ADVERTISEMENT
home / Care
पांढरे केस काळे करण्यासाठी वापरा आंब्याची पाने

पांढरे केस काळे करण्यासाठी वापरा आंब्याची पाने

 

 

आधुनिक जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या पद्धती, प्रदूषण, ताणतणाव, अती प्रमाणात केलेल्या हेअरस्टाईल या सर्वांचा परिणाम तुमच्या केसांवर होतो. ज्यामुळे केस वय वाढण्यााधीच पांढरे होतात.  शरीरातील मॅलानिन कमी झाल्यामुळे केस पांढरे होतात. मात्र पांढऱ्या केसांमुळे तुमचा पूर्ण लुकच खराब होतो. केस काळे करण्यासाठी तुम्ही हेअर कलर आणि अनेक सौंदर्योपचार करता. मात्र या उत्पादनातील केमिकल्समुळे केस अधिकच पांढरे होऊ लागतात. बऱ्याचदा यामुळे तुमचे सर्वच केस पांढरे होतात. कमी वयात असे केस मोठ्या प्रमाणावर पांढरे  झाल्यामुळे तुमची चिंता  काळजी अधिकच वाढू लागते. शिवाय यामुळे तुम्हाला सतत केसांना डाय, मेंदी अथवा हेअर कलर करावा लागतो. या दुष्टचक्रातून सुटका मिळवायची असेल तर केसांवर कलरचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक उपाय करा. केस काळे करण्यासाठी आंब्यांची पाने वापरल्यामुळे तुम्हाला चांगला परिणाम दिसू लागेल. कारण यामुळे तुमचे पांढरे झालेले केस काळे होतीलच शिवाय केसांना चांगले पोषणही मिळेल. 

आंब्याच्या पानांचा केसांवर काय परिणाम होतो

 

आंब्याच्या पानांमध्ये अनेक पोषक तत्त्व दडलेली आहेत. यातील व्हिटॅमिन ए, बी, सी, कॉपर, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फ्लेवोनॉईड, फिनोक अशा अनेक गुणधर्मांचा केसांवर चांगला परिणाम होतो. आंब्याच्या पानांमधील अॅंटि ऑक्सिडंटमुळे केस पांढरे होण्यापासून रोखता येते. शिवाय यामुळे तुमचे पांढरे केस पुन्हा काळे होतात. आंब्याच्या पानांमध्ये अॅंटि बॅक्टेरिअल गुणधर्म असतात ज्यामुळे केसांच्या अनेक समस्या कमी होतात. यात कोलेजीन योग्य प्रमाणात असल्यामुळे केस काळेभोर, चमकदार आणि मजबूत होतात. 

ADVERTISEMENT

instagram

आंब्याच्या पानांचा केसांसाठी कसा वापर करावा

 

आंब्याच्या पानांचा केस काळे करण्यासाठी तुम्ही निरनिराळ्या पद्धतीने वापर करू शकता. 

  • आंब्याची पाने केसांवर वापरण्यासाठी आधी तुम्हाला झाडावरील कोवळी आंब्याची पाने आणावी लागतील. त्यानंतर ही आंब्याची पाने मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये तुम्ही मध अथवा नारळाचे तेल मिसळू शकता. आंब्याच्या पानांपासून तयार केलेला हा होममेड हेअर मास्क केसांना लावा. वीस ते तीस मिनिटांनी केस साध्या पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क केसांना लावा. ज्यामुळे हळू हळू तुमचे केस नैसर्गिक पद्धतीने काळे होऊ लागतील. त्यानंतर नियमित हा हेअर मास्क वापरल्यामुळे तुमचे केस पांढरे होणे कमी होईल. 
  • केस कोरडे झाले असतील तर आंब्याची कोवळी पाने आणि पेरूची कोवळी पाने पाण्यामध्ये उकळा. उकळताना पाण्याचा रंग बदलू लागेल. हे पाणी थंड करा आणि कापसाच्या मदतीने या पाण्याचा अर्क केसांच्या मुळांना लावा. केस फारच कोरडे असतील तर तुम्ही हे पाणी नारळाच्या तेलात मिसळून केसांना लावू शकता. ज्यामुळे केस काळे तर होतीलच शिवाय केसांना छान ग्लो येईल.  
  • आवळा, शिकेकाई आणि  रिठा पाण्यात उकळवा. या पाण्यामध्ये आंब्याच्या सुकलेल्या पानांची पावडर मिसळा. तयार हेअर मास्क केसांना लावा आणि वीस मिनीटांनी केस पाण्याने धुवा. यामुळे तुमचे पांढरे केस लवकर आणि नैसर्गिक पद्धतीने काळे दिसू लागतील. या पॅक एखाद्या नॅचरल डायप्रमाणे तुमचे केस काळे करेल.

 

 

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

त्वचेच्या अनेक समस्या दूर करेल आंब्याची साल, असा करा वापर

उन्हाळ्यात त्वचेवर सतत टाल्कम पावडर लावण्यामुळे होऊ शकतं नुकसान

ADVERTISEMENT

ब्राम्हीने थांबेल केस गळणे, जाणून घ्या कसा करावा वापर

05 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT