ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
साडीसाठी पेटीकोट निवडताना नक्की लक्षात ठेवा या गोष्टी

साडीसाठी पेटीकोट निवडताना नक्की लक्षात ठेवा या गोष्टी

साडी हा प्रत्येक महिलेसाठी खास विषय आहे. फॅशन म्हटली की त्यामध्ये सतत बदल होत असतातच. जसं लग्नासाठी कानातले झुमके. पण साडीची फॅशन कधीही जुनी होत नाही. ती अपडेट होत राहाते. पारंपरिक आणि आधुनिक अशा मेळ असलेल्या साड्याही आता ट्रेंडिंगमध्ये आहेत. साडीची आवड महिलांमध्ये कधीच कमी होत नाही. बाजारात साड्यांचे अनेक डिझाईन्स, पॅटर्न आणि स्टाईल्स दिसून येतात. त्यामुळे साडीप्रमाणेच ब्लाऊज आणि अगदी आता पेटीकोटही (petticoat for saree) तितकेच वेगळे आणि छान असतात. साडी म्हटलं की ती व्यवस्थित नेसता आली पाहिजे आणि तुमच्या शरीराचा आकार तेव्हाच साडीमध्ये आकर्षक दिसेल जेव्हा तुमचा पेटीकोट व्यवस्थित असेल. योग्य पेटीकोट तुम्हाला साडी नेसताना निवडणे यायला हवे. बऱ्याच महिला साडी तर नवी खरेदी करतात पण त्यावर जुनाच पेटीकोट आहे आपण तोच वापरू हा आपल्याला ऐकायला येते. पण तो साडीमध्ये योग्य फिट होत नाही आणि मग त्याचा लुकही खराब होतो. त्यामुळे साडीसाठी योग्य पेटीकोट हवा असेल तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी ते आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत.

योग्य फिटिंग हवी – यासाठी वापरा शेपचा पेटोकोट

पेटीकोट निवडताना फिटिंगवर योग्य (perfect fitting) लक्ष द्यायला हवे. योग्य फिटिंग असेल तर तुम्ही अधिक सुंदर आणि आकर्षक दिसू शकता.  तुमची उंची आणि जाडी व्यवस्थित दिसावी यासाठी तुमच्या परकरची निवड योग्य असायला हवी. हल्ली बाजारामध्ये तुमच्यासाठी शेपवेअर पेटीकोट अर्थात परकर आले आहेत. तुम्हाला जर परकर करकचून बांधायची सवय  असेल तर ती वेळीच सोडा आणि अशा शेपवेअर पेटीकोटची (shapewear petticoat) निवड करा. हे परकर तुमच्या कमरेला योग्य फिट बसतात आणि त्याशिवाय तुम्हाला पोटाला करकचून बांधलेल्या नाडीचाही त्रास होत नाही. तुमच्या शरीराच्या आकाराप्रमाणे तुम्ही पेटीकोटची निवड करणे गरजेचे आहे. तुम्ही योग्य आकाराचा परकर घातला तर तुम्हाला साडी नेसणं सोपं जाईल आणि तुम्ही साडीमध्ये अधिक सोयीस्कररित्या वावरू शकता. 

रंगांकडे द्या लक्ष

रंगांबद्दल बोलायचे झाले तर साडीनुसार रंग तुम्हाला पेटीकोटचा (petticoat colour) निवडावा लागतो. ज्याप्रमाणे साडीचा रंग आहे त्याप्रमाणे साडीचा परकर तुम्हाला घालावा लागेल. गडद रंगाची साडी असेल तर कदाचित एक शेड कमी रंगाचा परक चालतो. पण जर पारदर्शी आणि हलक्या रंगाची साडी (transparent saree) असेल तर तुम्हाला त्यानुसारच पारखून पेटीकोट घ्यावा लागतो. तुम्ही साडीपेक्षा वेगळ्या रंगाचा पेटीकोट घातला तर ते दिसायला ग्रेसफुल दिसणार नाही. विशेषतः सी थ्रू फॅब्रिक (see through fabric) अर्थात शिफॉन, कॉटन, जॉर्जेट, नेट अशा साड्याय असतील तेव्हा तुम्हाला पेटीकोटच्या रंगांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. कारण या साड्यांमधून पेटीकोट दिसून येतो. त्यामुळे याची काळजी घ्या.

साडी नेसताना लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी, मिळवा परफेक्ट लुक

ADVERTISEMENT

पेटीकोटच्या उंचीकडे दुर्लक्ष करू नका

आपल्या उंचीनुसार पेटीकोटची निवड करा. स्डँडर्ड साईजचा पेटीकोट घेतला तर बघावं लागणार नाही असा विचार करून तुम्ही घेतलं तर ते योग्य नाही. उंचीनुसार तुम्हाला बाजारामध्ये पेटीकोट विकत घेता येतो. पेटीकोट हा नेहमी तुमच्या तळपायापेक्षा दोन इंच वर असायला हवा. अन्यथा पेटीकोटमध्ये चालताना पाय अडकू शकतो. तुम्ही जर फ्लोअर लेंथ साईजचा पेटीकोट विकत घेणार असाल तर साडी नेसल्यावर तो साडीतून बाहेर येतो आणि साडी वर जाते. हे दिसायला अत्यंत वाईट दिसते. तसंच चालतानाही तुम्हाला अडकायला होते. त्यामुळे पेटीकोट घेताना तुमच्या उंचीनुसारच तो निवडायला हवा. जास्त उंच असेल तर वेळीच अल्टर करून नंतर तो साडी नेसताना घालवा. जेणेकरून त्रास होणार नाही.

ब्रायडल आऊटफिटसाठी बनारसी साडी आहे उत्तम पर्याय

योग्य कापड निवडा

पेटीकोटचा कपडा हा साडीच्या कपड्यानुसार निवडावा लागतो. सिंथेटिक साडीमध्ये कॉटन पेटीकोट (cotton petticoats) घालून चालत नाही. हलक्या साडीवर तुम्ही जड पेटीकोट घालावा आणि जी साडी जड आहे त्याखाली तुम्ही हलका पेटीकोट घालवा. त्याचबरोबर तुमची साडी जर नेटची (petticoat for net saree) असेल तर तुम्ही अजिबात कॉटनचा पेटीकोट घालू नये. नेटच्या साडीसाठी तुम्ही नेहमी सॅटिन अथवा शिमर फॅब्रिक असणारा पेटीकोट वापरावा.

साडीचे नव्या ट्रेंडमधील 5 प्रकार – कशी नेसावी साडी

ADVERTISEMENT

डिझाईनर पेटीकोट कधी वापरावा

आजकाल बाजारामध्ये डिझाईनर पेटीकोटदेखील दिसून येतात. तुमच्या साध्या साडीलाही उत्तम लुक देण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. विशेषतः सी थ्रू फॅब्रिकची साडी असेल तर तुम्ही प्रिंटचे पेटीकोट घालू शकता. बाजारात सिल्क, रॉ सिल्क, सॅटिन, मलमल इत्यादी कपड्याचे पेटीकोट मिळतात. पण याची निवड करताना साडी कोणती आहे ते आधी विचारात घ्या. पेटीकोटमध्ये हलकी एम्ब्रॉयडरी, प्रिंट आणि सिक्वेन्स वर्क तुम्हाला पाहायला मिळते. नेट, ऑर्गेझा आणि शिफॉन साड्यांवर तुम्ही अशा प्रकारचे पेटीकोट्स वापरू शकता.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

02 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT