ADVERTISEMENT
home / Care
केसांसाठी कडुलिंबाचे फायदे

केसांसाठी कडुलिंबाचे फायदे (Benefits Of Neem For Hair In Marathi)

कडुलिंबामुळे अनेक शारीरिक आणि केसांच्या समस्यांपासून सुटका मिळते. अनादी काळापासून कडुलिंबाच्या पानांचा, तेलाचा आणि कडुलिंबाचा वेगवेगळ्या समस्यांसाठी उपयोग करण्यात येतो. कडुलिंब हे खरं तर औषधीय आहे. केसांना अधिक लांबसडक आणि घनदाट करण्यासाठी तुम्हाला कडुलिंबाचा उपयोग करून घेता येतो. याशिवाय कडुलिंबाचे नक्की काय फायदे आहेत आणि कोणत्या प्रकारचे कडुलिंबाचे हेअर मास्क करून तुम्ही केसांसाठी त्याचा उपयोग करून घेऊ शकता ते आपण या लेखातून पाहणार आहोत. तुम्हाला याचा कसा उपयोग करायचा हे जर माहीत नसेल तर तुम्ही या लेखातून ते नक्की जाणून घ्या. 

कडुलिंबाचे फायदे आहेत आणि त्याचप्रमाणे कडुलिंबाच्या तेलाचे फायदेही अनेक आहेत. तुम्हाला या लेखातून याविषयी संपूर्ण माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. खरं तर केसांची काळजी घेण्यासाठी कडुलिंबाचे फायदे होतात. 

 

कडुलिंब तुमच्या केसांसाठी चांगले फायदेशीर ठरते का? (Is Neem Good For Hair In Marathi)

कडुलिंबाचे केसांसाठी फायदे

ADVERTISEMENT

Shutterstock

कडुलिंबामध्ये अनेक औषधीय गुण आणि पोषक तत्व असतात. ज्यामुळे केसांसाठ कडुलिंब फायदेशीर असते. एनसीबीआय (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फोर्मेशन) च्या संकेतस्थळावर प्रकाशित झाल्याप्रमाणे केसांची गळती कमी होण्यासाठी आणि केसातील कोंडा प्रमाणात आणण्यासाठी कडुलिंबाचा उपयोग होतो. कडुलिंबाप्रमाणेच कडुलिंबाच्या तेलाचाही केसांसाठी वापर करण्यात येतो. कडुलिंबाच्या तेलाचे फायदे अनेक आहेत. कडुलिंबाची पाने ही जास्त प्रमाणात केसांसाठी उपयोग ठरतात. यामध्ये असणारे गुण केसांसाठी जास्त पोषक असतात आणि त्यामुळेच किमान आठवड्यातून एकदा तरी केसांसाठी याचा उपयोग तुम्हाला खूप चांगला ठरू शकतो.  

केसांसाठी कडुलिंबाचे आण कडुलिंबाच्या तेलाचा होणारा फायदा (Benefits Of Neem For Hair In Marathi)

 

केसांना निरोगी राखण्यासाठी आणि केसांची काळजी घेण्यासाठी कडुलिंबाच्या पाल्याचा आणि तेलाचाही उपयोग होतो. कडुलिंबाच्या पानाचे फेसपॅकही तयार करण्यात येतात. याचे नक्की काय काय फायदे आहेत आपण पाहूया.  

स्काल्प निरोगी राखण्यासाठी (Healthy Scalp)

स्काल्प निरोगी

ADVERTISEMENT

Shutterstock

 

कडुलिंबाचा पाला अथवा कडुलिंबाचे तेल या दोन्हीचा उपयोग स्काल्प निरोगी ठेवण्यासाठी करण्यात येतो. एका रिसर्चनुसार कडुलिंबामध्ये लिनोलिक, ओलिक आणि अनेक फॅटी अॅसिड असतात. हे केसांना पोषण देण्याचे आणि केसांना नैसर्गिक कंडिशन करण्याचे काम करते. तसंच कडुलिंबाचे तेल वापरून तुम्ही केसांना मालिश केल्यास रक्तामध्ये सुधारणा होते. त्यामुळे केस लवकर पांढरे होत नाहीत. याशिवाय जर स्काल्पमध्ये खाज येत असेल तर तुम्ही कडुलिंबाचा वापर करून ही खाज कमी करू शकता. कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने आंघोळ केल्यास, तुमच्या स्काल्पमधील खाज कमी होते. 

केसांची वाढ चांगली होते (Hair Growth)

केसांची वाढ चांगली होते

Shutterstock

ADVERTISEMENT

 

केसांच्या वाढीसाठीही याचा उपयोग करून घेता येतो. एका शोधानुसार कडुलिंबामध्ये अँटिमायक्रोबायल आणि इम्यून बुस्टिंग अर्थात प्रतिकारशक्तीचे गुण अधिक आढळून येतात, जे केसांना निरोगी ठेवण्याचे आणि केसांचा विकास करण्याचे काम करतात. त्याशिवाय कडुलिंबाच्या तेलाने केसांना मालिश केल्यास, तुम्हाला केसांच्या वाढीमध्ये अधिक चांगला परिणाम दिसून येतो. रक्तसंचारात सुधारणा होऊन केस अधिक वाढतात. कडुलिंबाच्या तेलामध्ये तुम्ही नारळाचे तेल, जोजोबा ऑईल, ऑलिव्ह ऑईल मिक्स करून केसांना मालिश केल्यास, केसांची चांगली वाढ होते. तर कडुलिंबाच्या अर्कामुळे केसात कोंडाही होत नाही. 

दुहेरी केसांसाठी (Split Hair)

दुहेरी केस

Shutterstock

 

बऱ्याच जणांना दुहेरी केसांची समस्या असते. कडुलिंबाचा वापर खास यासाठी केला जातो. बऱ्याचदा कितीही उपाय केले तरीही केस दुहेरी होतात. पण तुम्ही कडुलिंबाच्या पाल्याचा अथवा कडुलिंबाच्या तेलाचा वापर केला तर दुहेरी केसांची ही समस्या दूर होण्यास मदत मिळते. हे तेल तुम्ही स्काल्पला लावा आणि मसाज करा. केसांना पोषण देण्यासह दुहेरी केसांची समस्या यामुळे कमी होते. यावर कोणताही शोध लागला नसला तरीही अनेकांच्या अनुभवावरून हे सिद्ध झाले आहे. 

ADVERTISEMENT

कोरड्या केसांवरील उत्तम उपाय (Remedy For Dry Hair)

कोरड्या केस

Shutterstock

 

कडुलिंबाच्या वापराने केसांमधील कोरडेपणा दूर होण्यास मदत मिळते. एका शोधानुसार कडुलिंबाच्या वापराने अथवा कडुलिंबाच्य तेलाच्या वापराने केसांना योग्य मॉईस्चराईजर मिळते, ज्यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो. केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी केसांमध्ये तुळस तेल, आवळा तेल आणि कडुलिंबाचे तेल मिक्स करून त्याचा उपयोग करावा आणि मसाज करावा. यामुळे तुमची कोरड्या केसांची समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

कोंडा दूर करण्यासाठी (Gets Rid Of Dandruff)

कोंडा दूर करण्यासाठी

ADVERTISEMENT

Shutterstock

 

बऱ्याचदा कोंडा दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण कडुलिंबाची पाने हा त्यावरील उत्तम उपाय आहे. कडुलिंबामधील गुणधर्मामुळे केसातील कोंडा पटकन दूर होतो. कडुलिंब ही औषधी वनस्पती असल्याने केसांसाठी त्याचा चांगला फायदा मिळतो. स्काल्पवर होणाऱ्या फंगल इन्फेक्शनमुळे कोंड्याची समस्या होते. मात्र कडुलिंबाचा यावर जास्त चांगला प्रभाव पडतो. कोंड्याची समस्या कमी करण्यासाठी कडुलिंब हा उत्तम रामबाण उपाय ठरतो. त्याशिवाय कडुलिंबामध्ये असणारे मायक्रोबायल गुण कोंड्यापासून सुटका करून देण्यास फायदेशीर ठरतात. 

लिखांसाठीही फायदेशीर (Beneficial For Lice)

लिखांसाठीही फायदेशीर

Shutterstock

ADVERTISEMENT

 

सहसा शाळेत जाणाऱ्या मुलींच्या केसांमध्ये उवा आणि लिखा या हमखास होतात. अशावेळी प्रचंड त्रास होतो. त्वचाही खराब होते. अन्य कोणत्याही उपायापेक्षा यावर कडुलिंबाच्या पाल्याची पेस्ट लावणे अथवा कडुलिंबाचे तेल लावणे हा चांगला उपाय आहे. कडुलिंबामध्ये असणाऱ्या अँटिमायक्रोबायल गुणामुळे केसांमधील उवा आणि लिखा मरून जाण्यास मदत होते. 

 

 

कडुलिंबाचे फायदेशीर हेअरमास्क (Neem Hair Mask In Marathi)

कडुलिंबाचे फायदेशीर हेअरमास्क

ADVERTISEMENT

Shutterstock

केसांसाठी कडुलिंबाचा उपयोग केला जातो आणि याचा खूपच फायदा होतो. आता वर आपण कडुलिंबाचे केसासाठी उपयोग पाहिले. पण त्याचा हेअरमास्क कसा तयार करायचा आणि त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा ते आपण पाहू.

कडुलिंब आणि मेथी (Neem & Methi)

कडुलिंब आणि मेथी (Neem and methi)

Freepik.com

ADVERTISEMENT

कडुलिंबाप्रमाणेच मेथीच्या दाण्यातही अँटिफंगल आणि जीवाणूरोधी गुण असतात. डोकं शांत ठेवण्यासह केसातील कोंडा घालविण्याचे काम हा हेअरमास्क करतो. हे उत्तम कंडिशनर असून कोरड्या केसांवरील उत्तम उपाय आहे. 

हेअरमास्क बनविण्यासाठी लागणारे साहित्य

  • 2 चमचे मेथीचे दाणे 
  • कडुलिंबाची पाने
  • अर्धा कप दही
  • एक चमचा लिंबाचा रस 

हेअरमास्क कसा बनवावा

  • मेथीचे दाणे साधारण तीन तास पाण्यात भिजवा. त्यानंतर कडुलिंबाची पाने आणि मेथीचे दाणे एकत्र करून त्याची मिक्सरमधून पेस्ट वाटून घ्या
  • पेस्ट तयार झाल्यावर त्यात दही आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या 
  • ही पेस्ट केसांना मुळापासून लावा आणि साधारण एक तास राहू द्या. त्यानंतर केस धुवा 
  • आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा प्रयोग करू शकता

कडुलिंब आणि नारळाचे तेल (Neem & Coconut Oil)

कडुलिंब आणि नारळाचे तेल (Neem and coconut oil)

ADVERTISEMENT

Freepik.com

गरम तेलाने केसांची मूळं मजबूत तर होतातच. त्याशिवाय तेलाच्या मसाज करण्याने डोक्याच्या नसांना आराम मिळतो आणि केसांना मजबूती मिळते. कडुलिंब आणि नारळाच्या तेलाचे मिश्रण हे कोंड्यासाठी उत्तम ठरते. 

हेअरमास्क बनविण्यासाठी लागणारे साहित्य

  • 1 कप नारळाचे तेल
  • 20 कडुलिंंबाची पाने 
  • एक चमचा लिंबाचा रस 
  • एक वाटी एरंडाचे तेल

हेअरमास्क कसा बनवावा

ADVERTISEMENT
  • सर्वात पहिले नारळाचे तेल गरम करा आणि त्यात कडुलिंबाची पाने टाकून साधारण 15 मिनिट्स उकळवा 
  • तेल थंड झाल्यानंतर ते गाळून घ्या आणि त्यात लिंबाचा रस आणि एरंडाचे तेल व्यवस्थित मिक्स करून घ्या 
  • एका स्वच्छ बाटलीत हे तेल स्टोअर करा 
  • आठवड्यातून दोन वेळा केसांना या तेलाने व्यवस्थित मालिश करा. एक तास तसंच ठेवा आणि मग आंघोळ करा

कडुलिंब आणि मेंदी (Neem & Mehndi)

कडुलिंब आणि मेंदी (Neem and Mehndi)

Freepik.com

मेंदी ही केसांसाठी उत्तम कंडिशनर असून कोणत्याही प्रदूषणापासून तुमच्या केसांचं संरक्षण करण्यासाठी मेंदीचा उपयोग होतो. तसंच यामुळे केसांना नैसर्गिक चमक येऊन केसांना चांगले पोषणही मिळते. कडुलिंब आणि मेंदीच्या या मिश्रणामुळे केसांना चांगले पोषण मिळून केसातील कोंडा दूर होण्यासाठी मदत मिळते. 

हेअरमास्क बनविण्यासाठी लागणारे साहित्य

ADVERTISEMENT
  • 1 चमचा नारळाचे तेल
  • 20 कडुलिंंबाची पाने 
  • 10 मेंदीची पाने

हेअरमास्क कसा बनवावा

  • कडुलिंबाची आणि मेंदीची पाने घेऊन त्याची मिक्सरमधून पेस्ट करावी
  • तेल गरम करायला ठेवावे आणि ही पेस्ट त्या तेलात गरम करावी
  • थंड झाल्यानंतर ही पेस्ट केसांना लावा 
  • साधारण 10-15 मिनिट्स मसाज करा
  • एक तासानंतर कोमट पाण्याने केस धुवा आणि नीट स्वच्छ करा

कडुलिंब आणि कांद्याचा रस (Neem & Onion Juice)

कडुलिंब आणि कांद्याचा रस (Neem and onion juice)

Freepik.com

आजकाल केसांना कांद्याचा रस लावणे हे जास्तच वाढत चाललं आहे. कांद्याच्या रसामुळे केसांना मुळापासून पोषण मिळते आण त्यातही कडुलिंब आणि कांद्याचे मिश्रण असेल तर केसांचे चांगले पोषण होते. केसांची वाढ होण्यास आणि केसगळती थांबण्यासही मदत मिळते. 

