नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, मित्रपरिवासाठी खास संदेश (Navratri Wishes In Marathi)

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, मित्रपरिवासाठी खास संदेश (Navratri Wishes In Marathi)

भारतात एकूण तीन नवरात्रौत्सव साजरे केले जातात. मात्र त्यातील शारदीय नवरात्रौत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. यात नऊ दिवस देवीची पूजा केली जाते. नऊ दिवसाचे नऊ रंग, देवीची पूजा आणि ओटी भरणे, आरती करणे आणि देवीसमोर गरबा सादर करणे असा उत्साहाचा रंग असतो.देवीची घटस्थापना घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणीदेखील केली जाते.शिवाय हा सण महाराष्ट्राप्रमाणेच संपूर्ण भारतातही तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो. यंदा या सणावरही कोरोनाचे सावट आहे. मात्र नातेवाईक, मित्रमंडळी, सहकाऱ्यांना शुभेच्छा संदेश पाठवून अगदी साधेपणानेही हा सण नक्कीच साजरा केला जाऊ शकतो. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत मराठीतून नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा (Navratri Shubhechha in marathi) देणारे काही खास संदेश

Table of Contents

  नवरात्रौत्सवासाठी खास शुभेच्छा (Navratri Wishes In Marathi)

  Canva

  तुमच्या जवळच्या खास मंडळींना नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास संदेश...

  १.शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना  सुख, समृद्धी, समाधान व यश प्राप्तीसाठी आर्शीवाद देवो हीच देवीचरणी प्रार्थना... नवारात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

  २.नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, आई जगदंबेची कृपा आपणावर सतत राहो हीच देवी चरणी प्रार्थना 

  ३.माता लक्ष्मी सर्वांच्या घरी वास करो आणि सर्वांना सुख, समृद्धी, यश, ऐश्वर्य भरभरून मिळो हीच देवीकडे प्रार्थना....नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

  ४.नवरात्रीच्या या मंगल समयी देवी तुम्हाला सुख, समाधान, आनंद आणि यश प्रदान करो... तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो... हीच देवीकडे प्रार्थना... शुभ नवरात्री !

  ५.घटस्थापना आणि आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

  ६.घटस्थापना आणि नवरातौत्सवाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा

  ७.माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सतत बरसत राहो आणि तुमचे जीवन आनंदमय होवो हीच मातेकडे प्रार्थना... नवरारात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

  ८.नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा... यंदा सर्व भक्तांवर मातेची कृपादृष्टी राहो आणि सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना

  ९.दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता, शांती, ज्ञान, सेवाभाव, नावलौकीक, आरोग्य आणि ऐश्वर्य या नऊ गोष्टींची वर्षाव करो आणि हा नवरात्रौत्सव तुमच्यासाठी खास ठरो हीच प्रार्थना, नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

  १०.जे जे चांगलं, जे जे शुभ, जे जे हितकारक, जे जे आरोग्यदायी, जे जे ऐश्वर्यसंपन्न ते सर्व तुम्हााला मिळो हीच मातेचरणी प्रार्थना. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

  ११. नवरात्री म्हणजे
  न - नवचेतना देणारी
  व - विघ्नांचा नाश करणारी
  रा - राजसी मुद्रा असलेली
  त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी 
  माता तुमच्यावर सुख, समाधान, ऐश्वर्याची बरसात करो... नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

  १२.माता दुर्गा तुमच्या सर्व समस्या आणि दुःखाचे नाश करून तुम्हाला सुख, समाधान आणि आनंद देवो हीच देवीकडे प्रार्थना... शुभ नवरात्री !

  १३. दुर्गामातेच्या आगमनाने वातावरणात निर्माण झालेला उत्साह आणि आनंद असाच कायम राहो… हीच देवीकडे प्रार्थना… शुभ नवरात्री !

  १४. तूच लक्ष्मी, तूच दुर्गा, तूच भवानी
  तूच अंबा, तूच जगदंबा, तूच जिवदानी … 
  एकच शक्ती अनेक रूपांतूनी तुच जगी अवतरली…
  शुभ नवरात्री !

  १५. स्त्रीला आदराने, मानसन्मानाने वागवतात त्यांच्या मनातच लक्ष्मीमाता वास करते…. शुभ नवरात्री!

