प्रत्येक मराठी भाषा असणाऱ्या व्यक्तीला मराठीचा सार्थ अभिमान असतो आणि असा मराठी भाषा दिन विशेष साजरा करण्यासाठी अर्थात आपला मराठी दिवस (marathi language day) साजरा करण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला आहे. कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन (marathi bhasha din) साजरा करण्यात येतो. मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छाही दिल्या जातात. मराठी दिवसाची माहिती आपल्याला माहीत आहेच. मराठी भाषा दिनाचे संदेशही आजकाल खूप प्रसिद्ध होत आहेत. मराठी भाषा गौरव दिन असंही याला म्हणतात. मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी काय संदेश आहेत अथवा कोट्स आहेत ते आपण या लेखातून पाहणार आहोत. यावर्षी मराठी दिनाच्या शुभेच्छा द्या तुमच्या प्रियजनांना एकदम ठसक्यात. मराठी दिवस म्हटला की मराठीचा मान तर राखला गेलाच पाहिजे आणि त्यासाठी हव्यात फक्कड मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!
मराठी भाषा दिन असल्यावर कोट्स तर आपल्याला आपल्या सोशल मीडियावर ठेवायला हवेतच. मग अशावेळी काय करणार. तर काही स्फुर्तीदायक कोट्स आम्ही खास तुमच्यासाठी देत आहोत. याचा तुम्ही मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठीही उपयोग करू शकता.
1. मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी भाषा बोलण्याचे भाग्य आम्हाला लाभले हीच आमची पुण्याई
जय महाराष्ट्र जय शिवराय
2. मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम
मराठी भाषा म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी
3. मराठी म्हणजे महाराष्ट्र आणि मराठीला माय मानणाऱ्या
मराठी सर्व बंधुभगिनींना जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
4. मराठी सहज सुंदर सुलभ राजभाषा ही आन बान शान
मायबोलीही आमुची रसाळ महद् भाग्याचे लाभले दान - रूपाली धात्रक
5. आईचा असे माझ्या एक वेगळाच तालस्वर
प्रेमळ ती लडिवाळ भाषा मराठी सुंदर
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
6. जात मराठी,धर्म मराठी
शान मराठी, अभिमान मराठी
7. जगत राहावी, शिकत राहावी
समजत राहावी, हसत राहावी अशी ही माया
शब्दांच्याही पलीकडल्या भावनांना
अखंड उमलवणारी ही मातृभाषेची कोवळी माया
8. मराठी भाषेत जन्माला आलो, मराठी भाषेतच मरणार
स्वाभिमान कायम मराठी भाषेचा आम्ही जपणार
9. मराठी दिनानिमित्त सांगू इच्छितो
मराठीसंगेच जगू इच्छितो
10. मराठी भाषा दिनानिमित्त करू मराठी भाषेचा सन्मान
राखू मराठीचा अभिमान आणि करू मराठीचा जयजयकार
11. आवाज मोठा करण्यापेक्षा शब्दाची ताकद मोठी करते
तलवारीच्या धारेपेक्षा मायमराठी उत्तम कार्य करते
12. मराठी भाषा आमची साधी भोळी
कायम राही आमच्या जवळी
13. मराठी भाषा सहज सुलभ आणि मधाळ
मराठी भाषा आहेच अशी रसाळ
14. परीस स्पर्शापरी असे किर्तीवंत
आमची माय मराठी
अंगाई, लावणी आणि पोवाड्यातही शोभते
आमची माय मराठी
संस्कृत आणि संस्कृतीच्या उदरात वसे
आमची माय मराठी
नानाविध शिलेदारांच्या यशोगाथेतही
आमची माय मराठी - कुणाल परांजपे
15. आईशिवाय कधी बाळाचे अस्तित्व असते का
मायमराठी अशीच भाषा कायम बाळगू उराशी
16. जगी सर्वश्रेष्ठ अशी भाषा मायमराठी
17. मायबोली माझी मराठी
तिच्यात मायेचा ओलावा
वेगवेगळ्या शब्दालंकारात
घेते हृदयातील खोलावा
18. मराठी भाषा फक्त भाषा नाही
तर ती ज्ञानाचा अथांग स्रोत आहे
भडकली तर तोफ आहे
फेकली तर गोफ आहे
19. मराठी आपला कारभार आहे
मराठीच आपले सरकार आहे
20. मराठी फक्त भाषा नाही तर
मराठी प्रत्येकाच्या मनातील आशा आहे
मराठी भाषा दिनानिमित्त आपल्या मराठी मित्रमैत्रिणींना शुभेच्छा संदेश पाठवायचे असतील तर खास तुमच्यासाठी हे मराठीतील मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा.