ADVERTISEMENT

हेअरमास्क बनविण्यासाठी लागणारे साहित्य

  • 1 कांदा
  • 20 कडुलिंंबाची पाने

हेअरमास्क कसा बनवावा

  • कांद्याची सालं काढून त्याचे काप करून त्याचा रस काढून घ्या आणि तो गाळा 
  • कडुलिंबाच्या पानांची पेस्ट करून कांद्याच्या रसामध्ये मिक्स करा
  • ही पेस्ट केसांच्या मुळांपासून लावा आणि साधारण एक तास तसंच ठेवा 
  • कोमट पाण्याने केस धुवा आणि उत्तम परिणामांसाठी आठवड्यातून दोनदा हा प्रयोग तुम्ही केसांसाठी करा

केसांसाठी कडुलिंबाचा वापर कसा करावा (How To Use Neem For Hair In Marathi)

केसांसाठी कडुलिंबाचा वापर कसा करावा

Freepik.com

ADVERTISEMENT

केसांसाठी कडुलिंबाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने होतो. कडुलिंबाची पेस्ट तुम्ही केसांना लाऊ शकता अथवा कडुलिंबाच्या तेलाचा, कडुलिंबाच्या पावडरचा इतकंच नाही तर अगदी कडुलिंबाच्या पाण्याचाही तुम्ही केसांसाठी उत्तम उपयोग करून घेऊ शकता. 

  • कडुलिंबाच्या पाण्याने केस धुतल्यास, कोंडा जातो
  • कडुलिंबाच्या तेलाचे थेंब घेऊन त्यात शँपू मिक्स करून केस धुतल्यास कंडिशनरसारखा उपयोग होतो
  • नारळाच्या तेलासह कडुलिंबाचे तेल मिक्स करून केसांना मसाज केल्यास, केसांची वाढ होण्यास मदत मिळते
  • कडुलिंबाची पावडर केसांना तेलात मिसळून लावली तरीही केसांच्या वाढीसाठी याचा फायदा होतो
  • कोणताही हेअरमास्क तयार करताना तुम्ही कडुलिंबाचे तेल वापरू शकता. याचा केसांसाठी अधिक चांगला फायदा मिळतो

कडुलिंबाचा केसांना होणारा तोटा (Side Effects Of Neem Oil In Marathi)

कडुलिंबाचे जसे केसांसाठी फायदे आहेत तसंच याच्या अतिवापराने तोटेही होऊ शकतात. याचीही तुम्हाला माहिती असायला हवी

  • कडुलिंबाचा अथवा त्याच्या तेलाचा वापर अति झाल्यास, त्वचेवर अलर्जी येते. यामुळे त्वचेवर सूज येण्याचीही शक्यता असते
  • संवेदनशील त्वचा असणाऱ्यांन याचा वापर करण्यापूर्वी हातावर पॅच टेस्ट करून पाहायला हवी
  • कडुलिंबाच्या तेलाचा वापर करताना तुम्ही डायरेक्ट वापर शरीरावर न करता, पाणी त्यात मिक्स करून अथवा डायल्युट करूनच याचा वापर करावा

पुढे वाचा – 

Benefit of Neem for Hair in Hindi

ADVERTISEMENT

प्रश्नोत्तरे (FAQs)

1. कडुलिंबाचा उपयोग प्रत्यक्ष स्वरूपात केसांवर अथवा शरीराच्या भागावर करता येतो का?

कडुलिंबाची पेस्ट अथवा तेलाचा अगदी प्रत्यक्ष वापर न करता, डायल्युट करून त्याचा वापर करणे योग्य ठरते. विशेषतः तेलाच्या बाबतीत हे जपणं जास्त गरजेचे आहे.

2. कडुलिंब नुसता खाण्याने काही त्रास होतो का?

कडुलिंब मुळात कडू असतो. उगीच नुसता खाण्यात काहीही अर्थ नाही. तसंच याचे तेलही तुम्ही चुकूनही पिऊ नका. त्याचे उलट परिणाम होण्याची शक्यता असते.

3. कडुलिंबाच्या वापराने त्वचेला काही त्रास होतो का?

कडुलिंबाचा वापर अति झाला तर त्वचेवर अलर्जी येते. तसंच तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही कडुलिंबाचा वापर करण्यापूर्वी त्याचे परीक्षण करून घ्यावे अथवा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचा वापर करावा.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

14 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT