ADVERTISEMENT
home / आरोग्य
हिरड्या निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय

हिरड्या निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय

निरोगी राहण्यासाठी संपूर्ण तोंडाची योग्य निगा राखणं गरजेचं आहे. कारण दात आणि हिरड्यांवर तुमची पचनशक्ती अवलंबून आहे. जर दात आणि हिरड्या निरोगी नसतील तर याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ लागतो. आजकाल दातांच्या समस्यांसोबतच हिरड्या सूजणं, हिरड्यांमधून रक्त येणं, हिरड्यांची जळजळ होणं असे हिरड्यांचे विकारही वाढू लागले आहेत. जर तुम्हाला तुमच्या हिरड्या निरोगी ठेवायच्या असतील तर नियमित दात घासणे, चुळ भरणे, वर्षातून एकदा डेंटल चेकअपसोबत हे काही घरगुती उपचार अवश्य करा. 

हिरड्यांची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपाय –

दातांप्रमाणेच नियमित हिरड्यांची काळजी घेणंही तितकंच आवश्यक आहे.

नियमित ऑईल पूलिंग करा –

आयुर्वेदामध्ये दात आणि हिरड्यांची काळजी घेण्यासाठी हा एक परिणामकारक उपाय सूचवण्यात आलेला आहे. मात्र अजूनही लोकांना याबाबत पुरेशी माहिती नाही. हिरड्या मजबूत राखण्यासाठी ऑईल पूलिंग करणे नक्कीच फायद्याचे ठरू शकते. यासाठी दररोज सकाळी  दात घासण्यापूर्वी तोंडात एक चमचा नारळाचे तेल घ्या आणि त्याने ऑईल पूलिंग करा. ऑईल पूलिंग करणे म्हणजे तेल तोंडात ठेवून ते फेसाळ होईपर्यंत चूळ भरणे. मात्र लक्षात ठेवा हे तेल तुमच्या घशातून पोटात जाता कामा नये. कारण ऑईल पूलिंगमुळे तोंडातील जीवजंतू या तेलात मिसळून जातात. त्यानंतर ते तेल थुंकून टाका आणि ब्रश करा. असं केल्यामुळे तोंडाचे आरोग्य राखले जातेच शिवाय हिरड्या मजबूत होतात आणि पचनसंस्था सुधारते.

कडुलिंबाचा वापर करा –

कडुलिंबाचे झाड म्हणजे देवाने माणसाला दिलेले वरदानच आहे. कारण या झाडाच्या मुळांपासून पानांपर्यंत प्रत्येक गोष्टीचा औषधाप्रमाणे वापर होतो. कडुलिंबाची पाने चघळणे आरोग्याप्रमाणेच तुमच्या दात आणि हिरड्यांसाठी उपयुक्त ठरते. कडुलिंबाची पाने अॅंटि बॅक्टेरिअल, अॅंटि इनफ्लैमटरी आणि अॅंटि सेप्टिक असताात. ज्यामुळे तुमचे दात आणि हिरड्या निर्जंतूक होतात. शिवाय यामुळे हिरड्याय मजबूत होतात. हिरड्यांची सूज कमी होते, रक्त येणे थांबते.

ADVERTISEMENT

टी ट्री ऑईलचा वापर करा –

टी ट्री ऑईल औषधी असल्यामुळे दातांच्या आरोग्यासाठी याचा वापर नक्कीच करता येतो. आजकाल टुथपेस्टमध्येही टी ट्री ऑईल वापरले जाते. हिरड्यांना आलेली सूज टी ट्री ऑईलमुळे कमी होते. मात्र त्याचा थेट वापर कधीच करू नये. एखाद्या तेलात मिसळून मगच टी ट्री ऑईल वापरावे. 

टूथपेस्ट निवडताना काय काळजी घ्याल –

दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी टुथपेस्ट निवडताना योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला वारंवार हिरड्यांच्या समस्या जाणवत असतील तर फ्लोराईड असलेली आणि एडीए स्वीकृत टुथपेस्टची निवड दातांसाठी करा. हिरड्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी आणि तोंडाला येणारा घाण वास कमी करण्यासाठी अशी टुथपेस्ट तुमच्या नक्कीच उपयोगी पडेल.

व्हिटॅमिन सी युक्त फळं आणि भाज्या खा –

व्हिटॅमिन सी युक्त पपई, द्राक्षं, आंबा, किवी, स्टॉबेरी अशी फळं आणि ब्रोकोली, भोपळी मिरची अशा भाज्या खाण्यामुळेही तुमच्या हिरड्या मजबूत होतात. दात आणि हिरड्यांमध्ये होणारी जळजळ आणि दाह कॅनबेरीच्या सेवनाने कमी होतो असं एका संशोधनात  आढळलं आहे. कारण यातील घटक द्रव्ये जीवजंतूना दातात चिकटण्यापासून परावृत्त करते. सहाजिकच तुमच्या दात आणि हिरड्यांच्या समस्या यामुळे हळू हळू कमी होतात. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

जाणून घ्या दात पांढरे करण्याचे उपाय (Teeth Whitening At Home In Marathi)

अक्कल दाढ दुखीवर उपाय (Akal Daad Symptoms In Marathi)

07 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT