ADVERTISEMENT
home / Fitness
लठ्ठपणा ठरतोय वंधत्वाचे मुख्य कारण, जाणून घ्या तथ्य

लठ्ठपणा ठरतोय वंधत्वाचे मुख्य कारण, जाणून घ्या तथ्य

सध्याच्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे गर्भधारणेविषयी अधिक त्रास होताना दिसून येत आहे. अगदी लहान वयापासून ते मोठ्या वयापर्यंत गर्भधारणा न होणे ही आता हळूहळू सामाईक समस्या होऊ लागली आहे. पण त्याचे मुख्य कारण नक्की काय आहे याचा तुम्ही कधी शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे का? सतत ओबडधोबड खाण्यामुळे वजन वाढण्याची आणि लठ्ठपणाचीही समस्या वाढत चालली आहे आणि याचाचे थेट परिणाम होतो तो वंध्यत्वावर. याबाबत या लेखामधून आपण जाणून घेणार आहोत. याविषयी तज्ज्ञांचे मत आम्ही जाणून घेतले आहे.

नक्की कसा होतो परिणाम

नक्की कसा होतो परिणाम

Freepik.com

विशीतल्या तरुणींमध्ये वंध्यत्व कमी प्रमाणात आढळून येत असले तरी देखील गर्भवती होणे त्यांना अवघड असू शकते. वंध्यत्वाची सर्वात सामान्य कारणे म्हणजे पीसीओएस, एंडोमेट्रिओसिस आणि वाढते वजन अशी आहेत.  विशीतल्या तरुणींमधील वंध्यत्व त्रासदायक आणि निराशाजनक देखील असू शकते. पॉलिसिस्टिक ओव्हरिअन सिण्ड्रोम (पीसीओएस) या अवस्थेमध्ये अंडाशयांत छोटी पाण्याने भरलेली गळवे (सिस्ट) मोत्याच्या आकारात चिकटलेली असतात. याशिवाय हार्मोन्सचे असंतुलन दिसून येते. पुरुषांमध्ये आढळणाऱ्या हार्मोन्सचे प्रमाण स्त्रियांमध्ये वाढते आणि इन्सुलिनच्या चयापचयावर वाईट परिणाम होतात, मासिक पाळी अनियमित होते व रक्तस्रावही कमी होतो. गेल्या काही वर्षांत पीसीओएस असलेल्या स्त्रियांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पीसीओएसकडे एक गंभीर समस्या म्हणून बघणे आणि योग्य वेळा या आजारावर उपचार करणे ही काळाची गरज आहे. पीसीओएसने ग्रासलेल्या स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचा दर जास्त असतो. कारण त्यामुळे अनियमित ओव्यूलेशन होते किंवा ओव्यूलेशन होत नाही. वैद्यकीय मदतीशिवाय गर्भधारणा होणे त्यामुळे कठीण असते. एकतर व्यक्तीचे वजन जास्त असेल किंवा खाण्याच्या विकारांमधे एनोरेक्सिया नर्व्होसासारखे आहे ज्याचा ओव्हरीजच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. लठ्ठपणामुळे प्रजनन समस्या उद्भवू शकतात.

ADVERTISEMENT

गर्भाशय वाचविण्यासाठी काय आहे पर्यायी उपचार पद्धती

तज्ज्ञांची मते

पुण्याच्या मदरहुड हॉस्पीटलच्या स्त्रीरोग व प्रसुतीतज्ज्ञ, डॉ माधुरी बुरांडे लाहा यांनी अधिक माहिती देत म्हणाल्या, लठ्ठपणामुळे वंध्यत्व प्रमाण वेगाने वाढत आहे. लठ्ठ स्त्रियांमध्ये मधुमेह, पीसीओडी, उच्च रक्तदाब, -हदयविकार आदी गुंतागुंत वाढत असल्याने त्याचा थेट परिणाम देखील प्रजननार होऊ शकतो. त्याकरिता योग्य वजन राखणे, नियमित व्यायाम करणे नक्कीच फायदेशीर ठरु शकते.

नोव्हा फर्टीलिटी कन्सल्टंटच्या डॉ निशा पानसरे म्हणाल्या, वंधत्वासारख्या समस्येपासून दूर राहण्याकरिता जीनवनशैलीत बदल व व्यायाम करणे योग्य ठरेल. व्यायामासह वजन कमी होणे आवश्यक आहे आणि बीएमआय २४ पेक्षा कमी असावा. 

प्री-इम्प्लांटेशन अनुवांशिक निदान म्हणजे काय, गर्भधारणेसाठी उपयुक्त

ADVERTISEMENT

उपाय

Shutterstock

यावर तुम्ही काही मुलभूत उपायदेखील करू शकता.  जे तुम्हाला यातून बाहेर येण्यासाठी नक्की मदत करू शकतात.  मात्र याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणेही आवश्यक आहे.  आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही हे उपाय नक्की करा

  • ध्यान आणि योगसाधना यासाठी फायदेशीर ठरू शकते. 
  • तसेच, रात्रीची झोप घ्या. वरीलपैकी कोणतीही समस्या असलेल्या स्त्रियांना उच्च प्रथिनेयुक्त आहार, कमी कार्बोहायड्रेट निवडणे आवश्यक आहे 
  • लाल मांस, दुग्धजन्य पदार्थ, जंक फूड, कोल्ड ड्रिंक, कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन टाळा
  • वेळेवर जेवा आणि जास्तीत जास्त बाहेरचे पदार्थ खाणे टाळा 
  • योगसाधना करतानाही तज्ज्ञांचा सल्ला घ्या

पीसीओडीचा (PCOD) त्रास असेल तर या गोष्टी माहीत असायलाच हव्यातच

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

31 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT