ADVERTISEMENT
home / Care
ग्लोबल हेअर कलर म्हणजे काय आणि तो कोणी करावा?

ग्लोबल हेअर कलर म्हणजे काय आणि तो कोणी करावा?

हेअर कलर करणे हा सध्याचा ट्रेंड आहे. पूर्वी पांढरे केस काळे करण्यासाठी फक्त केस रंगवले जात होते. पण आता मात्र लुक बदलण्यासाठी केसांना रंग केला जातो. केसांना रंग करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. हल्ली ग्लोबल कलर आणि हायलाईट्स असे दोन प्रकार करुन पाहा असे स्टायलिस्ट कडून सांगितले जाते. पण ग्लोबल कलर म्हणजे काय तो कोणी करावा आणि रंगाची निवड कशी करावी. या केसांच्या महत्वाच्या गोष्टी आज आपण जाणून घेऊया.

घरगुती हेअर मास्कने करा घरच्या घरी हेअर स्पा

ग्लोबल कलर म्हणजे काय?

ग्लोबल कलर

Instagram

ADVERTISEMENT

 ग्लोबल ही केसांना रंग करण्याची एक पद्धत असून यामध्ये रुट ते टिपपासून केसांना एकच रंग दिला जातो. केसांना रंग देण्याची ही पद्धत पांढऱ्या रंगाना काळे करण्याची नसते. पण तुमची स्किनटोन उठावदार दिसण्यासाठी योग्य अशा रंगाची निवड केली जाते. ग्लोबल कलर केल्यामुळे तुमच्या लुकमध्ये नक्कीच फरक पडतो.  ग्लोबल रंग हा त्यामुळे इतर हेअर कलरपेक्षा वेगळा दिसतो. 

हेअर कलर करायचा विचार करताय, तुमच्या राशीनुसार निवडा या शेड

असे केले जाते ग्लोबल हेअर कलर

  • स्किनटोनला साजेसा असा रंग निवडला जातो. 
  • तुमचे केस पांढरे झाले असतील तर त्यावर योग्य पद्धतीने रंग लागण्यासाठी तसे सेक्शन निवडले जातात. त्यानुसारच रंग लावला जातो. केसांना रंग येण्यासाठी त्याला अपेक्षित वेळेसाठी ठेवला जातो.
  • काही जणांच्या क्राऊनजवळील भागाकडचे केस पांढरे झालेले असतात किंवा पातळ झालेले असतात अशावेळी अशा भागाकडील केसांना ग्लोबल कलर केले जाते.
  • ग्लोबल हेअर कलर करताना तुम्ही कोणाकडून करुन घेत आहात ते देखील जाणून घ्या. कारण हेअर कलर करणाऱ्यांना ग्लोबल हेअर कलर करण्याची योग्य माहिती हवी. तरच तुमचे केस ग्लोबल केल्यानंतर चांगले दिसतात. 
  • ग्लोबल कलर केल्यानंतर केसांची काळजी घेणेही गरजेचे असते. कारण असे केले नाही तर तुमचे केस कोरडे होण्याची शक्यता असते. 

आयब्रोज कलर करण्यासाठी नैसर्गिक उपाय

कोणी करावे ग्लोबल हेअर कलर

ग्लोबल हेअर कलर

ADVERTISEMENT

Instagram

ग्लोबल हेअर कलर हे कोणी करावे हा प्रश्न तुम्हाला पडल असेल तर  तुम्ही या काही पॉईंटसकडेही लक्ष द्यायला हवे. 

  • तुम्हाला तुमचा लुक बदलायचा असेल तर तुम्ही ग्लोबल हेअर कलर करु शकता. 
  • जर तुमचे केस पांढरे झाले असतील पण त्यांना पूर्ण कलर करण्याऐवजी तुम्हाला थोडासा वेगळा आणि नॅचरल लुक हवा असेल तर तुम्ही ग्लोबल कलर करु शकता.
  • ग्लोबल हेअर कलर करताना तुमचा केसांचा रंग बदलता येतो. केसांचा रंग बदलण्याची तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही ग्लोबल हेअर कलर करायला हवा. 
  • केसांचा रंग बदल्यानंतर तुमची पर्सनॅलिटी फार वेगळी दिसते. तुमचे दिसणे तुमच्या प्रोफेशनसाठी फार महत्वाचे असेल तरी देखील तुम्ही हा वेगळा प्रकार नक्की ट्राय करु शकता. 

ग्लोबल कलरचा साधारण  खर्च हा 5 ते 7  हजार रुपयांच्या घरात असतो. तुम्ही त्याची जितकी काळजी घ्याल तितका तुमचा रंग जास्त टिकतो. 

29 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT