प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो. यामध्ये कोणाचेच दुमत नसेल.तुमच्या डोळ्यांचा रंग, ओठांचा आकार, चेहऱ्याची ठेवण तुमच्या स्वभावाविषयी बऱ्यात काही गोष्टी सांगत असते. आपण या विषयी वेळोवेळी जाणून घेतले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का?तुमच्या बेंबीचा अर्थात नाभीचा आकार तुमच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू दर्शवत असतो. तुमच्या नाभीकडे तुम्ही कधी नीट निरखून पाहिले आहे का? प्रत्येकाच्या नाभीचा आकार हा वेगळा असतो. यानुसार त्याव्यक्तिमध्ये काही स्वभावदोष असतात. चला जाणून घेऊया तुमच्या बेंबीचा आकार नेमकं तुमच्याविषयी काय सांगतो.
डोळ्यांचा रंग सांगतो व्यक्तीचा स्वभाव
मोठी खोल नाभी
काही जणांच्या बेंबीच्या आकार हा खोल आणि गोल असतो. अशी नाभी असलेले लोकं उदार मनाचे असतात. प्रत्येक गोष्टी नेटाने पूर्ण करण्यात या लोकांचा हातखंडा असतो. अत्यंत समजूतदार स्वभावाच्या या व्यक्ती असतात.समजूतदार स्वभाव असल्यामुळे ही लोक फार सहनशील असतात. खोल आणि मोठी नाभी असलेल्या व्यक्तींचा स्वभाव हा सरळ असतो. त्या अजिबात आडपडदा ठेवत नाहीत.आयुष्यात मिळालेल्या अनुभवाचा उपयोग ते इतरांसाठी मार्गदर्शन करुन करतात.
उभट प्रश्नचिन्ह स्वरुपातील नाभी
काहींची नाभी ही अगदी पातळ आणि उभट असते. त्यांना नाभी आहे की नाही हे देखील अजिबात कळत नाही. अशा नाभीला प्रश्नचिन्ह आकारातील नाभी असे म्हटले जाते. ही लोकं अत्यंत आळशी स्वभावाचे असतात. एखादे काम पूर्ण करताना सतत त्यांचा आळस समोर येतो. असा नाभीचा आकार शरीरात कमी असलेली उर्जा दर्शवतो. अशी बेंबी असलेल्या व्यक्ती या त्यांच्या आवडीच्या कामात निपूण असतात. एखाद्या यांत्रिक कामापेक्षा त्यांना स्वत:हून करता येतील अशी काम करायला खूपच आवडतात.
राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव
धनुष्याकृती नाभी
काही जणांच्या नाभीचा आकार हा धड आडवा ना धड अंडाकडती असतो. अशी नाभी ही धनुष्याकृती आकाराची असते. त्या कर्तृत्ववान असतात. स्वत:च्या हिंमतीवर सगळे काही मिळवावे असे या लोकांना आवडते म्हणूनच अशा व्यक्ती या चारचौघातही उठून दिसतात. अगदी कोणतीही परिस्थिती आली तरी त्याचा सामना कसा करायचा हे या लोकांंना माहीत असते. या व्यक्ती फार हुशार असतात या अगदी सहजपणे कोणावरही विश्वास ठेवत नाहीत. त्यांना तसा विश्वास ठेवायला मुळीच आवडत नाही.
तुमच्या चपलांवरुन कळतो तुमचा स्वभाव, जाणून घ्या तुमचा स्वभाव
अंडाकृती नाभी
अंडाकृती नाभी असलेल्या व्यक्ती या फार विचार करणाऱ्या असतात. एखादी गोष्ट चुकीची घडली की, त्याच्या वेदनाही हीच लोक सहन मनातल्या मनात सहन करत राहतात. त्यांना या गोष्टी इतरांना सांगायला मुळीच आवडत नाही. खूप विचारी असल्यामुळे कधी कधी या व्यक्ती आलेली चांगली संधी देखील गमावतात. एखाद्या नव्या गोष्टीबद्दल जाणून घेणे या लोकांना फार आवडते. त्यामुळे नव्या गोष्टींची उत्सुकता त्यांना फार असते. अशा गोष्टींमध्ये ते चांगले रमतातही. पण कधी कधी त्यांचा विचारी स्वभाव या सगळ्यावर पाणी फेरतो. अशा व्यक्तींनी अति विचारात रमू नये.
उथळ नाभी
काहींची नाभी ही फारच लहान असते. लहान आकारापेक्षाही ती फार उथळ असते. त्यांचा आतला भाग हा पटकन दिसून येतो. अशा उथळ नाभी असलेल्या महिला या फार चिडचिड्या स्वभावाच्या असतात. त्यांना कोणत्याही गोष्टीचा राग पटकन येतो. राग अगदी त्यांच्या नाकावरच असतो, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. महिलांची नाभी अशा पद्धतीने उथळ असेल तर त्या आपल्या कामात फारशा निपूण नसतात. घिसडघाईने काम करण्याची त्यांची सवय असल्यामुळे ती काम यशस्वी होत नाही. पण जर पुरुषाची नाभी अशी उथळ असेल तर असे पुरुष हे बुद्धिवान, कुशल आणि स्पष्टवादी असतात. कोणतेही नाते मनापासून सांभाळायला त्यांना आवडते.
टॅग करा तुमच्या मित्रांना ज्यांना नाभीवरुन त्यांचा स्वभाव जाणून घ्यायला नक्की आवडेल.