ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
साडी कधीही न नेसणाऱ्यांसाठी या साड्या आहेत कॅरी करायला सोप्या

साडी कधीही न नेसणाऱ्यांसाठी या साड्या आहेत कॅरी करायला सोप्या

साडी नेसणं हे खूप जणांना आवडत असलं तरी देखील काही जणांना नेसण्यापेक्षा त्यात वावरण अधिक कठीण वाटतं. ज्या महिला साड्या नेसतात. त्यांना साड्या सांभाळणं हे फार सोपं वाटतं. पण ते सगळ्यांच्याच बाबतीत असेल असे सांगता येत नाही. अशांसाठीच साड्या नेसणे म्हणजे किती मेहनत ते केवळ आम्हीच समजू शकतो. तुमचीही एखादी अशी मैत्रीण साडी नेसायची म्हटली की, अगदी घाबरुन साडी नेसण्याचा विचारच ड्रॉप करते आणि साडी नेसणे टाळते. अशा तुमच्या खास मैत्रिणीसाठी हे खास आर्टीकल असणार आहे कारण कधीही साडी न नेसणाऱ्यांसाठीच आम्ही काही साड्यांचे प्रकार शेअर करणार आहोत. आता भरजरी आणि जड साडी नेसायची गरज नाही तर काही साध्या वाटणाऱ्या पण तितक्याच खुलून दिसणाऱ्या साड्यांचे प्रकार खास तुमच्यासाठी

तुम्हालाही साडी सावरणे जाते कठीण? मग ट्राय करा रेडिमेड साडी

ऑर्गेंझा (Organza)

ऑर्गेंझा (

Instagram

ADVERTISEMENT

साडीचा हा प्रकार तुम्ही खूप जणांकडून हल्लीच्या काळात ऐकला असेल. ही साडी हलकी आणि नेसायला एकदम सोपी असते. या साड्या तुम्हाला थोड्याशा लिनन स्वरुपातील वाटेल. पण हे सिंथेटीक सिल्क फॅब्रिक आहे.  ही साडी हलकी आणि पातळ स्वरुपाची असते. या साडीमध्ये हल्ली बऱ्याच व्हरायटी मिळतात. ही साडी दिसायलाही चांगलीच रॉयल दिसते. जर तुम्ही अगदी कधीही साडी नेसत नसाल तर तुम्ही अशा प्रकारची साडी नेसायला काहीच हरकत नाही.यामध्ये एखादी डिझाईन, एखादे नक्षीकाम घेतले तर तुम्हाला नक्कीच शोभून दिसेल.

बेस्ट कोल्हापुरी चप्पल डिझाईन्स – Kolhapuri Chappal Designs

ओडिसा सिल्क (odisa silk)

ओडिसा सिल्क

Instagram

ADVERTISEMENT

सिल्कची कोणतीही साडी नेसायला नेहमीच हल्की असते. तुम्ही जर ओडिसा सिल्क साडीचा प्रकार पाहिला नसेल तर आताच अशा साड्या जाऊन गुगल करा. या साड्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स मिळतात. तुमच्या आवडीनुसार काठांची किंवा विना काठांची अशी साडी निवडू शकता. यामधील अगदी प्लेन आणि शेडेड साडीही तुम्हाला खूप छान दिसते. मिक्स मॅच ब्लाऊज शिवून तुम्ही अशा साड्या नेसू शकता.

लिनन साडी (Linen Saree)

लिनन साड्या

Instagram

लिनन साडी हा प्रकार आता सगळ्यांनाच माहीत आहे. लिनन साडी ही दिसायला खूपच रिच साडीचा प्रकार आहे. हल्ली यामध्ये अनेक व्हरायटी दिसतात. कॉटन, सिल्क अशा प्रकारच्या या साड्या तुम्हाला हलक्या फिल नक्कीच होतील. या साड्या कुठेही टोचत नाही, त्या नेसल्यासारख्या वाटत नाही. लग्न असो  वा एखादी मीटिंग तुम्हाला कोणत्याही प्रसंगी या अशा साड्या नेसता येतात.

ADVERTISEMENT

सेलिब्रिटींची पसंती ठरतेय महाराष्ट्रीयन खणाची साडी

कॉटन सिल्क साड्या ( Cotton silk saree)

कॉटन सिल्क साड्या

Instagram

जर कॉटन साड्या तुम्हाला आवडत असतील तर तुमच्यासाठी कॉटन सिल्क साड्या या फारच उत्तम असा प्रकार आहे. कॉटन सिल्क साड्या यांना चंदेरी असे देखील म्हणतात. या साड्या खूपच क्लासी असतात. या पातळ असल्या तरी देखील दिसायला चांगल्या दिसतात. यामध्ये तुम्हाला ट्रेडिशनल बॉर्डरच्या किंवा थोड्या लेटेस्ट बॉर्डर असलेल्या साड्या देखील मिळू शकतात. या साड्यांवर प्युअर कॉटन किंवा सिल्कचा ब्लाऊज घातला तरी देखील चांगला दिसू शकतो.

ADVERTISEMENT

साड्यांची निवड करताना आता तुम्ही काही या साड्यांची निवड केली तर त्या तुम्हाला अगदी कधीही नेसता येतील.

08 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT