उन्हाळा आला की, रोजचे कपडेही अगदी नकोसे होऊ लागतात. शरीरावर कॉटन शिवाय काहीही असू नये असे वाटू लागते. पुरुषांचे चालून जाते. पण स्त्रियांना अगदी सगळे कपडे घातल्यावाचून पर्याय नसतो. महिलांना कितीही उकाडा झाला तरी हे सगळे कपडे घालावेच लागतात. उन्हाळ्यात तुम्हाला नियमित वापरातील ‘ब्रा’ बोचत असतील तर काही काळासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या वापरातील ब्रांना ब्रेक द्या आणि त्या ऐवजी काही काळासाठी वेगळ्या प्रकारच्या ब्रा घालायला घ्या. ज्या तुम्हाला मुळीच टोचणार नाहीत. उलट अशा ब्रा घातल्यानंतर तुम्हाला आरामदायी वाटेल. जाणून घेऊया असेच काही ब्राचे प्रकार
उन्हाळ्यात कम्फर्टेबल लुकसाठी वापरा अशा ब्रा
स्पोर्टस ब्रा
व्यायामासाठी वापरल्या जाणाऱ्या या प्रकाराला स्पोर्टस ब्रा असे म्हटले जाते. या ब्रामध्ये हुक्स असा प्रकार नसतो. या ब्राचे पट्टे हे तुलनेने थोडे जाड असल्यामुळे ते लागत नाही. उन्हाळ्यात सगळ्यात जास्त त्रास हा ब्रा चे पट्टे लागणे. स्तनांखाली वळ उठणे असा होत असतो. अशावेळी तुम्ही स्पोर्टस ब्राचा पर्याय निवडा. त्यामुळे तुमच्या स्तनांनाही चांगली उभारी मिळते आणि गरमही होत नाही. यामध्ये अनेक प्रकार मिळतात. त्यापैकी तुम्ही आरामदायी असा प्रकार निवडणे हे नेहमीच उत्तम असते.
फुल कव्हरेज ब्रा
ब्रामध्ये असलेला हा प्रकार उन्हाळ्यासाठी फारच परफेक्ट असतो. जर तुम्ही पुश अप्स किंवा अशा काही फॅन्सी ब्रा घालत असाल तर त्यामध्ये स्तनांचा आकार हा खूप आकर्षक दिसतो. पण उन्हाळ्यात या ब्रा अगदीच नकोशा होतात. त्या इतक्या टोचू लागतात की, त्या काढून टाकण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही फुल कव्हरेजच्या ब्रा या अधिक आरामदायी असतात.थोड्याशा स्पोर्टस ब्रा कडे झुकणारा हा प्रकार असला तरी या ब्रामुळे तुम्हाला एक छान लिफ्ट मिळते. शिवाय यामुळे त्वचेवर वळही येत नाही.
वायर्ड ब्रा घालताय? तर वाचा चुकीच्या फिटिंगचे नुकसान
स्पँडेक्स ब्रा
स्पँडेक्स ब्रा यादेखील फार आरामदायी असतात या ब्रा पाहिल्यानंतर तुम्हाला त्यामुळे गरम होईल असे वाटेल. पण त्यामध्ये गरम मुळीच होत नाही. उलट या ब्रामध्ये थोडासा आराम मिळतो. कॉटनच्या तुलनेत या ब्रामध्ये अधिक सुटसुटीत वाटते. यामध्ये तुम्हाला हुक किंवा प्लेन बॅक असाही पर्याय मिळतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यापैकी कोणताही प्रकार निवडू शकता.
ब्रा लेट
नियमित ब्राच्या तुलनेत थोड्याशा मोठ्या असलेल्या या ब्रादेखील दिसायला जितक्या सुंदर तितक्याच आरामदायी असतात. यामध्ये लेस ब्रामधील प्रकार निवडू नका. कारण असे प्रकार हे अधिक टोचतात. त्या ऐवजी तुम्ही जर यामध्ये होजिअरी मटेरिअल निवडले तर तुम्हाला जास्त आराम मिळेल. ब्रा लेट या तुम्हाला सिथेटीक मटेरिअलमध्येही मिळतात. पण त्या शक्यतो टाळा. त्यामुळेही तुम्हाला गरम होऊ शकते.
आता तुमच्या रोजच्या ब्रा घालण्यापेक्षा उन्हाळ्याच्या या उकाड्यापासून सुटका मिळावी म्हणून ब्रा चे हे काही प्रकार नक्की घाला.
तुमचे इनरवेअर्स ‘एक्सपायर्ड’ झाले आहेत का? जाणून घेण्यासाठी वाचा