ADVERTISEMENT
home / आरोग्य
मासिक पाळी.. समज कमी गैरसमज जास्त , काय घ्यावी काळजी

मासिक पाळी…समज कमी गैरसमज जास्त

मासिक पाळी (Menstrual Cycle) ही प्रत्येक स्त्रीची सामान्य व नैसर्गिक शरीरक्रिया आहे. आपल्या शरीरातील इतर अवयवांसारखं हेही प्रजनन अवयवांचं काम आहे. त्यामुळे त्याला अशुभ किंवा वाईट समजणं चुकीचं आहे. या विषयीची जागरूकता समाजात निर्माण होण्यासाठी 28 मे या दिवशी दर वर्षी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन पाळला जातो. जवळपास 800 दशलक्षच्या वर स्त्रिया आणि मुलींना रोज पाळी येते, त्यातील ब-याच जणींनी पाळीविषयी बरेच समज गैरसमज आहे. याविषयी अधिक माहिती घेतली आहे डॉ. आदिती जाधव, स्त्रीरोगतज्ज्ञ, सनराईज हॉस्पिटल, सातारा यांच्याकडून. 

आरोग्याविषयी तसेच पाळीविषयी जागरूकता महत्त्वाची

आरोग्याविषयी तसेच पाळीविषयी जागरूकता महत्त्वाची
Shutterstock

कोविड 19 सारख्या महामारीने त्यात आणखीनच भर पाडली आहे. सामाजिक कलंक आणि रुढी यांच्यामुळे अजूनही पाळी आलेल्या महिलांना/मुलींना वाळीत टाकल्यासारखी वागणूक ते चार दिवस दिली जाते. त्यांना कोणत्याही कार्यक्रमाला अथवा समारंभाला तसेच कामालाही जाता येत नाही. त्यांना योग्य सुविधा आणि योग्य मासिक पाळी स्वच्छतेविषयी शिक्षण दिले तर त्या चार दिवसातही त्या तेवढ्याच जोमाने वर्गात, कामाच्या जागी आणि घरीही कार्यरत राहतील. तसेच ब-याच स्त्रिया अजूनही कापड स्वस्त असल्याने पॅड वापरत नाही ज्यामुळे त्यांना योनीमार्गाच्या ब-याच जंतूसंसर्गाचा धोका वाढतो (व्हजायनल इनफेक्शन – viginal infection). जागतिक पातळीवर युएसएआयडीएस (युनायटेड स्टेट्स एजेन्सी फॉर इंटरनॅशल डेव्हलमेंट) सारख्या ब-याच संस्था स्त्रियांच्या आरोग्याविषयी तसेच पाळी विषयी आणि त्याच्या जागरुकतेविषयी कार्यरत आहे. शाळेमध्ये तसेच स्त्रियांच्या कामाच्या ठिकाणी त्यांना पुरेशी जागा स्वच्छ स्वच्छतागृह तसेच पाणी हे मुबलक प्रमाणात मिळणे गरजेचे आहे. 

मासिक पाळीच्या समस्या व उपाय (Menstrual Problem And Their Solution In Marathi)

पाळीतील बदल

वयोमानानुसार तसेच वजनामध्ये बदल झाला किंवा शरीरात काही रासानिक बदल झाल्यावरही पाळीवर त्याचा परिणाम होतो. साधारणपणे पाळी वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षापर्यंत सुरु होते. काही प्रकरणांमध्ये वयाच्या दहाव्या वर्षी देखील पाळी येऊ शकते त्याला प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणतात. सोळा वर्षांनतर जेव्हा पाळी सुरु होते त्याला डिलेड प्युबर्टी असे म्हणतात. जसे वय वाढते तसे पाळीतही बदल होतात. पाळी साधारण वयाच्या 47 वर्षापर्यंत जाते त्याला मेनोपॉज (Menopause) म्हणतात. जर पाळी 50 वर्षे वयापर्यंत गेली तर त्या डिलेड मेनोप़ॉज म्हणतात. जर पाळी 50 वर्षे वयापर्यंतही गेली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे. तसेच पाळी जर वयाच्या दहा वर्षाच्या आतच आली, तिथेही वेळीच स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्याची गरज असते.

ADVERTISEMENT

मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी नैसर्गिक घरगुती उपाय

मुलींमध्ये जागरूकता हवी

मुलींमध्ये जागरूकता हवी

Shutterstock

अलीकडे मुलींना वयाच्या 11 ते 12 व्या वर्षी पाळी येते आणि त्यांना शाळेमध्ये किंवा घरामध्येही पाळीविषयी माहिती दिले जाणे अतिशय गरजेचे आहे.त्यांना पाळीविषयी व त्या दिवसांमध्ये स्वच्छता कशी राखायची, काय काळजी घ्यायची यासंदर्भातही ज्ञान देणे गरजेचे आहे.

आधीच्या स्त्रिया किंवा अजूनही खेडेगावात पाळीमध्ये कापड वापरले जात होते त्यानंतर पॅडचा शोध लागला. आता नवीन शास्त्रापमाणे पाळीसाठी मेन्स्टुअल कपचा शोध लागला आहे. याचा वापर परदेशातही सहज केला जात आहे. आणि जागतिक पातळीवर घेतलेल्या आढाव्यानुसार असे समोर आले की कापड आणि पॅड पेक्षाही मेन्सटुल कप्स अधिक फायदेशीर आहे. त्यामध्ये पाळीमध्ये होणा-या इनफेक्शनचे प्रमाणही कमी आहे.

ADVERTISEMENT

मासिक पाळी लवकर येण्यासाठी सोपे उपाय

मासिक पाळीमध्ये कोणती काळजी घ्यावी

–    कापड न वापरता नेहमी पॅडचा वापर करावा

–    एक पॅड जास्त वेळेकरिता वापरु नये. दर सहा ते आठ तासाला बदलावे

–    वापरलेले पॅड नीट पेपरमध्ये गुंडाळून बंद कचरापेटीत टाकावे.

ADVERTISEMENT

–    या दिवसात योनीमार्ग स्वच्छ करण्यासाठी वापरणारे केमीकल टाळावे

–    पुरेशी विश्रांती आणि झोप घ्यावी

–    मीठ, साखर, कॉफी, दारु, तिखट पदार्थ शक्यतो टाळावे.

–    मुबलक प्रमाणात पाणी, फळे, पालेभाज्या, आलं, हळद, बदाम, काजू तसेच प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन करावे

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

28 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT