ADVERTISEMENT
home / केस
आयब्रोजना शेप द्या मायक्रोब्लेडिंग  ट्रिटमेंटने, जाणून घ्या फायदे

आयब्रोजना शेप द्या मायक्रोब्लेडिंग ट्रिटमेंटने, जाणून घ्या फायदे

काळ्याभोर, लांबसडक आणि दाट आणि सुरेख भुवया कोणाला नाही आवडणार. मात्र बऱ्याचजणींच्या नैसर्गिक आयब्रोज खूप पातळ आणि विरळ असतात. अशा वेळी फक्त आयब्रोजला योग्य तो शेप देऊन तुम्ही तुमचा संपूर्ण लुकच बदलू शकता. सारखं सारखं भुवया कोरल्यामुळे त्यांचा आकार खूपच पातळ होतो. तुम्हाला ही असा त्रास जाणवत असेल तर तुम्ही यासाठी मायक्रोब्लेंडिंग ट्रिटमेंटची मदत घेऊ शकता. कारण यामुळे तुम्हाला हवा तसा आकार तुमच्या भुवयांना देता येतो. शिवाय थ्रेंडिंग आणि वॅक्सिंगपेक्षा यातून वेदनाही कमी होतात. यासाठीच जाणून घ्या मायक्रोब्लेडिंग ट्रिटिमेंटविषयी सर्व काही

मायक्रोब्लेडिंग म्हणजे नेमकं काय

मायक्रोब्लेडिंग हे एक थ्रेडिंग आर्ट आहे. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या आकाराप्रमाणे तुमच्या भुवयांना शेप दिला जातो. यात पेनाप्रमाणे एक उपकरण अगदी कौशल्याने वापरले जाते. या उपकरणामध्ये साधारण दहा  ते बारा सुया आणि पेनाप्रमाणे एक नीब ब्लेड असते. ज्यामुळे तुमच्या आयब्रोज असलेल्या त्वचेवर अगदी  नाजूक ओरखडे दिले जातात. ज्यामुळे तुमच्या आयब्रोजचा वेडावाकडा आकारा सरळ होतो आणि आयब्रोज शेपमध्ये दिसतात. विशेष म्हणजे ही ट्रिटमेंट बराच काळ टिकत असल्यामुळे तुम्हाला सतत आयब्रोजला शेप देण्यासाठी पार्लरमध्ये जावं लागत नाही. 

pexels.com

ADVERTISEMENT

मायक्रोब्लेडिंगविषयी महत्त्वाची माहिती

मायक्रोब्लेडिंग केल्यावर जवळजवळ एक महिना  तुम्हाला कोणत्याही टचअपची गरज लागत नाही. साधारणपणे मायक्रोब्लेडिंगचा परिणाम  एक वर्ष ते तीन वर्षापर्यंत टिकू शकतो. पण जर तुमची त्वचा तेलकट प्रकारची असेल तर मात्र याचा परिणाम फक्त एक वर्षापूरता मर्यादित असतो. सामान्य त्वचेवर याचा परिणाम दीड वर्ष टिकवता येऊ शकतो. मायक्रोब्लेडिंग केल्यावर  आणि ते करण्यापूर्वीही तुम्हाला उन्हात जाणे टाळावे लागते. कारण असं न केल्यास त्यामुळे भुवयांजवळील रेटिनॉल आणि ग्लायकोलिक अॅसिड सारखे एक्सफोलियंट्स कमी होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे मायक्रोब्लेडिंग करण्यापूर्वी एक आठवडा आधी थ्रेडिंग अथवा वॅक्सिंग करू नये. या काळात तुम्हाला फेशिअल करता येणार नाही. एक महिनाआधी व्हिटॅमिन ए युक्त आहार जसं की ऑलिव्ह ऑईल अथवा औषधे बंद करावी. ट्रिटमेंट चालू असताना व्यायाम करू नये. या काळात बोटोक्स ट्रिटमेंट घेऊ नये. आयब्रोजनां कलर करणे टाळावे. धुम्रपान अथवा मद्यपान केल्यास दुष्परिणाम सहन करावे लागू शकतात. कोणतेही वैद्यकीय उपचार अथवा औषधे घेऊ नयेत. 

मायक्रोब्लेडिंग ट्रिटमेंट करणं सुरक्षित आहे का

मायक्रोब्लेडिंग ट्रिटमेंट करणं पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र यामुळे काही काळासाठी तुमची त्वचा संवेदनशील होते. ट्रिटमेंट सुरू करण्याआधी तुमच्या आयब्रोजला मालिश केलं जातं. या ट्रिटमेंटमध्ये ब्लेडचा आवाज येत असल्यामुळे कदाचित तुम्हाला या ट्रिटमेंटची भिती वाटू शकते. मात्र याबाबत घाबरण्याचे काहीच कारण नाही कारण तज्ञ्ज व्यक्ती ती कौशल्याने करत असतात. ही ट्रिटमेंट कोणही घरी करू नये कारण असं करणं नक्कीच धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे एक्सर्टच्या सल्लानुसारच योग्य तो निर्णय घ्यावा. 

आम्ही शेअर केलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

फोटोसौजन्य – pexels.com

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

तुमच्या Eyebrows ना द्या Perfect शेप

निरनिराळ्या फेस शेपसाठी ट्राय करा ‘या’ मेकअप टीप्स

दाट आणि रेखीव भुवयांसाठी असं वापरा आयब्रोज जेल

ADVERTISEMENT
26 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT