दोन आठवड्यात करा पोटाची चरबी कमी, 5 उत्तम व्यायामाने होईल सोपे

दोन आठवड्यात करा पोटाची चरबी कमी, उत्तम व्यायाम

बऱ्याचदा आपण पाहतो की काही महिला बारीक जरी असल्या तरी त्याचं पोट मात्र सुटलेलं असतं. असं लटकतं पोट कोणालाही नक्कीच आवडत नाही.  कोणत्याही कार्यक्रमात त्यामुळे नीट फॅशनही करता येत नाही. आजकालच्या लाईफस्टाईलमुळे पोटावरील चरबी वाढणं हे प्रमाणही वाढलं आहे. हाय कॅलरी फूड, आरामदायी जीवन, आवश्यकतेपेक्षा जास्त गोड खाणं, तणाव, चिंता या सगळ्या गोष्टींमुळे पोटातील अतिरिक्त चरबीमध्ये वाढ होते आणि तितकासा व्यायाम आपल्याकडून केला जात नाही. पण तुम्हाला जर पोटाची चरबी दोन आठवड्यात कमी करायची असेल तर तुमच्यासाठी हे खास व्यायाम आहेत. याचा उपयोग करून तुम्ही पोटाची चरबी कमी करू शकता. 

Beauty

WIPEOUT Sanitizing Wipes 25 Wipes Pack

INR 159 AT MyGlamm

नी प्लँक (Knee Plank)

feepik.com

या व्यायामासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सरळ होऊन झोपायचं आहे आणि मग आपले गुडघे वाकवून घ्या. त्यानंतर हात 90 डिग्री अँगलमध्ये मोडा आणि साधारण 45 सेकंद हा व्यायाम केल्यानंतर तुमच्या पोटाचे मसल्स चांगले होतात आणि तुमची फिगर योग्य आकारात येण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच तुमचे पोट लटकत असेल अथवा पोटावर जास्त चरबी जमली असेल तर हा व्यायाम प्रकार उत्तम मानला जातो. 

पोटावरील चरबी घटवण्यासाठी करा 4 सोपे उपाय

प्लँक एक्सरसाईज (Plank Exercise)

Freepik.com

प्लँक एक्सरसाईज करण्यामुळे तुम्हाला पोटाला मजबूती मिळते. हा व्यायाम तुम्ही रोज 45 सेकंद जरी केला तरी तुम्हाला त्याचा फायदा मिळतो. याचे वैशिष्ट्य हे आहे की, तुम्ही हा व्यायाम अगदी सहज करू शकता. यामध्ये  तुम्हाला तुमच्या शरीराचा सर्व भार हा हाताच्या कोपरावर आणि पायाच्या पंजावर ठेवायचा असतो. त्यानंतर तुम्हाला पुन्हा सामान्य स्थितीमध्ये यायचे असते. हा प्रयोग तुम्ही पाच सेट्समध्ये करू शकता. 

पोटाची चरबी वाढण्याची नक्की काय आहेत कारणं, जाणून घ्या

साईड प्लँक (Side Plank)

Freepik.com

या व्यायामासाठी तुम्हाला सुरूवातील संतुलन ठेवण्यास त्रास होऊ शकतो. पण तुम्ही रोज याचा सराव केल्यानंतर तुम्हाला हे नक्की जमते. हा व्यायामही तुम्ही किमान 45 सेकंद तरी करायला हवा. यासाठी तुमच्या डाव्या अथवा उजव्या बाजूला झोपा आणि मग  एक हात आणि हाताचा  कोपरा दुमडून पूर्ण शरीराचं वजन त्यावर टाका आणि मग शरीर उचला. जेव्हा शरीर वर उचलाल तेव्हा दुसरा हात कमरेवर ठेवा. यानंतर 45 सेकंद झाल्यावर तुम्ही सामान्य  स्थितीमध्ये या आणि मग दुसऱ्या बाजूनेही असेच करा. हा व्यायाम करताना लक्षात ठेवा की तुम्ही तुमचे शरीर जितके सरळ ठेवाल तितका तुमच्या पोटावरील चरबीवर परिणाम होईल. 

वेटलॉससाठी करून पाहा 'ही' योगासनं (Yoga For Weight Loss In Marathi)

जॅक नाईफ सीट अप्स (Jack Knife Sit Ups)

जॅक नाईफ सीट अप्स केल्याने तुमच्या पोटावरील चरबी पटापट कमी होण्यास मदत मिळते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीरावर जोर टाकणे आवश्यक आहे. हा व्यायाम दिवसातून तुम्ही किमान 30 सेकंद करायला हवा. यासाठी तुम्ही सर्वात आधी जमिनीवर झोपा. त्यानंतर हळूहळू हवेमध्ये पाय उचला आणि मग शरीराचा वरचा भाग वर घेऊन हाताने पाय धरण्याचा प्रयत्न करा. काही सेकंद झाल्यावर पुन्हा सामान्य स्थितीत या.

पोटासह हिप्सची चरबी कमी करण्यासाठी उत्तम योगासन

कोब्रा स्ट्रेच (Cobra Stretch)

Freepik.com

या व्यायामाला भुजंगासन असेही म्हणतात. हे करण्यासाठी तुम्ही पोटाच्या भागावर जमिनीवर झोपा. नंतर हात वर करून वर उठण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त डोकं वर करून पोटावर भार टाका. हा व्यायाम करताना दोन्ही पायांमध्ये कमीत कमी अंतर असेल याची काळजी घ्या. तसंच या व्यायामाच्या वेळी श्वास हळूहळू सोडा. नंतर पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या. तुम्ही रोज हा व्यायाम किमान 45 सेकंद केलात तर दोन आठवड्यात तुम्हाला याचे चांगले परिणाम दिसून येतील. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक