जेव्हा लिव्हिंग रूमच्या फर्निचरबद्दल विचार केला जातो तेव्हा सर्वात पहिल्यांदा आपल्या डोक्यात येतो तो म्हणजे सोफा. कोणत्याही घरात लिव्हिंग रूममध्ये सोफ नाही असं हो नाही. साधारणतः प्रत्येक घरात एक सोफा असतोच जिथे आलेल्या पाहुण्यांना बसता यावं याची व्यवस्था करण्यात येते. पण असाही सोफा असतो जिथे तुम्ही बसण्याचा उपयोग करता तिथे रात्री झोपण्याचीही व्यवस्था करता येते. हल्ली मल्टिपर्पज अर्थात अनेक उपयोग करता येतील अशा प्रकारचे फर्निचर निर्माण होणं वाढलं आहे. अशा प्रकारचे सोफा खरेदी करण्याकडे लोकांचाही कल वाढला आहे. हे वेगवेगळ्या तऱ्हेने वापरण्यात येते. याचे वैशिष्ट्य हे असते की या सोफ्याला कमी जागा लागते आणि तुमच्या सर्व गरजा भागवते. तुमचं घर जर लिव्हिंग रूमपेक्षाही लहान असेल तर तुम्ही सोफा कम बेड नक्कीच आपल्या घरामध्ये आणू शकता. यामुळे तुम्ही दिवसभर याचा वापर सोफ्याप्रमाणे करू शकता आणि रात्री याचा वापर बेडप्रमाणे झोपायला होतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशाचा काही सोफा कम बेडच्या डिझाईन्स सांगणार आहोत ज्याचा तुम्ही घरात वापर करून घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूमला आधुनिक लुक अर्थात मॉडर्न लुक देऊ शकता.
वायब्रंट कलर्सचा करा वापर
तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूमला जर एलिगंट आणि मॉडर्न लुक देणार असाल तर तुम्हाला सोफा कम बेडची निवड करताना रंगाचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. वायब्रंट कलर्स अर्थात डोळ्याला सुखकारक ठरणारे असे रंग तुम्ही लिव्हिंग रूमच्या डेकोरेशनसाठी जास्त चांगले वाटतात. तसंच दिसायलाही क्लासी दिसतात. मुळात तुम्ही सोफा कम बेडचा वापर जास्त करता हे तुम्हाला लक्षात घ्यायला हवं. तसंच हे लिव्हिंग रूममध्ये ठेवल्याने धूळ आणि मातीही जास्त त्यावर बसणार हेदेखील साहजिक आहे. त्यामुळे लवकर हा सोफा कम बेड खराब होऊ नये म्हणूनही तुम्ही या वायब्रंट कलर्सचा वापर करावा. यामुळे लिव्हिंग रूमला अधिक शोभा येते आणि अधिक आकर्षक दिसते.
टॉप 10 आयडियाजमुळे तुमचं बेडरूम दिसेल अधिक सुंदर!
वुडन लुक दिसेल अधिक सुंदर
सोफा कम बेडमध्ये तुमच्या बेडरूमला वुडन लुक अधिक चांगला दिसू शकतो. तसं तर सोफा तयार करताना लाकडाचाच वापर होतो. पण तुम्ही अशा सोफा कम बेड निवडू शकता ज्याची मागची बाजूही वूडन असेल आणि दिसायला अधिक आकर्षक आणि आधुनिक दिसेल. यामुळे घराच्या लिव्हिंग रूमला अधिक शोभा येते आणि सोफा कम बेड जास्त काळ टिकतो. तसंच लिव्हिंग रूमचा लुक अधिक सुंदर आणि क्लासी दिसतो. त्यामुळे तुम्ही सोफा कम बेडची निवड करताना या गोष्टीचा नक्की विचार करावा आणि ही गोष्ट लक्षात ठेऊन त्याप्रमाणे लिव्हिंग रूम सजवावी. तसंच यामध्ये अधिक सामान ठेवण्याची क्षमताही असते. इतर सामान आत राहून तुमच्या घरातील जागा मोकळी राहते.
बेडरूम आकर्षक बनविण्यासाठी करा या गोष्टींचा वापर, सोप्या टिप्स
एल शेप्ड सोफा कम बेड
तुम्हाला जर वाटत असेल की सोफा कम बेडमध्ये काहीच डिझाईन्स आहेत तर तुम्ही नक्कीच चुकीचा विचार करत आहात. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार अनेक डिझाईन्स तयार करूनही घेता येतात. तुमचे लिव्हिंग रूम मोठे असेल अथवा घरात राहणाऱ्यांची संख्या अधिक असेल तर तुम्हाला मोठ्या आकाराता सोफा कम बेड नक्कीच लागणार. मग अशावेळी तुम्ही एल शेप्ड सोफा कम बेड तयार करून घेऊ शकता. याने घरातील जागा कमी अडते आणि सोफ्यावर मात्र बसायला जास्त जागा मिळते. तसंच तुम्हाला या बेडमध्ये सामानही जास्त प्रमाणात स्टोअर करून ठेवता येते.
घरात राखायची असेल सुखशांती तर जाणून घ्या काय करायचे उपाय Vastu Tips For Home In Marathi
या गोष्टीची घ्या काळजी
जेव्हा तुम्ही सोफा कम बेडची खरेदी करणार असाल तेव्हा काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचे आहे. उदाहरणार्थ तुम्ही सोफ्याच्या कपड्याकडे लक्ष द्याल तेव्हा गादी आणि सोफ्याच्या दर्जाचाही विचार करा. तुम्हाला जर याकडे लक्ष नाही देता आलं तर सोफा कम बेड लवकर खराब होतो. त्यामुळे चांगल्या दर्जाचाच सोफा कम बेड घ्या. त्याशिवाय सोफा कम बेडमध्ये बऱ्याचदा सामान ठेवायला कमी जागा असते. ती जागा नीट पडताळून घ्या. रेडीमेड घेण्यापेक्षा तुम्हाला तुमच्या गरजांनुसार सोफा कम बेड बनवून घेणं जास्त चांगला पर्याय आहे.
You Might Like These:
मुलांच्या बेडरूमसाठी वास्तू टीप्स
Home Remedies To Get Rid Of Rats In Marathi
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक