Oil pulling एक आयुर्वेदिक ओरल थेरेपी

Oil pulling एक आयुर्वेदिक ओरल थेरेपी

Oil pulling हा ओरल क्लिनिंगचा एक आयुर्वेदिक प्रकार आहे. अगदी प्राचीन काळापासून ही पद्धत दात आणि तोंडाचा आतील भाग स्वच्छ करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. ज्यामध्ये तोंडात खाद्यतेल घेऊन त्याने चुळ भरली जाते. ज्यामुळे दातातील अस्वच्छता आणि जीवजंतू कमी होण्यास मदत होते. Oil pulling मुळे  केवळ तुमचे दात स्वच्छ होतात असं नाही तर हे टेकनिक तुमच्या आरोग्यासाठीदेखील अतिशय उत्तम असते. कारण नियमित ऑईल पुलिंग केल्यामुळे तुमचं वजनदेखील कमी होऊ शकतं. कसं ते जाणून घेण्यासाठी ही माहिती जरूर वाचा.

Shutterstock

Oil pulling कसं करावं -

Oil pullingऑईल पुलिंग ही एक प्राचीन ओरल थेरेपी आहे. आयुर्वेदिक तज्ञ्जांच्या सल्लानुसार ऑईल थेरपी केल्यास तुम्हाला त्याचे चांगले फायदे मिळू शकतात. यासाठी सकाळी उठल्यावर अथवा रात्री झोपताना दात स्वच्छ करा. ब्रश केल्यानंतर एक मोठा चमचा खाद्यतेल तुमच्या तोंडात घ्या. यासाठी तुम्ही नारळाचे तेल अथवा ऑलिव्ह ऑईल वापरल्यास चांगला फायदा होतो. जीभेच्या मदतीने ते तुमच्या संपूर्ण तोंडाच्या पोकळीत फिरवा. ज्यामुळे तोंडातील घाण आणि जीवजंतू त्या तेलाला चिकटतील. नंतर दहा ते पंधरा मिनीटे खळखळून चुळ भरा ज्यामुळे तेल पाण्याप्रमाणे पातळ होईल. दहा ते पंधरा मिनीटांनी ते तोंडातून बाहेर टाकून द्या. तेल थुंकल्यावर पाण्याने चुळ भरा आणि त्यावर एक ग्लास पाणी प्या. सुरुवातीला ही प्रक्रिया करणं थोडसं कठीण जाईल मात्र सराव केल्यामुळे तुम्हाला ऑईल पुलिंग नक्की जमू लागेल. ऑईल पुलिंग करताना सुरूवातीच्या काळात तेल पोटात जाण्याची शक्यता दाट असते. मात्र असं झाल्यास काळजी करू नका कारण खाद्यतेल असल्यामुळे त्याचा चुकीचा परिणाम नक्कीच होत नाही. मात्र शक्य असल्यास ते न गिळता फक्त चुळ भरण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचदा  सकाळी अथवा संध्याकाळी व्यायामानंतर आईल पुलिंग करण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय सकाळी ऑईल पुलिंग करण्यापूर्वी नैसर्गिक विधी उरकून घ्यावेत. ज्यामुळे ऑईल पुलिंगचा फायदा चांगला मिळू शकतो. ऑईल पुलिंग नियमित केल्यामुळे हळूहळू तुमच्या आरोग्यावर त्याचे सुपरिणाम दिसून येतात.  

चहा वृक्ष तेलाचे फायदे देखील वाचा

 

Oil pulling चा आरोग्यावर होणारा फायदा

नारळाच्या तेलामध्ये अथवा ऑलिव्ह ऑईलमध्ये अॅंटिऑक्सिडंट गुणधर्म  भरपूर असतात ते तेलावाटे तुमच्या तोंडामध्ये जातात. Oil pulling मुळे तुमच्या तोंडाची संपूर्ण स्वच्छता राखली जाते. शिवाय तोंडाचा आतील भाग निरोगीदेखील होतो. ऑईल पुलिंगमुळे तोंडामधील जीवजंतू तेलावाटे बाहेर टाकले जातात. शिवाय यामुळे दात किडणे, तोंडाला दुर्गंध येणे, हिरड्यांचे विकार कमी करण्यास मदत होते. दात आणि हिरड्या मजबूत आणि स्वच्छ होतात. तोंडातून चांगला सुंगध येतो. ज्यामुळे चारचौघात बोलण्याचा संकोच वाटत नाही. कफ, सर्दी, खोकला, घशाचे विकार कमी होतात. दृष्टीदोष कमी होतात. तोंडाला चव नसल्यास हा उपाय केल्यामुळे चांगला फायदा होतो. तोंडाच्या आरोग्याचा  तुमच्या पचनसंस्थेशी संबध येत असल्यामुळे हा उपाय करून तुम्ही तुमच्या अपचनाच्या समस्या कमी करू शकता. ज्यामुळे शरीर शुद्ध आणि डिटॉक्स होण्यास मदत होते. जीभ, तोंड, दात यांचा संबंध तुमचे पोट, पचनक्रिया आणि संपूर्ण शरीरावर होत असल्यामुळे तुमचे आरोग्य सुधारते. वजन कमी करायचे असल्यास हा उपाय केल्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. कारण पचनक्रिया सुधारल्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहते. ऑईल पुलिंग केल्यामुळे तुमचे शरीर आणि मन आनंदी आणि उत्साहित राहण्यास मदत होते. ज्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण आरोग्यावर नक्कीच होतो. 

 

फोटोसौजन्य - शटरस्टॉक

अधिक वाचा -

पिवळे दात मोत्यासारखे शुभ्र होण्यासाठी घरगुती आणि सोपे उपाय

दातदुखीसाठी घरगुती उपाय, मिनिटात मिळेल आराम

तुमचे smile खुलवणाऱ्या या नव्या उपचारपद्धती तुम्हाला माहीत आहेत का