हळदीच्या दुधाला गोल्डन मिल्क असंही म्हटलं जातं. हळदीचं दूध हे एक पारंपरिक पेय अथवा औषध आहे. कारण या दूधाचे अनेक फायदे असल्यामुळे आजारपणात ते एखाद्या औषधाप्रमाणे कार्य करते. गायीच्या दूधात हळद मिसळून गरम केलेलं हे पेय आरोग्य वर्धक असल्यामुळे दररोज सकाळी हेल्द ड्रिंकप्रमाणे पिता येतं. हळदीचे दूध सर्दी, खोकल्यापासून ते अगदी त्रासदायक गुडघेदुखीवर रामबाण उपाय ठरू शकतं. यासाठीच जाणून घ्या याचे फायदे आणि बनवण्याची पद्धत.
हळदीचे दूध बनवण्यासाठी कोणती हळद वापरावी
भारतात हळदीचे विविध प्रकार मिळतात. आंबेहळद, लोखंडी हळद, दारू हळद आणि सुगंधी हळद असे हळदीचे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे हळदीचे दूध बनवण्यासाठी नेमकी कोणती हळद वापरावी असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. हळदीचे दूध बनवण्यासाठी स्वयंपाकासाठी नियमित वापरली जाणारी सुगंधी हळद तुम्ही वापरू शकता. हळदीमुळे वात, पित्त आणि कफ प्रवृत्ती सतुंलित राहतात. शिवाय ती जंतुनाशक, विषबारक असते. बाजारातील भेसळयुक्त हळदीची पूड टाळण्यासाठी तुम्ही हळकुंड दळून घरी अथवा डंकावर हळद तयार करून ठेवू शकता.
हळदीचे दूध बनवण्याची पद्धत
हळदीचे दूध तुम्ही घरी अगदी साध्या पद्धतीने तयार करू शकता.
साहित्य –
- एक कप दूध
- एक छोटा चमचा हळद
- पाव चमचा आल्याची पावडर अथवा सुंठ
- पाव चमचा दालचिनी पावडर
- एक चिमूट काळीमिरी पावडर
- अर्धा चमचा मध
हळदीचे दूध बनवण्याची पद्धत
एका दूधाच्या पातेल्यामध्ये एक कप दूध गरम करा. उकळी येण्याआधी त्यामध्ये हळद, सुंठ, दालचिनी पावडर, काळीमिरी पावडर आणि मध टाका. एक उकळी आल्यावर गॅस बंद करा आणि कोमट झाल्यावर हळदीचे दूध गाळून प्या.
वाचा – ‘दालचिनी’चे असेही फायदे असतील हे माहीत नव्हते
गुडघेदुखीवर उपयुक्त आहे हळदीचे दूध –
हळदीच्या दुधात अॅंटि इनफ्लैमटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे अॅस्टिओ आर्थ्राटीस, रूमेटाईड अशा सांधेदुखीच्या समस्यांमध्ये आराम मिळतो. या सांधेदुखीमुळे गुडघ्यांना सूज येते आणि प्रचंड वेदना होतात. मात्र जर अशा रूग्णांनी नियमित वर दिलेलं हळदीचं दूध सेवन केलं तर त्यांना या आरोग्य समस्येला हाताळणं सोपे जाऊ शकते.
हळदीच्या दुधातून शरीराला दुधामधील कॅल्शिअम मिळतात. सहाजिकच त्यामुळे हाडांना बळकटी मिळते. हळदीचे दूध प्रतिकारशक्ती वाढवणारे असल्यामुळे हाडांच्या अनेक आरोग्य समस्या कमी होतात.
शिवाय हळदीमध्ये अॅंटि मायक्रोबाईल गुणधर्मही असतात. ज्यामुळे सांधेदुखीप्रमाणेच ज्यांना अस्थमा आणि फुफ्फुसांचे विकार आहे त्यांना लवकर आराम मिळतो. हळद आणि त्यासोबत इतर मसाले दूधात मिसळ्यामुळे शरीराला उष्णता मिळते. ज्यामुळे सर्दी, खोकला, सांधेदुखीतून त्वरीत आराम मिळतो.
हळदीचे दूध शरीराला लवचिकपणा देते ज्यामुळे सांधेदुखीमुळे अथवा सांधे जखडल्यामुळे होणारा त्रास कमी होतो.
हळदीच्या दुधाने चांगली झोप लागते. जर सांधेदुखी अथवा इतर समस्यांमुळे तुम्हाला शांत झोप मिळत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध पिणे फायद्याचे ठरू शकते.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
गाईचं दूध आवडत नसेल तर नियमित घ्या ‘बदामाचं दूध’