अंजीर (Fig) या नावाने ओळखले जाणारे फळ बाजारात अगदी सहज उपलब्ध असते. इतर फळांच्या तुलनेत महाग असे हे फळ आरोग्यासाठी फारच लाभदायक असते. साधारण चिकूच्या आकाराचे असे हे फळ असते. अंजीराचे झाड हे फार मोठे वाढत नाही. या फळाला स्वत:चा असा गंध नसतो. आंबा, सफरचंद, स्ट्रॉबेरी, केळी, कलिंगड,चिकू,संत्री अशी फळ चिरल्यावर किंवा कापल्यावर त्याचा एक गंध येतो. पण अंजीर या फळाला तसा काही फारसा गंध नाही. पण त्याचा गर हा रसाळ असतो. हे फळ फोडल्यानंतर ते खाताना त्यामध्ये खूप दाणे-दाणे असल्याचे जाणवतात. अंजीर फळाचे झाड हे फार प्राचीन झाड आहे असे मानले जाते. तृर्कस्थान आणि भूमध्य सागराचा आसपासचा परीसर याठिकाणी याचे मूळ स्थान मानले जाते. ग्रीसमध्ये या फळाला ‘कैरिका’ असे म्हणतात. याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी याला वेगवेगळी नावं देण्यात आलेली आहेत. इटली, तुर्की, पोर्तुगाल आणि ग्रीस या ठिकाणी याची शेती केली जाते. उंबरवर्गीय असे हे फळ सुकवून सुकामेवा म्हणूनही खाल्ले जाते. अशा या हटक्या फळाचे अनेक फायदे आहेत. ज्याच्या आहारात अंजीर हे फळ असते. त्यांना बद्धकोष्ठता, पचनशक्तीच्या त्रासापासून आराम मिळतो. शिवाय रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासही मदत मिळते. असे हे अंजीर फळ असून या अंजीर खाण्याचे फायदे (anjeer benefits in marathi) जाणून घेणे फारच गरजेचे आहे. म्हणूनच आज जाणून घेऊया अंजीर खाण्याचे फायदे
अंजीर या फळाची माहिती घेतल्यानंतर यामध्ये नेमकी कोणती पोषकत्वे असतात ते जाणून घेणेही आहे तितकेच गरजेचे आहे. जाणून घेऊया अंजीर या फळामधील पोषक घटक आणि त्यांचे प्रमाण
वैज्ञानिक नाव: फिस्कस कारिका (Fiscus Karika)
मूळ प्रदेश: तुर्कस्थान
साधारण 100 ग्रॅम मागील प्रमाण
कॅलरीज : 43
प्रोटीन: 1.3 ग्रॅम
फॅट: 0.3 ग्रॅम
कार्बोदके : 9.5 ग्रॅम
फायबर : 2 ग्रॅम
पॉलिसॅच्युरेटेड फॅट: 0.106 ग्रॅम
मोनोसॅच्युरेटेड फॅट : 0.49 ग्रॅम
या शिवाय यामध्ये व्हिटॅमिन A, B, C असते.
अंजीरची पोषकत्वे जाणून घेतल्यानंतर अंजीर खाण्याचे फायदे काय ते जाणून घेऊया. हे फायदे जाणून घेतल्यानंतर अंजीरचे सेवन तुम्ही करु शकता.
शरीराची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर आजार हे चार हात दूर राहतात. अंजीरमध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट हे घटक प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. अनेक आजारांवर गुणकारी असे अंजीर असल्यामुळे त्याचे नित्य सेवन असेल तर शरीर सुदृढ राहण्यास मदत मिळते. अंजीरमध्ये असे कोणते घटक असतात जे प्रतिकारशक्ती वाढवतात? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर अंजीरमध्ये प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी चालना देणारे व्हिटॅमिन A,C, पोटॅशिअम, कॅल्शिअम,मॅग्नेशिअम असे काही महत्वाचे घटक असतात. जे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे शक्य असेल तेव्हा आहारात अंजीर या फळाचा समावेश करावा. हल्ली बाजारात वर्षभर अंजीराची फळ मिळतात. त्यामुळे त्याचे सेवन करण्यास काहीच हरकत नाही.
अंजीराचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे रक्त शुद्धीकरण. अंजीर शरीरातून हानीकारक घटक गुदद्वारातून बाहेर काढून टाकतो. त्यामुळे त्याचा फायदा शरीर शुद्धीकरणे आणि पर्यायाने रक्त शुद्धीकरणासाठीही होतो. अंजीर हा रक्तदाब, बद्दकोष्ठता आणि पचनाचे सगळे आजार दूर करण्यासाठी फारच फायदेशीर असे फळ आहे. रक्त पातळ करणे, रक्ताची वाढ करण्याचे काम अंजीर करते. रक्तशुद्धीकरणासाठी सुके अंजीर आणि अंजीर खाण्याचा सल्ला दिला जातो. योग्य सल्ल्यानिशी याचे सेवन केल्यास शरीराला अन्य फायदेही मिळतात.
शरीरासाठी फायबर हे फारच महत्वाचे असते. जर शरीरात योग्य प्रमाणात फायबर असेल तर शरीराच्या अनेक प्रणाली या चांगल्या कार्य करतात. अंजीरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. शरीरात फायबरचे प्रमाण योग्य असेल तर अरबटचरबट खाण्याची फारशी इच्छा होत नाही. ज्यांना वजन कमी करायचे असते अशांना चांगले फायबर शरीरात जाणे गरजेचे असते. अंजीरमध्ये डाएटरी फायबर (20%) असते. याशिवाय अंजीरामध्ये प्री बायोटिक्स असते. शरीरात चांगल्या बॅक्टेरियाला ठेवण्यास मदत करते आणि अनावश्यक शरीरातून बाहेर काढून टाकते. खारीक खाण्याचे फायदे पाहता त्यामध्ये फायबर असते जे शरीराला उर्जा देते.
अंजीर हे नैसर्गिक गोड आणि फॅट फ्री असे फळ आहे. अंजीरमध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साखर, मिनरल्स आणि सोल्युबल फायबर असतात. ज्यामुळे त्याचे सेवन केले तर शरीराला तरतरी येते. याशिवाय यामध्ये असलेले पोटॅशिअम, कॅल्शिअम,मॅग्नेशिअम, आर्यन आणि कॉपर असते.यामध्ये व्हिटॅमिन A आणि K असते ज्यामुळे शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळते. अंजीरामध्ये साधारण 200 कॅलरीज असतात. ज्याचे सेवन शरीरासाठी चांगले असते. बरेचदा प्रवासात किंवा कामादरम्यान खूप थकवा येतो. भूक लागलेली असते. पण जवळपास काही नसेल तर शरीरातून त्राण निघून जातो. काहीही करायची इच्छा होत नाही. शरीरातील साखर कमी झाल्यामुळे काहीही करावेसे वाटत नाही. अशावेळी डब्यात अंजीराची फळ किंवा सुके अंजीर ठेवावे. अंजीराचा जरासा तुकडा तोंडात टाकून चघळला तरी देखील फार बरे वाटते.
फार पूर्वी अंजीरचा उपयोग हा पोट साफ करण्यासाठी आणि पचनशक्ती चांगली करण्यासाठी केला जात होता. याचे कारण यामध्ये असलेले फायबरचा साठा. अंजीरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे ते पोटातील मल बाहेर टाकण्यात येणारा अडथळा दूर करते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा किंवा पाईल्सचा त्रास असेल तर त्यांनी अंजीरचे सेवन करावे. आतड्यांमध्ये मलाचे खडे झाल्यानंतर ते गुदद्वारातून बाहेर पडताना अनेक अडचणी येतात. अशावेळी जर अंजीर खाल्ले तर मल नरम करण्यास आणि गुदद्वारातून बाहेर पडण्यास मदत करते. पचनशक्ती वाढवण्यासाठी आणि पोटाचे कार्य सुरळीत करण्यासाठी आवर्जून अंजीराचे सेवन करावे.
अभ्यासांती हे सिद्ध झाले आहे की, अंजीराच्या सेवनामुळे ह्रदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. अंजीरामध्ये असलेले अर्क रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. अंजीरमध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी अॅसिड असते. त्यामुळे ह्रदयासंदर्भातील आजार दूर राहतात. रक्तामध्ये आढळणाऱ्या ग्लायएसेराईड नावाच्या घटकाला कमी करत आरोग्य चांगले राखण्याचे काम अंजीर करते. जर तुम्हाला ह्रदयरोगाची समस्या असेल तर तुम्ही योग्य सल्ला घेऊन आहारात अंजीर या फळाचा समावेश करु शकता.
अंजीरमध्ये असलेले व्हिटॅमिन आणि न्युट्रिएटंस त्वचेमधील आवश्यक घटक सीबम (Sebum), मेलिनन (Melanin) आणि त्वचेतील पाण्याची कमतरता अशा समस्यांना दूर ठेवत या घटकांचे आवश्यक प्रमाण शरीरात ठेवण्यास मदत करतात. अंजीरमध्ये असलेले घटक तुम्हाला सुरकुत्या, थकवा, अकाली वृद्धत्व यापासून दूर ठेवतात. त्वचा चिरतरुण ठेवण्यास मदत करतात. त्वचेखाली असलेले कोलॅजन नावाचे घटक जर योग्य प्रमाणात असेल तर त्वचा अधिक चांगली राहते. अंजीरच्या सेवनामुळे कोलॅजनचे प्रमाण योग्य राहते. त्यामुळे त्वचा दिवसेंदिवस अधिक चांगली दिसू लागते. कोणत्याही प्रकारची त्वचा असली तरी देखील त्या त्वचेशी निगडीत असलेल्या काही समस्यांना दूर ठेवत त्वचेला आवश्यक घटक पुरवण्याचे काम अंजीर करते. काजू हे फळही त्वचेसाठी फारच चांगले. काजू खाण्याचे फायदे जाणून घेतले तर अंजीर आणि काजू दोन्ही आरोग्यासाठी चांगले आहेत.
अंजीरच्या सेवनामुळे कोलन कॅन्सरला दूर ठेवण्यास मदत मिळते. अंजीरच्या सेवनामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. त्यामुळे यामुळे होणाऱ्या कॅन्सरची शक्यता दूर होते. अंजीराच्या बियांमध्ये श्लेष्म नावाचे एक घटक असले जे मलाचे नि:सरण करण्यासाठी मदत करते. याशिवाय महिलांमध्ये रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोनमध्ये चढ- उतार येत राहतात. हे चढ- उतार शरीरातील प्रतिकारशक्ती कमी करुन टाकतात. अशावेळी कॅन्सरचे घटक शरीरात वाढण्याची शक्यता असते. अंजीरचे सेवन केल्यामुळे शरीरातील अँटीऑक्सिडंट घटक वाढवतात. शिवाय मेनोपॉझनंतर होणाऱ्या स्तनांच्या कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यास अंजीर मदत करते.
शरीराला साखरेची आवश्यकता असते. अनेकदा रक्तात साखरेची कमतरता झाली तरी देखील शरीर हेलकावे खायला लागते. काहीही खाण्याची इच्छा होत नाही. साखर वाढू न देणे हे जसे शरीरासाठी गरजेचे आहे अगदी तसेच शरीरातील साखर कमी होऊ न देणे हे देखील तितकेच गरजेचे आहे. ज्यांन मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी अंजीरचे सेवन केले तर त्यांच्या शरीरातील इन्सुलिनचे कार्य अगदी सुरळीत चालण्यास मदत होते. मधुमेह असणाऱ्या व्यक्तिंना त्यांची साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अंजीर फारच फायदेशीर आहे. अशा व्यक्तींनी योग्य सल्ल्यानिशी अंजीराचे सेवन करावे. अंजीर हे नैसर्गिक गोड असल्यामुळे त्याचा गोडवा शरीराला आणि मधुमेहींना बाधत नाही.
त्वचेच्या अनेक समस्यांना दूर ठेवण्यासाठी अंजीरचा वापर केला जातो. त्वचेचा पोत आणि रंग एकसारखा ठेवण्यासाठी अंजीर फारच फायद्याचे असते. अगदी त्याचप्रमाणे अंजीर हे श्वेतकोडावर उत्तम काम करते.शरीरातील मेलनिनची कमतरचा भरुन काढण्याचे काम अंजीर करते. त्यामुळे श्वेतकोडाचा त्रास सुरु झाला असेल तर तो नियंत्रणात आणत येतो. आजही अनेक जण या त्रासावर आयुर्वेदीक उपचारपद्धती करतात. ज्यामध्ये अंजीराचा समावेश केला जातो.
सुक्या अंजीरमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. जर तुम्ही वजन वाढवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अंजीर 4 ते 5 खाल्ले तरी चालू शकेल. पण तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल आणि अंजीरातील पौष्टिक घटक मिळवायचे असतील तर तुम्ही साधारण 2 ते 3 अंजीर खा. तर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही.
अंजीर खाण्याचे तसे काही दुष्परिणाम नाहीत. पण जर तुम्ही त्याचे अति सेवन केले तर त्यामुळे जुलाब होण्याची शक्यता असते. अंजीरचे अती सेवन पोटाचे आरोग्य बिघडवू शकते. त्यामुळे अंजीर हे योग्य प्रमाणात खाणे फारच गरजेचे असते.
उपाशी पोटी इतर कोणत्याही ड्रायफ्रुटसोबत अंजीरचे सेवन करु शकता. हे सकाळी उठल्या उठल्या खाल्ले तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा मिळतो. तुमचे पोटही भरते. त्यामुळे अरबट चरबट खाण्याची इच्छा होत नाही. जर रात्री जेवणानंतर गोड खायची हुक्की आली असेल तर तुम्ही एक ते दोन तुकडे अंजीर खाल्ले तरी चालू शकतील.