पावसाळा आणि रोमान्स हे एक वेगळंच समीकरण आहे. पाऊस सुरू झाला की, प्रेमाचा एक बहरच सुरू होतो. सध्या आपण कोरोनामुळे (coronavirus) सगळेच घरी आहोत. पण पावसाचा आनंददेखील लुटायचा असेल आणि एकमेकांबरोबर सहवास अधिक चांगला करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी नक्कीच एक खास रोमँटिक डेट (romantic date) करणे गरजेचे आहे. पावसाळ्याती अशी ही रोमँटिक डेट तुम्हाला नक्कीच एकमेकांच्या अधिक जवळ घेऊन येईल. पण अशा पावसाळी रोमँटिक डेटसाठी तुम्हाला जर काही सुचत नसेल तर काही सोप्या कल्पना (rainy day date ideas) आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तुम्हीही जर सतत काम करून आणि त्याच त्याच गोष्टी करून कंटाळला असाल तर तुम्ही ही पावसाळी रोमँटिक डेट अधिक स्मरणीय करा.
पाऊस, सुट्टी आणि एकत्र जेवण! (Rain, holiday and dinner together)
Freepik
सुट्टीचा दिवस असेल आणि आठवडाभर जर फक्त तुम्हीच जेवण बनवत असाल अथवा घरी काम करणाऱ्या बाई जेवण बनवत असतील तर या विकेंडला तिला सुट्टी द्या आणि तुम्ही दोघंच एकमेकांसाठी वेळ काढा. स्वयंपाकघरात एकमेकांच्या मदतीने तुमच्या आवडीचे पदार्थ बनवत पावसाचा आणि रोमान्सचा आनंद एकत्र घ्या. त्यातही तुम्ही जर तुमच्या आवडीचे पदार्थ बनवणार असाल तर काही अशा फळांचाही समावेश करून घ्या, जेणेकरून तुमच्यामधील रोमान्स अधिक जागा होईल. जेवण बनवताना एकमेकांच्या जवळ जाणं, एकमेकांना मिठीत घेणं आणि एकमेकांना भरवणं यापेक्षा पावसाचा अधिक आनंद तो काय असणार आहे. असाच रोमान्स फुलवत तुम्ही तुमचा पूर्ण दिवस एकमेकांच्या सहवासात घालवा.
खेळा पिक्चर गेम (Play a Picture Game)
Shutterstock
एकमेकांबरोबर अनेक वर्ष झाली असतील तर तुम्ही आता एकमेकांबरोबर कधी कधी राहायलादेखील कंटाळता. पण मग पावसासह काही आठवणीही जाग्या होतात. अशावेळी तुम्ही एकमेकांसाठी वेळ काढून पाऊस चालू असताना जुने फोटो काढून पिक्चर गेम खेळा. ज्या जोडीदाराला आठवण सांगता येणार नाही त्याला तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे एखादी रोमँटिक शिक्षा द्यायची. उदा. जर तुमच्या जोडीदाराला आठवण सांगता आली नाही तर तुम्ही आजची रात्र अधिक रोमँटिक करण्याची आणि पुन्हा एकदा नव्याने प्रेम करण्याची शिक्षाही देऊ शकता. यामुळे तुमच्या दोघांमधील रोमान्स अधिक फुलून येईल.
रात्र बनवायची आहे अधिक रोमँटिक तर नक्की खेळा किसिंग गेम
रात्री उशीरा पावसात एकत्र चाला (Walk together in rain)
Freepik
कधी कधी कामामध्ये आपण इतके गुंतलेलो असतो की, एकमेकांसाठी वेळ आणि प्रेम या दोन्ही गोष्टी कुठेतरी हरवून जातात. पावसाळ्यात तुम्ही एकमेकांसाठी वेळ देताना रात्री उशीरा छान एकमेकांचा हात हात घेऊन गप्पा मारत एकत्र चाला. यामध्येही तुम्ही एकमेकांना समजून घेता आणि छान गप्पा मारल्या जातात. तसंच पावसाच्या पाण्यामुळे एक वेगळीच लहर तुमच्या प्रेमाचीही असते. दोघांनाही एकमेकांबद्दल भिजल्याने पुन्हा एकदा आकर्षण वाटून एकमेकांच्या जवळ येण्याची उमेद निर्माण होते. कुठेतरी हरवलेला रोमान्स पुन्हा एकदा जागा होतो. त्यामुळे तुम्ही अशी डेट नक्कीच एकदा तरी पावसाळ्याच्या दिवसात करायला हवी.
Love Test – जीवनसाथी बनविण्यासाठी विचारा हे प्रश्न
पाऊस, गाणी – तू आणि मी (listen romantic music)
पाऊस आणि रोमँटिक गाणी हे समीकरण म्हणजे रोमान्सचा कळस. बाहेर पडणारा पाऊस, एका रूममध्ये तुम्ही दोघं आणि आवडीची रोमँटिक गाणी. हे असलं की, अजून काय हवं? काम बाजूला ठेऊन तुम्ही तुमच्या जोडीदारासह एक दिवस अशी डेट नक्कीच अरेंज करू शकता. आपल्या आवडती गाणी, कँडल लाईट डिनर आणि आपल्यावर प्रेम करणारा आपला जोडीदार. यापेक्षा या पावसात अजून हवंय तरी काय? या पावसाळ्यात अशी डेट नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता.
आपल्या बॉयफ्रेंडसह नक्की खेळा ‘हे’ सेक्सी ड्रिंक गेम्स (Drinking Games In Marathi)
खिडकीतून येणारा पावसाचा आवाज आणि सेक्स (skip it all and have sex)
Shutterstock
रोज तोच तोच दिवस आणि त्याचा आलेला कंटाळा. यापेक्षा पावसाचा खिडकीतून येणारा आवाज किती मस्त वाटतो. खिडकी उघडून पावसाच्या थेंबाचा स्पर्श आणि जोडीदाराचा स्पर्श या दोन्हीचा अनुभव घ्या. डेट फिक्स करताना सगळी कामं बाजूला ठेवा आणि फक्त आणि फक्त आपल्या जोडीदाराला वेळ द्या. काळोख, पावसाचा आवाज आणि जोडीदाराची साथ असेल तर अजून वेगळ्या गोष्टींची गरजच नाही. मनापासून एकमेकांचे व्हा आणि हा पावसाळा अधिक स्मरणीय करा.
लव्ह गेम्सः जोडीदाराला सेक्सबाबत काय प्रश्न विचाराल
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक