घरात मुलामुलींचा जन्म झाला की, सर्वात घाई होते ती म्हणजे बाळाचे नाव नक्की काय ठेवायचे. आजूबाजूचे सर्वच बाळासाठी वेगळे आणि अर्थपूर्ण नाव सुचवायला सुरूवात करतात. पण सगळीच नावे आपल्याला आवडतात असं नाही. तर काही जणांना बाळाच्या जन्मानंतर कोणते अक्षर आले आहे त्यावरूनच नाव ठेवायचे असते. एखाद्या बाळाचे नाव व वरून ठेवायचे असेल तर तुम्हाला हा लेख नक्की उपयोगी ठरेल. व वरून मुलांची नावे (Baby Boy Names Starting With V) आम्ही तुम्हाला या लेखातून सुचवणार आहोत. हल्ली अगदी सेलिब्रिटींपासून सगळीकडे बाळ होत असल्याचे ऐकिवात आहे. व वरून मुलांची नावे खूप आहेत. पण ती अगदी कॉमन नावे नको असतात. मग अशीच काही आगळीवेगळी व वरून मुलांची नावे, खास तुमच्यासाठी.
अर्थपूर्ण युनिक व वरून मुलांची नावे (V Varun Mulanchi Nave In Marathi – Unique Names)
व वरून मुलांची नावे – V Varun Mulanchi Nave In Marathi – Unique Names
व वरून मुलांची नावे अनेक आहेत. पण बऱ्याच कुटुंबामध्ये मुलाचा जन्म झाल्यानंतर हल्ली कॉमन नावे ठेवण्याचे टाळले जाते. सर्वांना युनिक आणि वेगळी नावे हवी असतात. अशीच काही वेगळी आणि युनिक व वरून मुलांची नावे तुम्हाला आम्ही सांगत आहोत. मुलांचे नाव मराठी असावे असंही बऱ्याच जणांना वाटते. तसेच लहान मुलांचे नाव आपल्याकडे पहिल्या सव्वा महिन्यात ठेवायचीही पद्धत आहे. शोधण्यासाठी साधारण महिनाभर असतो.
नावे | अर्थ |
वचन | देण्यात आलेली साथ, वाचा |
वंदन | नमन, एखाद्याला नमस्कार करणे |
वागिंद्र | बोलण्याची देवता |
वागिश | ब्रम्हदेवाचे एक नाव, बोलण्याची देव |
वदिन | प्रसिद्ध भाषण देणारा, समजून सांगणारा |
वैकरण | कर्णाचे नाव |
वैखण | विष्णूचे नाव |
वैष्णव | विष्णूचा पंथ, विष्णू देवाचे नाव |
वैशांत | शांत आणि उगवता तारा |
विराज | धर्माची जपणूक करणारा, राज्यावर अधिकार गाजवणारा |
वजेंद्र | इंद्रदेव, इंद्रदेवाचे दुसरे नाव |
वैरजित | इंद्रदेवाचे दुसरे नाव |
वल्लभ | प्रेमळ, दत्त देवाचे दुसरे नाव, दिगंबर |
वामन | विष्णूचा अवतार |
वैश्विक | जग, जगभरातील |
विरळ | अत्यंत कमी, तुटक असा |
वैकुंठ | विष्णूचे स्थान |
वैजयी | विजय प्राप्त करणारा, विजय मिळवणारा |
वैदिक | वेदांचे ज्ञान असणारा, वेदाचा भाग, वेद |
वैराग्य | सर्व सुखापासून दूर राहणारा, कोणत्याही गोष्टीचा मोह नसणारा |
विराट | भव्य, मोठे |
वैशाख | मराठी महिना |
वैष्णय | कृष्णासाठी आणि विष्णूसाठी लागणारी फुले |
वजरंग | हिऱ्याने मढलेला |
वज्रभ | हिऱ्याप्रमाणे असणारा |
वज्रधर | इंद्रदेव, इंद्राचे नाव |
वज्रत | अतिशय कठीण |
वज्रवीर | योद्धा |
वीर | योद्धा, लढणारा |
वकसू | ताजेपणा असणारा, कायम ताजातवाना |
वनज | निळे कमळ |
वनपाल | जंगालाचा रक्षणकर्ता, वनातील मुख्य |
वनस | अत्यंत चांगला, प्रेमळ |
वानव | अत्यंत हुशार, बुद्धिमान |
वरद | गणपतीचे नाव |
विश्व | जग |
वंश | वाढणारा अंश, पुढे घेऊन जाणारा, एखाद्याचा वाढता वंश |
वेदांत | वेदाचा भाग |
वेद | वेद, उपनिषदाचा भाग |
विश्वजित | विश्वाला जिंकून घेणारा |
वाचा – त वरून मुलांची नावे, नवी नावे
व वरून मुलांची नावे, रॉयल नावे अर्थासह (Royal Boys Names Start With V In Marathi)
व वरून मुलांची नावे – Royal Boys Names Start With V In Marathi
व वरून मुलांची नावे, रॉयल नावे अर्थासह जाणून घ्या. अनेक नावांमधूनही काही कुटुंबाना रॉयल नावे हवी असतात. व वरून मुलांची काही रॉयल नावे आम्ही तुम्हाला सुचवत आहोत. यापैकी काही नावे आधुनिक तर काही नावे ही युनिक आहेत. तुम्हाला यातील जे नाव आवडेल ते तुम्ही तुमच्या बाळासाठी नक्कीच निवडू शकता. इतकंच नाही हल्ली marathi celebrity baby names काय आहेत याचाही ट्रेंड आला आहे त्यानुसार आपल्या मुलांची नावेही ठेवण्यात येतात. ही नावे अनेकदा रॉयल असतात. अशीच काही नावे खास तुमच्यासाठी
स अक्षरावरून मुलांची नावे, तुमच्यासाठी खास नावे अर्थासह
नावे | अर्थ |
वरदान | शंकराचे एक नाव, मिळालेला आशिर्वाद |
विशेष | महत्त्वाचे, विशिष्ट असे |
विद्युत | विज, विजेसारखा चपळ |
विहंग | इंद्राचे एक नाव |
वृषभ | मराठीमधील एक रास, राशीचे एक नाव, बैल |
विक्रांत | शक्तीशाली, योद्धा |
वर्धमान | महावीराचे एक नाव, महावीर देव |
वर्धान | शंकर देवाचे एक नाव, वाढत जाणारा, वाढीव |
वरायू | उत्तम, उत्कृष्ट |
वर्दिश | देवाचा आशिर्वाद मिळालेला, देवाचा वरदहस्त असणारा |
वरेश | सर्वांना आशिर्वाद देणारा, शंकर देवाचे एक नाव |
वरिष्ठ | मोठा, मानाने मोठा असणारा |
विजयेंद्र | कायम जिंकणारा, जिंकून आलेला, जिंकण्याचा मान मिळवलेला |
वर्ण | रंग, वेगळ्या रंगाचा |
वर्णिल | वर्णाचे वर्णन करणारा, वर्णन करणारा |
वरूण | पावासाची देवता, इंद्र देवतेचे एक नाव |
वसिष्ठ | पुरातन ऋषींचे एक नाव, नदीचे नाव |
वर्षिथ | वर्ष, पावसाच्या देवतेचे एक नाव |
वरूत्र | संरक्षण करणारा, सांभाळणारा |
वैशिष्ट्य | विशिष्टता असणारा, एखाद्या गोष्टीबाबत विशेषता जपणारा |
वत्सल | प्रेमळ, प्रेमापोटी जपणूक करणारा, दयाळू |
वात्मज | हनुमान देवाचे एक नाव, आत्म्याशी जवळीक असणारा |
वत्स | लहान मूल, एखाद्याचे बाळ |
वयून | नेहमी मजेत राहणारा, सतत आनंदी राहणारा |
वेदान | धर्माचे ज्ञान प्राप्त झालेला, वेद माहीत असणारा |
वेदम | देव, देव शब्दाचा दुसरा अर्थ |
वेदंग | वेदांपासून आलेला, वेदांमध्ये दंग राहणारा |
वेदांश | गणेशाचा एखादा अंश, गणेशाचे नाव |
वेदार्ष | ब्रम्हदेव, वेदाचा निर्माणकर्ता |
वेदश्व | नदी, वेदाचे विश्व |
वेदिक | पुरातन, अतिशय जुने असे, वेद काळातील |
वेदराज | सर्व वेदांचा राजा असा |
वेद्विक | वेदांचे ज्ञान पसरवणारा असा |
विरेंद्र | धैर्यवान, धैर्यशील, वीर योद्धा |
वीरभद्र | भगवान शंकराचा पुत्र |
विरेश | धैर्यवान, देव |
विहान | शक्ती, हुशार |
वेंदान | राजा |
वियान | अत्यंत सुंदर मन असणारा, आयुष्य अत्यंत मनभरून जगणारा |
वियांश | कृष्णाचा अंश, आयुष्य मनभरून जगणारा |
वाचा – “द” वरून मुलांची नावे, अर्थपूर्ण आणि युनिक
आधुनिक नावे – व वरून मुलांची नावे (V Varun Mulanchi Nave In Marathi – Modern Names)
व वरून मुलांची नावे – V Varun Mulanchi Nave In Marathi – Modern Names
कोणत्याही बाळाचे नाव हल्ली कुटुंबामध्ये सामान्य असावे असे वाटत नाही. आधुनिक काळात आपल्या मुलांची आधुनिक नावे ठेवायची असतील तर व वरून मुलांची काही आधुनिक नावे आम्ही तुम्हाला सुचवत आहोत.तुम्हीही या नावांचा विचार करू शकता.
नावे | अर्थ |
विभंकर | सूर्याचा स्रोत, सूर्य |
वियामर्ष | चर्चा, शंकराचे एक नाव |
विभराज | चमकत राहणारा, सतत चमक देणारा |
विभूष्णू | शंकर देवाचे एक नाव |
विभूत | एक धार्मिक अंश, अत्यंत चांगले व्यक्तीमत्व |
विबिंदू | चंद्र, कोणालाही न घाबरणारा असा |
विबोध | अत्यंत हुशार, कधीही न फसणारा |
विदक्ष | कायम दक्ष राहणारा, सजग |
विदेश | परका देश, वेगळ्या देशातील |
विहार | फिरणारा, वेगवेगळ्या ठिकाणी फिरत राहणारा |
विनीत | नेहमी नीटनेटका वागणारा, नम्र |
विधीत | पद्धत, न्याय, निवडा |
विधीन | रितीभाती, रितीरिवाज, रिती |
विध्येश | देवाचे ज्ञान असणारा, शंकर देवाचे एक नाव |
विदोजस | इंद्र देवाचे एक नाव, बळकटी असणारा |
विराजस | महान आत्मा, वसिष्ठ ऋषींचा मुलगा |
विद्वंश | शिकत राहणाऱ्यांचा मुलगा |
विद्वान | हुशार, अत्यंत हुशार असणारा |
विघ्नेश | गणपतीचे नाव |
विपुल | मोठा, पुष्कळ |
विद्यांश | विद्येचा अंश, विद्येचा एक भाग |
विभूती | धार्मिक अंश असणारा, अंगारा |
विज्ञेश | विद्येचा अंश असणारा, बुद्धिमान |
विश्वेश | विश्वात सामावणारा, विश्वातील |
वहीन | शंकराचे एक नाव, शंकर |
विज्वल | सिल्क कॉटनचे झाड |
व्यंजन | अक्षरे, अक्षरांमधील एक प्रकार |
वसुर | अत्यंत मौल्यवान |
विदुर | हुशार, बुद्धिमान |
विरोचन | चंद्र, आग |
विदेह | कोणत्याही स्वरूपात नसलेला |
विपीन | वन, जंगल |
वज्रनाभ | कृष्णाचे शस्त्र |
वज्रानंद | वज्रभूमीचा आनंद |
वनराज | सिंह |
वसू | द्रव्य, संपत्ती, शिवाचे एक नाव |
वसुषेण | कर्ण राजाचे मूळ नाव |
वागीश | वाणीचा परमेश्वर, वाचा |
व्यास | ऋषींचे नाव, महाभारताचे आदिकवी |
विक्रमादित्य | थोर सम्राट, विक्रमाला गवसणी घालणारा, सूर्य |
वाचा- प वरून मुलांची नावे, युनिक नावे अर्थासह
व आद्याक्षरावरून नवी नावे (V Varun Mulanchi Nave – New Names)
व आद्याक्षरावरून नवी नावे – V Varun Mulanchi Nave New Names
व वरून मुलांची नावे खूपच वेगवेगळी आहेत. काही पुरातन आहेत. तर काही नवी नावेही आपल्याला माहीत असयाला हवीत. काही गणपतीची नावे असतात. तर काहींना वेगवेगळ्या देवांची नावेही ठेवायची असतात. तर काही जणांना आपल्या मुलाचे नाव वेगळे आणि नवे असावे असे वाटत असते. अशाच काही नावांची यादी आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत.
नावे | अर्थ |
विद्येश | विद्येचा स्वामी असणारा, विद्या देणारा |
विद्याधर | श्रीगणेशाचे एक नाव, विद्येशी निगडीत असणारा |
विनद | आनंद |
विनयन | नम्रता, नम्र असणारी अशी व्यक्ती, नेहमी विनयाने वागणारा |
विप्रदास | ब्राह्मणाचा सेवक असणारा, धार्मिक काम करणारा |
विभव | वैभव, संपत्ती |
विभास | दिवसाचा पहिला प्रहर |
विमलेंदु | निर्मल असा चंद्र, चंद्राची शीतलता |
विभोर | उन्मादपूर्ण असा, गर्विष्ठ |
विमन्यू | रागापासून मुक्त असणारा असा, रागीट नसणारा |
वीरधवल | योद्धा, वीर |
विराग | यती |
वीरसेन | नल राजा, निषध देशाचा राजा |
विलोचन | शंकराचे नाव, शंकर |
विवस्वत | ऋषीचे नाव, युगकर्ता मनू, यमाचा पिता |
विवस्वान | राजहंस |
विश्वनाथ | जगाचा नाथ, विश्वाचा नाथ |
विश्वंभर | जगाचा पालनकर्ता |
विश्राम | आराम, विश्रांती करण्याची पद्धत |
विश्वसुहृद | जगनमित्र |
विश्वेश्वर | जगाचा मालक, जगज्जेता |
विष्प्राप | पाप न करणारा, कधीही पाप न लागणारा |
वैनतेय | गरूड पक्षी |
व्योम | आकाश, गगन |
व्योमेश | आकाशाचा स्वामी अर्थात सूर्य आणि चंद्र |
वंदन | अभिवादन, नमस्कार |
वृंदावन | कृष्णाची नगरी, कृष्णाचा अधिवास |
विंदू | अनुस्वार |
व्योमकेश | शिवाचे एक नाव |
वैजनाथ | शंकर, नवनाथांपैकी एक |
विशोक | शोक नसणारा, कायम आनंदी |
विवस्वान | हंस, हंसाप्रमाणे बागडणारा |
वनिश | थरथराट, घाबरणे |
विवेक | संयम |
वामदेव | शंकर देवाचे एक नाव |
वायु | वारा, हवा, हवेचा झोका |
वैजयी | जिंकून आलेला, जिंकणारा |
वजरत्न | संपत्तीतील भाग, खजिना |
वज्रहस्त | हातात शस्र असणारा, शंकराचे एक नाव |
वज्रकाया | कधीही न लागणारा, हनुमानाप्रमाणे शरीर असणारा, शक्तीशाली, भ्याड नसणारा |
देखील वाचा –
लड़कियों के नाम की लिस्ट और उनके अर्थ
बच्चों के नये नाम की लिस्ट 2020
“न “वरून मुलांची नावे, खास तुमच्यासाठी
‘ध’ वरुन मुलांची नावे, युनिक आणि आधुनिक अर्थासह
फ वरून मुलींची नावे, अर्थासहित
प वरुन मुलींची रॉयल नावे अर्थासह
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक