हिवाळ्यात ही हंगामी फळं खाण्यामुळे पडणार नाही आजारी, जाणून घ्या फायदे

हिवाळ्यात ही हंगामी फळं खाण्यामुळे पडणार नाही आजारी, जाणून घ्या फायदे

आरोग्य ही आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पण कोरोनामुळे तिचं महत्त्व आता सर्वांनाच पटू लागलं आहे. एवढंच नाही तर आजारी पडू नये म्हणून प्रत्येक जण प्रतिकारशक्ती कशी वाढेल याचाच विचार करताना दिसत आहे. हिवाळ्यात इनफेक्शन टाळायचं असेल तर प्रतिकारशक्ती वाढवून मजबूत करायला हवी. इनफेक्शनपासून दूर राहण्यासाठी काढा, ज्युस आणि ग्रीन टी पिण्यावर भर द्यायला हवा. मात्र यासाठी आहारात योग्य फळांचा समावेश करणंदेखील तुमच्या फायद्याचं ठरेल. यासाठीच तज्ञ्जांच्या सल्ल्यानुसार अशी फळं खा ज्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढेल आणि तुम्ही आजारी पडणार नाही. हिवाळ्यात मिळणाऱ्या  या हंगामी फळांमुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होईल. 

पेरू -

पेरू हे एक हंगामी फळ आहे. हिवाळा सुरू झाला की पेरूच्या सीझनलाही सुरूवात होते. पण पेरू फक्त तुमच्या आवडीचं फळ आहे म्हणूनच खाऊ नका तर हेही लक्षात ठेवा की ते तुमच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अॅंटि ऑक्सिंडट असतात. ज्यामुळे तुमच्या शरीराची प्रतिकार शक्ती दुप्पटीने वाढते. पेरू खाण्यामुळे तुमच्या शरीराला भरपूर फायबर्सदेखील मिळतात. ज्यामुळे तुमचे ह्रदय निरोगी आणि रक्तदाब संतुलित राहतो.

Shutterstock

संत्री -

संत्री हिवाळ्यात मुबलक प्रमाणात मिळतात. शिवाय त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी असतं. कोणतंही इनफेक्शन दूर ठेवण्यासाठी नियमित संत्री खाणं फायद्याचं ठरेल. कारण संत्री खाण्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि तुम्ही आतून मजबूत होता. जर तुम्हाला संत्री खाणं पसंत नसेल तर मिक्स ज्युसमधून संत्र्याच्या रस घ्या.

सफरचंद -

सफरचंद हे फळ बाराही महिने उपलब्ध असतं. शिवाय असंही म्हटलं जातं की, ' Apple a day keeps doctor away' थोडक्यात नियमित सफरचंद खाण्यामुळे तुम्ही आजारपणापासून दूर राहता. कारण सफरचंदामुळे तुमची इम्युन सिस्टिम मजबूत होते. शरीरात होणारा दाह, पित्त, जळजळ कमी होते. सफरचंदात पेक्टिन, फायबर्स, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे तुमचे योग्य पोषण होते.

Shutterstock

डाळिंब -

गोड आणि लालचुटूक डाळिंबाचे दाणे तुम्ही तुमच्या आहारातून नक्कीच घ्यायला आवडेल. पण एवढंच नाही तर डाळिंब खाणं तुमच्या आरोग्यासाठीदेखील नक्कीच चांगलं आहे. कारण डाळिंब खाण्यामुळे रक्त पातळ होतं, जे ह्रदयाचे आरोग्य राखण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आणि त्वचेची निगा राखण्यासाठी डाळींब खाणं उपयोगाचं आहे.

पेअर -

हिवाळ्यात पेअरदेखील मुबलक प्रमाणात मिळतात. पेअर खाण्यासाठी जितकं स्वादिष्ट लागतं तितकंच ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. लहान मुलांसाठीदेखील पेअर फायदेशीर ठरू  शकतं. हिवाळ्यात तुमच्या लहान मुलांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्यांना नियमित पेअर खायला द्या. पोटाच्या आतडयांसाठी पेअर उपयुक्त असतं. शिवाय त्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, अॅंटि ऑक्सिडंट, अॅंटि इन्फ्लैमटरी भरपुर प्रमाणात असतात. 

मौसंबी -

मौसंबी व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे आजारी माणसांच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी त्यांना मौसंबीचा ज्युस दिला जातो. त्यामुळे हिवाळ्यात आजारी पडू नये आणि प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी नियमित मौसंबी खाण्याची सवय लावा.