  नवरात्रीसाठी स्टेटस (Navratri Status In Marathi)

  Canva

  सोशल मीडियावर अथवा व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत असाल तर हे नवरात्रीसाठी खास स्टेटस तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील. 


  १.जय शारदे वागीश्वरी, विधिकन्यके विद्याधरी, जोत्स्नेपरी कांती तुझी, मुख रम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या  हास्यातुनू चारी युगांची पौर्णिमा, तुझिया कृपेचे चांदणे, नित वर्षु दे अमुच्या शिरी
  शुभ नवरात्री !

  २.सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते...

  ३.या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता... नमस्तस्यै नमस्तयै नमस्तस्यै नमो नमः 
  नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा...

  ४. जयोत्सुते हे उषा - देवते, देवि दयावति महन्मंगले, रुचिर - यौवना रूप सुंदरा, जगन्मोहिनी अरूण रंजिते 

  ५. टिपऱ्या आणि टाळ्यांचा गजर, आईच्या भक्तीचा जागर...नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

  ६. चमचमती चांदण्या, उजळला चांदवा, टिपरीवर वाजे टिपरी, तुझ्या साथीने रास नवा... नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

  ७. तांबडं फुटलं, उगवला दिन, सोन्याने सजला दसऱ्याचा दिन

  ८. शुभदसरा... सर्वांना नवरात्री आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 

  ९. आपटयाची पानं नाही मिळाली म्हणून खरं सोनं पाठवलंय...दसरा सण मोठा आनंदाला नाही तोटा !

  १०. दिन आला सोनियाचा, भासे पृथ्वी सोनेरी
  फुलो जीवन आपले येवो आयुष्याला सोन्याची झळाळी
  दसऱ्यानिमित्त शुभेच्छा !

  ११. सीमा ओलांडून आव्हानांच्या, गाठू शिखर यशाचे!
  प्रगतीचे सोने लुटून, सर्वांना आनंद वाटायचे !! 
  विजयादशमशीच्या हार्दिक शुभेच्छा...

  १२. वाईटावर चांगल्याची मात म्हणजे दसरा....विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 

  १३. आज सकाळपासून दसऱ्याच्या शुभेच्छा आल्या आहेत ढीगभर.... लोकांच्या मनात माझी आठवण आजही आहे मूठभर..शुभ विजयादशमी

  १४. झेंडूची फुले आहेत केशरी,
  पानाफुलांचे तोरण दारी
  कृतज्ञतेची शाल लेवून न्यारी
  सुरू झाली  घरी विजयादशमीची तयारी 

  १५. आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार
  मनाच्या बंधाला प्रेमाचा झंकार
  सुखद क्षणांना सर्वांचा रुकार...विजयादशमीचिया निमित्ताने करा माझ्या शुभेच्छांचा स्वीकार

  नवरात्रीसाठी शुभेच्छा संदेश (Navratri Messages In Marathi)

  Canva

  नवरात्रीनिमित्त प्रियजनांना मोबाईलवर अथवा सोशल मीडियावर मेसेज पाठवण्यासाठी तुम्हाला हे संदेश नक्कीच फायदेशीर आहेत.

  १.विश्व जिला शरण आले त्या शक्तीला शरण जाऊया... नवरात्रीच्या मंगल दिनी भवानीचे स्मरण करू या 
  नवरात्रीच्या शुभेच्छा 

  २.नवरात्रौत्सव 2020 च्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा…

  ३.शारदीय नवरात्रौत्सवाच्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

  ४.आई अंबेच्या कृपेने आपणांस आरोग्य, सुख , शांती आणि  समाधान लाभो हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना... शुभ नवरात्री !

  ५. घरात चालती बोलती लक्ष्मी पाणी भरते आहे,
  अन्नपूर्णा होऊन भोजन बनवत आहे,
  गृहलक्ष्मी होऊन कुटुंबाला सांभाळते आहे, 
  सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेत आहे,
  दुर्गा होऊन संकटांशी सामना करत आहे,
  कालिका, चंडिका होऊन घराचे रक्षण करत आहे,
  तिची पूजा नको पण स्त्री म्हणून सन्मान व्हावा,
  यंदा देवी फक्त देव्हाऱ्यात नाही तर मनातही बसवा,
  मूर्तीसोबत घरच्या लक्ष्मीचाही आदर करा,
  हेच आहे नवरात्रौत्सवाचे सार
  शुभ नवरात्री !

  ६. उदो बोला उदो... अंबाबाईचा उदो... नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 

  ७. नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा....  आई अंबाबाईची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो

  ८. जन्माोजन्मी  तुम्हाला आईच्या भक्तीचे सौभाग्य लाभो हीच देवीचरणी प्रार्थना... शुभ नवरात्री !

  ९. नवरात्री आणि विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा!

  १०. रम्य सकाळी किरणे सौज्वळ आणि सोनेरी
  सजली दारी तोरणे ही साजिरी
  उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हासरा 
  उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा... विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 

  ११. तोरण बांधू दारी
  रांगोळी रेखू अंगणी
  उधळण करू सोन्याची
  नाती जपू मनांची
  विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा 

  १२. झेंडूचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ द्या घरी, पूर्ण होऊ द्या तुमच्या सर्व इच्छा... विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा

  १३. मुहूर्त हसरा नवसंकल्पांचा, सण दसरा हा उत्कर्षाचा,
  चैतन्यास संजीवनी लाभोनी, होवो साजरा मनी, उत्सव तो नवहर्षाचा... विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा

  १४. जीवनाच्या प्रत्येक वाटेवर तुम्हाला विजय मिळो आणि तुमच्या परिवाला आनंद... विजयादशमीच्या शुभेच्छा!

  १५. नवी पहाट, नवी आशा
  तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा नवी दिशा
  नवे स्वप्न नवीन आकांक्षा
  विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा... 

   

   

   

  नवरात्रीसाठी देवीची आरती (Navratri Aarti In Marathi)

  Canva

  देवीची जितकी रूपं तितक्या आरत्या आहेत. यातील काही प्रसिद्ध आरत्या तुमच्यासाठी आम्ही शेअर करत आहोत.

  १. दुर्गादेवीची आरती 
  दुर्गे दुर्गट भारी तुजविण संसारी|
  अनाथनाथे अंबे करूणा विस्तारी ||
  वारी वारी जन्म मरणांचे वारी | 
  हारी पडलो आता संकट निवारी |
  जय देवी  जय देवी महिशासुरमथिनी |
  सुरवर ईश्वर वरदे तारक संजीनी ||

  २. महालक्ष्मीमातेची आरती 
  जय देवी जय देवी जय महालक्ष्मी |
  वससी व्यापकरूपे तू स्थूलसूक्ष्मी ||
  करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता |
  पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता |
  कमलाकारें जठरी जन्मविला धाता |
  सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां ||

  ३. श्री नवरात्र वासिनीची आरती 
  आश्विन शुद्ध पक्षीं अंबा बैसलि सिंहासनी हो|
  प्रतिपदेपासुनी घटस्थापना ती करूनि हो |
  मूलमंत्रजप करूनि भोंवते रक्षक ठेवूनी हो
  ब्रम्हाविष्णु रूद्रआईंचे पूजन करती हो ||
  उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो|
  उदोकारें गर्जंती काय महिमा वर्णु तिचा हो|
  उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ||

  ४. श्री एकविरा आईची आरती 
  आरती एकविरा देवी देई मज वरा|
  शरण मी तुजलागी देई दर्शन पामरा|
  कार्लागडी वास तुझा भक्त सह्याद्रीच्या पायी|
  कर्मदृष्टीने पाहूनी सांभाळीसी लवलाही |
  आरती एकविरा देवी देई मज वरा|
  शरण मी तुजलागी देई दर्शन पामरा||

  देवीची गाणी (Navrati Songs In Marathi)

  आपल्याकडे अनेक देवींच्या रूपांची भक्तीभावाने उपासना केली जाते. त्यामुळे चित्रपट आणि गीतांमध्येही देवीची आरती, जागर आणि आळवणी करण्यात आलेली आहे. नवरात्रीनिमित्त तुमच्यासाठी खास ही देवीची गाणी.

  १. जय शारदे वागीश्वरी

  गीतकार - शांता शेळके

  संगीतकार - श्रीधर फडके

  गायिका - आशा भोसले

  शारदादेवीचे वर्णन या गाण्यातून शांताबाईंनी केलेले आहे. शारदा देवी म्हणजे सरस्वती माता... नवरात्रीत शालेय जीवनात केलेल्या सरस्वती पूजनाने मराठी संस्कृतीत खऱ्या अर्थाने ज्ञानार्जनाला सुरूवात होते. अणोघ वक्तृत्व असलेल्या व्यक्तीला जीभेवर सरस्वती नांदते असं म्हणतात. अशा या ज्ञान देणाऱ्या देवीची उपासना या गाण्यातील सुंदर शब्दांनी केलेली आहे. एवढंच नाही तर आशाबाईंनी आपल्या सुरेल स्वरांनी या गाण्याला स्वरताज चढवलेला आहे. 

  २. आई भवानी तुझ्या कृपेने

  गीतकार - अजय अतुल

  संगीतकार - अजय अतुल

  गायक - अजय गोगावले

  चित्रपट - सावरखेड एक गाव

  आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला... अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला… आई कृपा करी माझ्यावरी, जागवितो रात सारी... आज गोंधळाला ये… हा एक लोकगीत म्हणजेच गोंधळगीताचा प्रकार आहे. सावरखेड एक गाव या  चित्रपटातील एका सीनमध्ये गोंधळ हा लोकगीताचा प्रकार सादर करण्यात आला होता. त्यातील हे गीत असून हे गाणं खूपच लोकप्रिय झालं होतं. या गाण्याचे बोल, संगीत आणि गायन अजय - अतुल या मराठीतील सुप्रसिद्ध संगीतकार जोडीने केलेले आहे. अजय - अतुलचा कोणताही लाईव्ह परफार्मन्स या गाण्याशिवाय पूर्णच होत नाही इतकं या गाण्याला प्रेम मिळालेलं आहे. यात देवीचा जागर केलेला आहे. त्यामुळे नवरात्रीतही हे गाणं देवीच्या जागरासाठी आवर्जून लावलं जातं.

  3 . माय भवानी तुझे लेकरू

  गीतकार - सुधीर मोघे

  संगीतकार - मीना खडीकर

  गायक - लता मंगेशकर

  चित्रपट - शाब्बास सूनबाई

  हे गीत एक भक्तीगीत असून यात भवानी मातेची आळवणी केलेली आहे. साब्बास सूनबाई या चित्रपटातील हे गीत असून हे गीत अभिनेत्री अश्विनी भावे यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं आहे. गाण्याचे बोल इतके परिपूर्ण आहेत की त्यातून भवानी मातेशी आपले असलेले माय-लेकरूचे नाते रेखाटण्यात आलेलं आहे. हे गाण्यामध्ये मातेच्या चरणांशी लीन होण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळे नवरात्रीत हे गाणं हमखास लावले जाते. 

  ४. लल्लाटी भंडार

  संगीतकार - अजय -अतुल

  गीतकार - अतुल गोगावले

  चित्रपट - जोगवा

  जोगवा या  चित्रपटात यल्लमा देवीला जोगव्याच्या रूपात योडलेल्या मुला-मुलींच्या जीवनात काय घडतं याचा वेध घेतलेला आहे. अशा सोडलेल्या मुलांना जोगता तर मुलींना जोगतीण असं म्हणतात. या चित्रपटात एक जोगवा गीत मुक्ता बर्वे आणि उपेद्र लिमये यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं आहे. जोगवा हा लोकसंगीताचा एक प्रकार असल्यामुळे हे गीत आजही कोणत्याही लोकसंगीताच्या कार्यक्रमात आवर्जून सादर केलं जातं. 

  ५. एकविरा आई तू डोंगरावरी

  संगीतकार - वेसावकर आणि मंडळी

  गायक - वेसावकर आणि मंडळी

  गीतप्रकार - कोळीगीत 

  कार्ला येथील एकविरा माता ही कोळ्यांची देवी आहे. त्यामुळे या गीतातून कोळीबांधव आपलं मागणं तिच्याकडे मागतात. हे गाणं कोळीगीताचा प्रकार असल्यामुळे अनेक कोळीनृत्यांमध्ये अथवा लोकसंगीसाठी हे गाणं लावलं जातं. यात एकविरा मातेची आळवणी करण्यात आलेली आहे. एकविरा मातेचे भक्त आजही नवरात्रीत उंच डोंगरावरील देवीची भक्ती भावाने ओटी भरण्यासाठी जातात. त्यामुळे नवरात्रीत हे गाणं नृत्यासाठी आणि भक्तीसाठी नक्कीच  ऐकलं जातं.