ADVERTISEMENT
home / Travel in India
कोरोनाचे टेन्शन न घेता महाराष्ट्रातील या ठिकाणांना बिनधास्त द्या भेट

कोरोनाचे टेन्शन न घेता महाराष्ट्रातील या ठिकाणांना बिनधास्त द्या भेट

नवे वर्ष सुरु झाले तरी कोरोना नावाचे संकट म्हणावे तितके कमी झालेले नाही. पुढील काही काळासाठी आपल्याला अधिक सजग राहावे लागणार आहे. परदेशात काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन झाल्यामुळे परदेशात जाण्याची काहींची स्वप्न भंग पावण्याची शक्यताही दाट आहे. कोरोनाचे संकट असले तरी आयुष्य जगायचे सोडू शकत नाही. 2020 कसा तरी घालवला पण 2021 असाच घालवू शकत नाही.या वर्षात कोरोनाचे टेन्शन न घेता फिरायचा विचार केला असेल तर अन्य कुठेही न जाता महाराष्ट्रातीलच काही प्रेक्षणीय स्थळांना भेट देणे योग्य राहील. कोणतीही कोरोना टेस्ट न करता आणि आरोग्याची काळजी घेत भेट देता येतील अशा ठिकाणांची आम्ही एक यादी काढली आहे. पण आरोग्याची काळजी घेतच तुम्हाला ही सफर करायची आहे.

रोमँटिक व्हॅलेंटाईन साजरा करा ‘रोमँटिक’ ठिकाणी – Valentines Day With Your Partner In Marathi

देवबाग (कोकण)

सुंदर कोकण

Instagram

ADVERTISEMENT

‘येवा कोंकण आपलोच असा’ असे म्हणत कोकणात जाण्याचा प्लॅन करा. कारण कोकणाइतके सुंदर निसर्गसौंदर्य कोणाकडेच नाही. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवबाग हे ठिकाण सुंदर निसर्गाचे उत्तम उदाहरण आहे. या ठिकाणी जाणे हे सुरक्षितच नाही तर आल्हाददायक आहे. सुंदर समुद्र किनारे, कोकणी पद्धतीचे जेवण, देवस्थळांना भेटी यामुळे तुमच्यामध्ये नक्कीच नव चैतन्य जागेल. याशिवाय जर तुम्हाला वॉटर स्पोर्टची आवड असेल तर हल्ली अनेक किनाऱ्यांवर रिसॉर्ट आणि अशा पद्धतीच्या सोयी करण्यात आल्या आहेत. तुम्ही अगदी बिनधास्त निसर्गाच्या सानिध्यात कोणताही मास्क न घालता मोकळा श्वास घेऊ शकता. 

( टीप: कोकणात जाण्याचा विचार करत असाल तर आंगणेवाडीची जत्रा सोडून जाण्याचा प्लॅन करा. कारण त्या काळात कोकणात प्रचंड गर्दी असते. तुम्हाला तिकिट मिळणे कठीण होईल.)

महाबळेश्वर ( सातारा)

महाबळेश्वर बाजार

Instagram

ADVERTISEMENT

थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर महाराष्ट्रातील टुरिस्टचे सगळ्यात आवडते ठिकाण आहे. म्हणून 12 महिने या ठिकाणी खूप गर्दी असते. अनेक जण थंडीच्या दिवसांमध्ये गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी आणि स्ट्रॉबेरीजचा आनंद घेण्यासाठी जातात.  त्यामुळे  महाबळेश्वरचा दोन दिवसांचा प्लॅन करण्यास काहीच हरकत नाही. महाबळेश्वरला गेल्यानंतर पाचगणी, मॅप्रो गार्डन, प्रतापगडला मस्त फिरता येईल. महाबळेश्वरला कायमच लोकांची ये-जा सुरु असते. त्यामुळे तुम्हाला काही ठिकाणी मास्क लावणे हे फार गरजेचे आहे. पण हॉटेल किंवा तुम्हाला राहत्या हॉटेलमध्ये आरामात वेळ घालवता येईल. 

जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी ही आहेत मुंबईजवळची बेस्ट ठिकाणं

भंडारदरा (अहमदनगर)

सुंदर भंडारदरा

Instagram

ADVERTISEMENT

अहमदनगरमधील प्रेक्षणीय स्थळांपैकी भंडारदरा हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. निसर्ग सौंदर्याने बहरलेल्या भंडारदारामध्ये पाहण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत.  पावसाळात अगदी हमखास या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. पण तुम्ही नवीन वर्षात थंडीत जाण्याचा विचार करत असाल तरी काही हरकत नाही. तुम्हाला निर्सगााचा आनंद नक्कीच घेता येईल. फक्त पावसाळा सोडून भंडारदरा जाणार असाल तर तुम्ही नेमंक काय करणारं याचे प्लॅनिंग करुन जा. कॅम्पेन आणि थोडे अॅडव्हेंचर करण्याची इच्छा असेल तर अशा पद्धतीचे प्लॅनही या ठिकाणी करता येण्यासारखे आहेत. 

मुळशी (पुणे)

ताम्हणी घाट

Instagram

पुण्यातील मुळशी हे ठिकाणंही अनेक पर्यटकांच्या आवडीचे आहे. मुळशीच्या परिसरात अनेक ठिकाणी रिसॉर्ट तयार करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला काही दिवस घालवता येतील. येथील ताम्हिणी घाट, पानशेत  ही काही ठिकाणं तुम्हाला पाहता येतील. जर तुम्हाला एकाच ठिकाणी वेळ घालवायचा नसेल तर तुम्ही लोणावळा,खंडाळा या ठिकाणी देखील आरामात जाऊ शकता.मुळशी हे मुंबईपासून फार दूर नाही. त्यामुळे प्रवासाचाही फारसा खर्च होत नाही. 

ADVERTISEMENT

इगतपुरी (नाशिक)

इगतपुरी

Instagram

नाशिक जिल्ह्यातील  इगतपुरी हे ठिकाणं देखील महाराष्ट्रातील एक निसर्गरम्य ठिकाण आहे.  नाशिकसाठी मुंबईहून प्रवास करणे फार कठीण नाही. तुम्हाला अगदी सहज ट्रेन किंवा बसने या  ठिकाणी प्रवास करता येतो. इगतपुरी हे गेल्या काही काळापासून पर्यटकांचे आवडते ठिकाण झाले आहे. या ठिकाणी अगदी वॉटरस्पोर्टसपासून विपश्यना केंद्र अशी ठिकाणं फिरण्यासारखी आहे. अगदी शांत वातावरणात तुम्हाला वेळ घालवायचा असेल तर तुम्ही इगतपुरीला जाऊ शकता. 

आता नवीन वर्षात आरोग्याची काळजी घेत कुठे फिरायचे असेल तर या ठिकाणांना नक्की द्या भेट. कारण महाराष्ट्रात फिरण्यासारखे खूप आहे.  

ADVERTISEMENT

बाहेर जाण्याचा प्लॅन करताय, देशातील ही ठिकाणं आहेत ऑगस्ट महिन्यासाठी बेस्ट

31 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT