरी..
   उमलतो आनंद मनी,
   जल्लोष विजयाचा हसरा,
   उत्सव प्रेमाचा,
   मुहूर्त सोनेरी हा दसरा...
   सोन्यासारखा तर तुम्ही आहातच
   तसेच सदैव राहा,
   आणि तुमची साथ अशीच शेवटपर्यंत राहू द्या.
   तुम्हाला सर्वांना दसरा सणाच्या शुभेच्छा!
  • आला आला दसरा, टेन्शन सारे विसरा
   चेहरा हसरा ठेवून सगळ्यांना द्या दसऱ्याच्या शुभेच्छा!
   आपल्या यशाच्या आड येणाऱ्या सगळ्या सीमा पार होऊन
   आपली आकांक्षा पुरती होवो हीच सदिच्छा..
   दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 
  • स्नेहभाव वाढवू
   अनं प्रफुल्लित करु मन…
   सुवर्ण पर्ण वाटायचे..
   अन् सुवर्ण क्षण साठवायचे..
   मनामध्ये  जपून आपुलकी
   एकमेकांना भेटायचे
   दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 
  • आज सोनियाचा दिनू… करु नव्या कामाची सुरुवात
   दसरा आहे आज करु तो आनंदात

  भाऊबीजेसाठी खास 'शुभेच्छा संदेश ' (Messages For Bhaubeej In Marathi)

  विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा (Vijayadashami Wishes In Marathi)

  दसरा हा सण विजयादशमी नावानेही ओळखला जातो. तुम्ही विजयादशमीच्या शुभेच्छाही या दिवशी देऊ शकता कारण हा दिवस पराक्रमाचा आहे.

  • आपट्याची पाने, झेडुंची फुले,
   घेऊन आली विजयादशमी..
   दसऱ्याच्या या शुभदिनी,
   सुख-समृद्धी नांदी आपल्या जीवनी!!
   विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • समृद्धीचे दारी तोरण
   आनंदाचा हा हसरा सण
   सोने लुटून हे शिलंगण
   हर्षाने उजळू द्या अंगण
   सर्वांना विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा! 
  • मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा,
   सण दसरा हा उत्कर्षाचा
   चैतन्यास संजीवनी लाभोनी
   होवो साजरा मनी,
   उत्सव तो नवहर्षाचा
   विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
   विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर
   आपल्या यशाच्या आड येणाऱ्या
   सगळ्या सीमा पार करुन
   आकांक्षापूर्तीकडे झेप घेऊ या
   विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • झेंडुची तोरण आज लावा दारी
   सुखाचे किरण येऊद्या घरी
   पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा
   विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
   ‘विजयादशमी’ आणि ‘दसरा’ उत्सवाच्या
   सर्व मित्र परिवाराला मन:पूर्वक शुभेच्छा!
  • दसऱ्याला करतो पाटी पूजन,
   आणि वंदितो शस्त्रे, वाहन
   निगा राखण्याचे आश्वासन,
   बुद्धी, शक्तिचे होते मीलन
  • दसरा म्हणजे सीमोल्लंघन 
   मनातील अंधाराचे उच्चाटन
   सोने देऊन करतो शुभचिंतन
   समृद्ध व्हावे तुमचे जीवन…
   -प्रसन्न, माधुरी, अमृता
  • विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर,
   प्रभू रामचंद्राचे स्मरण करत,
   अपशयाच्या सीमा उल्लंघन
   यश,किर्ती, सुख-समृद्धीकडे झेप घेऊ या
   विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • सत्याचा असत्यावर विजय अधोरेखित
   करणारा सण दसरा
   विजयादशमीच्या मनस्वी शुभेच्छा!
  • उत्सव आला विजयाचा
   दिवस सोने लुटण्याचा..
   नवे जुने विसरुन सारे,
   फक्त आनंद वाटण्याचा
  • आपट्याची पानं जणू सोनं बनून
   सोनेरी स्वप्नांचं प्रतिक होऊ दे
   आकाश झेप घेण्याचं ध्येय तुझं
   यशांच्या सिमा ओलांडून जाऊ दे
  • दारी झेंडूची फुले,
   हाती आपट्याची पाने
   या वर्षात लुटूयात
   सद्विचारांचे सोने!
   दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छ!
  • निसर्गाचं दान आपट्याचं पान त्याला
   सोन्याचा मान
   तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती समाधान
   दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • सोन्यासारखे नाते तुमचे- माझे
   हळुवार जपायचे,
   दसऱ्याच्या
   शुभदिनी अधिक दृढ करायचे!
  • स्वर्णवर्खी दिन उगवला
   आज फिरुनी हसरा
   आसमंती मोद पसरे
   नाही दु:खाला आसरा
   अंतरीच्या काळजीला
   आज नाही सोयरा
   आनंद देऊ, हर्ष देऊ
   सण करुया साजरा
   विजयादशमीच्या शुभेच्छा!

  दसरा कोट्स मराठी (Dussehra Quotes In Marathi)

  काही जणांना शुभ संदेश नाही तर विचार ही एकमेकांना सांगायला आवडतात. तुमच्या भावना करा अशा व्यक्त

  • दसरा!
   या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
   एवढा मी श्रीमंत नाही,
   पण नशिबानं जी सोन्यासारखी
   माणसं मला मिळाल..
   त्यांची आठवण म्हणून हा प्रयत्न..
   सोन्यासारखे तुम्ही आहातच..
   सदैव असेच राहा..
   दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • रात्रीनंतर दिवस उगवला…
   पहाट हसतच जागी झाली…
   ऊन सावली खेळ निरंतर
   सांगत सांगत धावत आली…
   सुख- दु:खाचा खेळ असाच…
   जाणून घ्यावे साऱ्यांनी..
   हसत जागा अन हसत राहा तुम्ही
   सांगून गेली स्पर्शानी…
  • सोनेरी दिवस,
   सोनेरी पर्व,
   सोनेरी क्षण,
   सोनेरी आठवण,
   सोन्यासारख्या लोकांना,
   दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • सदैव गुणगुणत राहिले की, 
   त्याचे आपोआप गाणे होते,
   जसे दसऱ्याच्या दिवशी 
   आपट्याचे सोने होते
  • आपट्याच्या सोन्यावरुन 
   एक गोष्ट आपल्याला कळते|
   प्रयत्नात सातत्य असेल तर
   संधी आपोआप मिळते
   -सूर्यकांत डोळस, बीड
  • त्रिभुवन भुवनी
   पाहता तुज ऐसे नाही
   चारी श्रमले परंतु
   न बोलवे काही
   विजयादशमीच्या शुभेच्छा!
  • तांबडं फुटलं,
   उगवला दिन,
   सोन्यानी सजला,
   दसऱ्याचा दिन!
  • दसरा हे विजयाचे प्रतीक आहे,
   असेच आपल्या जीवनात येणाऱ्या
   प्रत्येक संकटावरती आपण नेहमी,
   विजय मिळवावा..
   दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
  • शब्दांना सूर लाभता
   शब्दांचेही गाणे होते!
   विजयादशमीच्या परीस्पर्शाने
   आपट्याचेही सोने होते!!
   -सूर्यकांत डोळस
  • आला आला दसरा,
   दु:ख आता विसरा
   चेहरा ठेवा हसरा
   साजरा करु दसरा…
   दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • दसरा सण मोठा, आनंदाला नाही तोटा
   दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • मराठी संस्कृतीचा ठेवुनिया मान
   तुम्हाला सर्वांना देतो मी सोनियाचे पान…
   सोने घेताना..ठेवा चेहरा ‘हसरा’
   तुम्हाला सर्वांना शुभ दसरा
  • आपट्याची पानं त्याला
   ह्रदयाचा आकार
   मनाचे बंध
   त्याला प्रेमाची झंकार
   आनंदाच्या क्षणांना
   सर्वांचा रुकार
   तुम्हा सर्वांना माझ्या व माझ्या
   परिवाराकडून
   विजयादशमी व दसरा निमित्त मन:पूर्वक
   शुभेच्छा!
  • दसऱ्याच्या या शुभदिनी तुमचे आयुष्य सुख-समाधानाचे- आनंदाचे
   भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…
   हि सदिच्छा!
  • चेहरा ठेवा हसरा कारण सण आहे दसरा…
   दसरा तुम्हा सर्वांना हसरा जावो, ही देवाचरणी प्रार्थना
   विजयादशमी आणि दसऱ्याच्या शुभेच्छा!
   सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा…. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

  मित्रमैत्रिणींसाठी वाढदिवसाचे प्रेमळ शुभेच्छा संदेश - Birthday Wishes For Friend In Marathi

  दसरा स्टेटस मराठी (Dussehra Status In Marathi)

  सोशल मीडिया हा हल्ली सगळ्यांचाच आवडीचा विषय. एकेकाला मेसेज पाठवता आला नाही तर स्टेटस ठेवून आपण सगळ्यांपर्यंत शुभेच्छा पोहचवू शकतो.

  • बाहेरच्या नाही तर आतल्या रावणाला जाळा… आणि मगच दसरा साजरा करा
  • आज आहे दसरा… सोनं देणं आणि घेण्याचा… सोन देताना मनात देण्याची भावना ठेवा आणि आनंदोत्सव साजरा करा.
  • सत्याचा विजय आणि असत्याची हार… हाच संदेश देतो दसरा हा सण 
  • राम बनून मर्यादा आणि मान राखा… कायम सत्याचा मार्ग अवलंबून जिंका
  • लाल जास्वंद, पिवळा तुरा, सोनचाफा दरवळला,
   दसरा आला, झेंडू हसला आणि म्हणाला शुभ दसरा!
  • आनंदाने भरु दे तुमचे आयुष्य भरभराटीने उजळू दे तुमचे आयुष्य! शुभ दसरा
   तुमच्या व तुमच्या सगळ्या कुटुंबियांना दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा!
  • वाईटाचा नाश होवो…  चांगले दिवस होवो… दसऱ्याच्या शुभेच्छा!
  • उत्सव आला आनंदाचा… एकमेकांना आनंद देण्याचा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
   आज सोनियाचा दिनू… करा आनंदोत्सव साजरा… विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

  तुम्हा सर्वांना दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!