हेअर कलर करायचा विचार करताय, तुमच्या राशीनुसार निवडा या शेड

हेअर कलर करायचा विचार करताय, तुमच्या राशीनुसार निवडा या शेड

राशीनुसार तुमचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व ठरत असतं. मात्र एवढंच नाही तर या राशींचा तुमचे कपडे आणि इतर गोष्टींवरही परिणाम होत असतो. जर तुम्ही नियमित हेअर कलर करत असाल तर त्याची शेड निवडण्यासाठीही तुम्ही राशी आणि त्यानुसार होणाऱ्या परिणांमाचा विचार करू शकता. तुमच्या हेअर कलरच्या शेडचा तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर प्रभाव पडतो. यासाठीच अशी हेअर शेड निवडा ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व तर उठून दिसेलच शिवाय ती शेड तुमच्यासाठी लकीसुद्धा ठरेल. 

मेष - (21 मार्च - 19 एप्रिल)

मेष राशीच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास भरपूर असतो. त्यामुळे त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वानुसार आणि चेहऱ्याच्या शेपनूसार रेड वेलवेट या हेअर कलरची शेड निवडावी. ज्यामुळे त्यांची सामाजिक, व्यवसायिक, राजकीय क्षेत्रात प्रगती होईल. शिवाय लाल रंग प्रेमाचे प्रतिक असल्यामुळे या रंगामुळे तुमच्या प्रेमसंबध चांगले होतील.

Instagram

वृषभ - ( 20 एप्रिल - 20 मे)

जर तुम्ही वृषभ राशीच्या असाल तर तुमच्यासाठी ब्लॅक चेरी हा शेड उत्तम ठरेल. या रंगामुळे तुमची निर्णय क्षमता बळकट होईल. वृषभ राशीच्या व्यक्ती त्यांच्या  निर्णयावर ठाम असतात. तुमच्या शानदार व्यक्तिमत्वाला या रंगामुळे आणखी शाइन मिळेल. तुमचा राशीस्वामी शुक्र असल्यामुळे या रंगामुळे तुमच्या सकारात्मक विचार सरणीत आणि ऐश्वर्यात यामुळे भरभराट होईल.

Instagram

मिथुन - (21 मे - 21 जून)

मिथुन राशीच्या मुलींसाठी लाईटब्राऊन अथवा टोस्टेड कोकोनट हा हेअर कलर उठून दिसेल. तुमच्या राशीस्वामी बुधमुळे या रंगातील लाभ तुम्हाला मिळू लागतील. तुमचे सर्व बाजूने कल्याण होण्यासाठी हा हेअर कलर शेड तुमच्या नक्कीच फायद्याचा ठरेल.

Instagram

Beauty

L'Oreal Paris Casting Creme Gloss Hair Color

INR 550 AT L'Oreal Paris

कर्क - (22 जून - 22 जुलै)

कर्क राशीच्या मुलींसाठी निळसर रंगाची हेअर कलर शेड लकी ठरू शकते. कारण तुमचा राशीस्वामी चंद्र आहे. आजकाल निळ्या रंगाच्या शेडमध्ये अनेक हेअर कलर बाजारात मिळतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या रंग आणि फेसशेपनुसार त्यातील शेड निवडू शकता.

Instagram

सिंह - (23 जुलै- 22 ऑगस्ट)

जर तुमची रास सिंह असेल तर तुम्हाला  हेअर कलर निवडताना खास लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्यााठी नियॉन सी ग्रीन शेड शुभ ठरू शकतो. ज्यामुळे तुम्हाला  सुर्य आणि मंगळ या दोन्ही ग्रहांचा शुभलाभ मिळेल.

Instagram

कन्या - (23 ऑगस्ट - 22 सप्टेंबर)

कन्या राशीचे लोक सोनेरी रंगाची शेड हेअर कलरसाठी निवडू शकता. कारण हा रंग तुमच्या राशीसाठी शुभ आहे. शिवाय यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये चांगली भर पडेल. बुध राशीमुळे हा रंग तुमची सकारात्मक विचारशक्ती वाढवेल.

Instagram

तूळ - (23 सप्टेंबर - 22 ऑक्टोबर)

तूळ राशीच्या व्यक्तीने केसांना नेहमी पेस्टल पिंक शेडचा हेअर कलर लावावा. कारण हा रंग तुमच्या व्यक्तिमत्वाला सूट होईल. शिवाय तुमच्या राशीतील शुक्राच्या प्रभावामुळे या रंगातून तुम्हाला नेहमीच चांगला लाभ मिळेल.

Instagram

वृश्चिक - (23 ऑक्टोबर - 21 नोव्हेंबर)

वृश्चिक राशीचे लोक केसांना मल्टी शेड्स हेअर कलर करू शकतात. ज्यामुळे त्यांचा मंगळ अधिक प्रबळ होईल. शिवाय सध्या अशी मल्टीशेडची फॅशनही आहेच. तुमचे व्यक्तिमत्व त्यामुळे उठून दिसेल.

Instagram

धनु - (22 नोव्हेंबर - 21 डिसेंबर)

धनु राशीच्या लोकांना नेहमीच अॅटव्हेंचर आवडत असते. यासाठीच त्यांनी केसांना रंगवण्यासाठी प्लॅटिनम ब्लॉंड ही शेड निवडावी. हा रंग तुमच्या व्यक्तिमत्वाला साजेसा आहे. ज्यामुळे तुम्हाला जीवनात नेहमी काहीतरी साहसी करण्यासाठी प्रेरणा मिळेल.

Instagram

मकर - (22 डिसेंबर - 19 जानेवारी)

जर तुमची रास मकर असेल तर तुम्ही केसांना डार्क ब्राऊन शेडने कलर करू शकता. कारण कॉफी ब्राऊन कलर तुमच्या व्यक्तिमत्वाला सूट होईल. तुमच्या राशीसाठी हा रंग नक्कीच शुभ ठरू शकतो.

Instagram

कुंभ - (20 जानेवारी - 18 फेब्रुवारी)

तुम्ही कुंभ राशीच्या असाल तर तुम्ही हिडन रेनबो ही शेड तुमच्यासाठी निवडा. कारण यामुळे तुमचे व्यक्तिमत्व अधिक खुलून येईल. तुमचा लुक परफेक्ट दिसण्यासाठी आणि तु्म्हाला हेअर कलर लकी ठरण्यासाठी ही शेड फायद्याची ठरेल.

Instagram

मीन - ( 19 फेब्रुवारी - 20 मार्च)

मीन राशीच्या मुलींनी केसांना ग्रीन शेडमधील हेअर कलर करावा. कारण तुमचा राशीस्वामी गुरू अ्सून यामुळे तुम्हाला चांगला लाभ मिळेल. शिवाय यामुळे तुमचे सौंदर्य अधिक उठून दिसेल. तुमच्यासाठी साहसाला प्रोत्साहन देण्यासाठी हा रंग उत्तम आहे. 

Instagram