1. मराठी ही फक्त भाषा नाही तर
मराठी मनाचं लेणं आहे
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
2. मराठी भाषा ही कल्पकतेतील चिकित्सा आहे
तर नात्यागोत्यातील हा भरवसा आहे
मराठी भाषा दिन शुभेच्छा
3. मराठी आहे माझी माती
मराठी माझा अभिमान
जन्मलो या मातीत हेच माझे सौभाग्य, हाच माझा स्वाभिमान
सर्व भाषांची राजभाषा असे मराठी
भाग्य आहे अमुचे, नसे बोलणे कधी गर्वापोटी
धर्म मराठी, कर्म मराठी, मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
4. भाषा हाच अभिमान हेच कायम तत्व असू दे
मराठी माणसाला तू नेहमी मराठी जपण्याचे महत्व दे
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
5. भाषेचा गजर कर, मराठी असल्याचा नेहमीच साज कर
साजेसा जग तू मराठीचा माज कर
6. मराठी भाषेचा करा आदर
बिनदिक्कतपणे करा वापर
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
7. आय माझी प्रेमळ भारी
मराठी असे अमुची मायबोली
8. माय मराठीची अशी गोडी ही अवीट
न लागावी कधी कुणाचीही दीठ
मायबोली साहित्याची संस्कृतीची शान
राजभाषा गौरवावी थोर हिचा मान - रूपाली धात्रक
9. हसा मराठी, बोला मराठी
जगा मराठी, वाढवा मराठी
10. आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात
एक म्हणजे ढोल ताशा
आणि दुसरी म्हणजे मराठी भाषा
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
11. ना मोठेपणासाठी ना स्वार्थासाठी
जीव तडपतो ते केवळ मराठी भाषेसाठी
12. जल्लोष मराठीचा मान मराठी भाषेचा
13. पुन्हा जन्म मिळाला तर अभिमानाने होईन मराठी भाषिक
14. मराठी असे अमुची मायबोली, मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
15. मराठीच हृदयाचा झंकार आहे
मराठीच सर्व यशाचे द्वारे आहे
16. मराठी आपली भाषा आहे
अस्मितेचा जयघोष आहे
17. मराठमोळ्या भाषेला साखरेची चव आहे
कशाचीही उणीव नाही तर भाषेला तोड नाही
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
18. तोडून टाक बेड्या सर्व, आता तरी मुक्त हो
बाकीच्यांना जाऊ दे, तू मराठी भाषेचा भक्त हो
19. मराठी आहे आमची राजभाषा
प्रत्येक मनी रूजवावी हीच अभिलाषा
20. मराठी भाषेचा आहे मला गर्व
भावी पिढीने जोपासावे आता सर्व
आजकाल प्रत्येक दिवशी स्टेटस हे महत्वाचे ठरतात. विशेष दिवशी व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले नाहीत तर नक्कीच कसंतरी वाटतं. मराठी भाषा दिवशी असेच काही विशिष्ट स्टेटस तुम्ही ठेऊ शकता.
1. मराठी भाषा आहे आमची महाराष्ट्राची शान
भजन किर्तन भारू ऐकताच हरपून जाते भान
2. मराठी भाषेला काना, मात्रा, वेलाट्यांचे मिळाले आहे वाण
साहित्य आणि इतिहासातही आहे खूप मान
3. मराठी भाषेचा बाळगा नेहमी गर्व
मराठी भाषा दिन साजरा करू सर्व
4. धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी।
एवढ्या जगात माय मानतो मराठी।।
5. चला…साजरा करूया जल्लोषात…
जागतिक मराठी भाषा दिन
6. अंगा लावण्यास मला सुगंधी
साबण वा अत्तर नसू दे..
पण गर्वाने ओढलेला माझ्या मराठी भाषेचा
कपाळी भगवा टिळा असू दे
7. लढता लढता हरलो जरी
हरल्याची मला खंत नाही
लढा माझ्या मराठीसाठी
लढाईला माझ्या अंत नाही
8. मराठी भाषा
ही आमची मातृभाषा आहे
हे आम्ही आमचे भाग्य समजतो
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
9. आमच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमच्या नसा नसात नाचते मराठी॥
10. माझा शब्द, माझे विचार
माझा श्वास माझी स्फुर्ती, रक्तात माझ्या मराठी
11. एवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
12. दंगते मराठी... रंगते मराठी..
स्पंदते मराठी.. स्पर्शते मराठी..
13. अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे
राष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
14. आम्ही मराठीचे शिलेदार
मराठी भाषा हा आमचा मान
15. मराठी भाषा दिनाच्या भरभरून शुभेच्छा
16. मराठी भाषेचा राखा मान, मराठी भाषा दिन शुभेच्छा
17. मराठी भाषा आहे आपली खास
कायम जपा भाषेचा सन्मान
18. मराठी बोली असे आपल्या मनी
कायम जपू अभिमानी
19. मराठी भाषा आपली खास
मनी करेल सदैव वास
20. मराठी भाषेचा करा नेहमी गौरव, मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
मराठी दिनासाठी सोपे आणि साधे संदेश अर्थात मेसेज खास तुमच्यासाठी.
1. अमृताहूनी गोड मराठी भाषा - मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
2. असेल टिकवायची भाषेची आपुलकी तर मराठी भाषा जपावी - मराठी भाषा दिन शुभेच्छा
3. मराठी असे आमुची मायबोली, नेहमी बाळगा अभिमान
4. सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
5. सन्मान मराठीचा,
अभिमान महाराष्ट्राचा !!
मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा!
6. 'जागतिक मराठी भाषा दिवसाच्या' हार्दिक शुभेच्छा
7. कुसुमाग्रजांना त्रिवार अभिवादन व जागतिक मराठी दिनाच्या सर्वांना खुप शुभेच्छा
8. माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दर्या खोर्यातील शिळा
9. माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान
हिच्या दारिद्य्रात आहे, भविष्याचे वरदान
10. मराठी भाषा दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. मराठी भाषेचा अभिमान बाळगा
11. आमच्या घराघरात वाढते मराठी
आमच्या फ़ुलाफ़ुलात नांदते मराठी...मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
12. येथल्या पिकांमधुन डोलते मराठी येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
13. आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
14. श्वासातील झिंग मराठी
जगण्याचा थाट मराठी
या संस्कृतीच्या पदराचा
जरतारी काठ मराठी - गुरू ठाकूर
15. माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर मला वाटे अभिमान
16. माझ्या मराठीची गोडी वाटे मला अवीट
माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवित
ज्ञानोबांची तुकयाची मुक्तेशाची जनाईची
माझी मराठी गोडी रामदास शिवाजीची
17. मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
18. सर्व मराठी बंधुभगिनींना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
19. गौरवोद्गार निघे तोंडातून केवळ एकाच भाषेसाठी, आमुची माय मराठी
20. जगा मराठी आणि जगवा मराठी...मराठी भाषा दिन शुभेच्छा
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक