सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे असंच म्हणावं लागेल आणि यावर्षीचं सर्वात शेवटचं आणि मोठं लग्न म्हणजे नीता आणि मुकेश अंबानीची मुलगी ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचं. 12 डिसेंबरला या दोघांचं लग्न आहे. मात्र ८ तारखेपासूनच प्रि – वेडिंग जोधपूरमधील उमेद भवन पॅलेसमध्ये सुरु होणार आहे. दीपिका – रणवीर आणि प्रियांका – निकच्या लग्नानंतर आता ईशाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु झालेली पाहायला मिळत आहे. अर्थात हे लग्न नक्कीच साधंसुधं नसणार तर अतिशय ग्रँड स्वरुपात ईशा आणि आनंद विवाहबद्ध होणार आहेत. या विकेंंडला दोघांच्याही लग्नाचे विधी सुरु होणार असून अतिशय भारदस्त स्वरुपात हे लग्न होणार आहे. भारतातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या अंबानीच्या मुलीच्या लग्नात कोणताही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.
कशी असेल लग्नाची व्यवस्था?
या लग्नासाठी जोधपूर एअरपोर्टवरून उमेद भवन पॅलेसला जाण्यासाठी 200 चार्टर्ड प्लेनची व्यवस्था करण्यात आली आहे. वाचून बसला ना धक्का? पण हो हे खरं आहे. यावरूनच अंदाज येऊ शकतो की, अंबानी – पिरामल कुटुंबातील हे लग्न किती भव्य प्रमाणात होणार आहे. जोधपूरमधील उदयपूर महाराणा प्रताप एअरपोर्टवरून येत्या 10 दिवसात 200 च्या जवळपास चार्टर्ड प्लेनची ये – जा होणार असून सध्या जोधपूर निवडणुकांच्या कामातही व्यग्र आहे. ईशा आणि आनंदच्या प्रि – वेडिंगसाठी 30-50 चार्टर्ड फ्लाईट्स सतत एअरपोर्टवरून रवाना होणार आहेत. वास्तविक नेहमी या एअरपोर्टवरून साधारण 19 व्यावसायिक प्लेन्स उड्डाण करतात. मात्र यावेळी ईशा आणि आनंदच्या लग्नामुळे इतकी मोठी तफावत उड्डाणांमध्येही दिसून येते आहे.
सर्व फाईव्ह – स्टार हॉटेल्स बुक
‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, शहरातील सर्व फाईव्ह स्टार हॉटेल्स आधीच बुक करण्यात आलेली आहेत. येणारे पाहुणे व्यवस्थित राहू शकतील यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असणारच की, सर्व हॉटेल्स बुक्स करण्याइतके पाहुणे येणार आहेत का? तर हो. हे अंबानीच्या घरातील लग्न असल्यामुळे अंबानी आणि पिरामल कुटुंबातील पाहुण्यांची रांगच या लग्नामध्ये असणार आहे. इतकंच नाही तर एअरपोर्टवरून पाहुण्यांना उमेद भवन पॅलेसला घेऊन जाण्यासाठी अनेक कार्सचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्समध्ये अगदी टॉप क्लास कार्सचा समावेश आहे. ऑडी, पोर्श, मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. आलेल्या पाहुण्यांची उत्तमोत्तम व्यवस्था ठेवण्यासाठी अंबानी आणि पिरामल कुटुंबानं व्यवस्था केली आहे. ईशा आणि आनंदचा साखरपुडाही इटलीमधील लेक कोमोजवळ झाला. जो अत्यंत स्वप्नवत होता. त्यामुळे आता सगळेच ईशा आणि आनंदचं लग्न कसं असणार याचा विचार करत असून सर्वांनाच या लग्नाची उत्सुकता आहे. इतकं भव्य – दिव्य लग्न नक्की कसं असणार?
पाहुण्यांच्या पाहुणचाराची व्यवस्था तर आम्ही तुम्हाला सांगितली. इतर सर्व माहिती वेळोवेळी आम्ही तुम्हाला देत राहणार आहोतच. त्यासाठी आम्ही फॉलो करत राहा.
POPxo is now available in six languages: English, Hindi, Tamil, Telugu, Marathi, and Bangla
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade