कोणताही कपडा हा दागिन्यांशिवाय पूर्ण होत नसतो. पण कोणत्या कपड्यांवर कोणत्या स्टाईलचे दागिने वापरायचे हीदेखील एक कला आहे. ही फॅशन सगळ्यांनाच जमते असं नाही. कांजिवरम, सिल्क, कॉटन असे वेगवेगळे साड्यांचे आणि कपड्यांचेही प्रकार असतात. तसंच पारंपरिक आणि आधुनिक या दोन्हीवर घातल्या जाणाऱ्या अॅक्सेसरीज या वेगळ्या असतात. त्या कशा मॅच करायच्या आणि कशा प्रकारे त्याची स्टाईल कॅरी करायची या सगळ्याबद्दल आम्ही POPxo फॅशन या विभागात तुम्हाला माहिती देत असतो. तुम्हाला या विभागात सर्वच स्टाईलची माहिती मिळेल. अॅक्सेसरीजमध्ये अगदी कानातले, नेकलेस पासून ते नथीपर्यंत सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती तुम्हाला मिळेल.
मराठमोळा लुक म्हटलं की सर्वात महत्त्वाचा दागिना म्हणजे नथ. महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने पेहराव करण्यासाठी महिला नऊवारी साडी आणि मोत्याची नथ आवर्जून घालतात. वास्तविक नथ हा पेशवाई संस्कृतीतील नटलेला एक अजरामर दागिना आहे. कारण प्राचीन काळापासून ते आजतागायत या दागिन्याचा नखरा मुळीच कमी झालेला नाही. महाराष्ट्रीयन नथींमध्ये पेशवेकालीन नथ, मराठा नथ, ब्राम्हणी नथ, कारवारी नथ, बानू नथ असे विविध अनेक प्रकार आहेत. वास्तविक नाकात घाल्यासाठी चमकी, नथनी असे अनेक विविध दागिने आहेत. मात्र या सर्व नासिकाभूषणांमध्ये उठून दिसते ती नथच. नथीमुळे स्त्री च्या सौंदर्यांमध्ये अधिकच भर पडते. नथ घालून नाक मुरडून दाखविण्यात एक वेगळीच मौज असते. या नथींंचा सध्याचा ट्रेंड (Trend) नक्की काय आहे हे जाणून घ्यायला नक्कीच सर्वांना आवडेल.
लग्न सोहळ्यातील महत्वाचा भाग असतो ते म्हणजे दागिने. विशेषत: महाराष्ट्रीयन लग्नात दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. पण मध्यंतरीच्या काळात कुंदन, अमेरिकन डायमंड या दागिन्यांची क्रेझ आली आणि मग सोन्याचेही दागिने अनेकांना नकोसे होऊ लागले. अनेक महाराष्ट्रीयन लग्नात तुम्ही अशा प्रकारचे दागिने नववधूने देखील घातलेले पाहिले असतील.पण आता पुन्हा एकदा पारंपरिक दागिन्यांची मागणी वाढली आहे. इतर कोणत्याही नव्या डिझाईनच्या वेस्टनाईज दागिन्यांपेक्षा वेगवेगळ्या पेहरावावर पारंपरिक दागिने घालण्याचा एक ट्रेंड आला आहे.विशेष म्हणजे हुबेहूब पारंपरिक दागिन्यांचे खोटे दागिने बाजारात मिळू लागले आहेत. तेही अगदी माफक दरात. आता तुम्हालाही तुमच्या लग्नासाठी दागिने घ्यायचे तर तुम्हाला लगेच सोन्याचे दागिने म्हणजे किती खर्च असा विचार करायची गरज नाही. तर तुम्ही आम्ही दाखवलेले हे प्रकार सहज बाजारातून घेऊ शकता तेही अगदी परवडणाऱ्या दरात
नव्या वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रात. तिळाचे लाडू आणि साखर फुटाणे वाटून ‘तिळगूळ घ्या गोड- गोड बोला’ असे सांगत वर्षाची सुरुवात आपण हा सण साजरा करुन गोड करत असतो. तिळाच्या लाडूसोबतच या सणाची खासियत म्हणजे 'हलव्याचे दागिने'. या दिवशी हलव्याचे सुंदर दागिने घालण्याची पद्धत आहे. दागिने घालण्याची ही पद्धत जरी पारंपरिक असली तरीसुद्धा यातही कालपरत्वे बदल होत गेले आहेत. म्हणजे जर तुम्हाला आठवत असेल तर आधी साध्या पुठ्ठ्यावर सोनेरी रंगाचा कागद लावून त्यावर साखर फुटाणे चिकटवले जायचे. ते ही दागिने सुंदरच होते म्हणा. पण आता हे दागिनेही आता ट्रेंडी झाले आहेत. गेल्या ३ ते ४ वर्षांपासून या दागिन्यांमध्ये अधिक कला-कुसर पाहायला मिळत आहे. याचीही खास माहिती मिळेल इथे.
महाराष्ट्रीयन लग्नसोहळा असो अथवा मुंज असो अथवा कोणताही कार्यक्रम तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बघायला मिळतात. पण त्याहीपेक्षा सर्वात जास्त ठसका दिसून येतो तो म्हणजे ‘ठुशी’चा. महाराष्ट्रीयन दागिन्यांंमध्ये विविधता आहे. पण त्यातही ठुशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ठुशीशिवाय कोणताही महाराष्ट्रीयन साज पूर्ण होत नाही. अगदी लग्नापासून ते वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला विविध प्रकारच्या ठुशी बघायला मिळतात. पूर्वी केवळ कोल्हापूरी साजाच्या ठुशी होत्या. पण आता मागणीनुसार बाजारामध्ये विविध प्रकारच्या ठुशीच्या वेगळ्या डिझाईन्स दिसतात. इतकंच नाही तर मंगळसूत्रांमध्येही ठुशीचं डिझाईन दिसून येतं. तुम्हाला जर ठुशीच्या वेगवेगळ्या डिझाईन्स अधिक प्रमाणात जाणून घ्यायच्या असतील तर लेख नक्की वाचा.
तुम्हीसुद्धा ही गोष्ट मान्य कराल की, कधी-कधी एखाद्या आऊटफिटवर योग्य नेकलेस निवडणं कठीण असतं. तुमचं आऊटफिट वेस्टर्न, पारंपारिक किंवा कसंही असो, त्यावर घातलेला नेकपीस हा तुमच्या लुकचा ग्रेस अनेकपटीने वाढवतो. पण प्रत्येक नेकपीस तुमच्या प्रत्येक ड्रेसवर सूटच करायला हवा असं आवश्यक नाही. नेकपीस विकत घेण्याआधी तुम्हाला माहीत असलं पाहिजे की, तुमच्या ड्रेसची नेकलाईन कशी आहे. कारण वेगवेगळ्या नेकलाईनसोबत वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस सूट करतात. खरंतर नेकलाईन ही एक अशी गोष्ट आहे, जी तुमचा लुक बिघडवूही शकते आणि बनवूही शकते. एक्सपर्ट्स सांगतात की, जर तुम्हाला सूट होणारा नेकलाईन ड्रेस तुम्ही घातला तर तुम्हाला मिळतो परफेक्ट लुक. योग्य नेकलाईनसोबत योग्य नेकलेस मॅच होणंही तितकंच आवश्यक आहे. तर मग जाणून घ्या कोणत्या नेकलाईनसोबत कोणता नेकलेस घालावा ते.
कोणताही पारंपारिक समारंभ म्हणा किंवा सण म्हटलं की, कोल्हापुरी चप्पल हमखास आणि आवडीने घातली जाते. प्रत्येकाच्या फूटवेअरमध्ये एक तरी कोल्हापुरी चप्पल असतेच. पण आता कोल्हापुरी चप्पल ठराविक डिझाईन्सपुरती मर्यादित राहिली नसून त्यात अनेक हटके आणि सुंदर डिझाईन्स आल्या आहेत. त्यातीलच काही निवडक डिझाईन्स POPxoMarathi घेऊन आलं आहे तुमच्यासाठी ज्यामध्ये अगदी बेसिक कोल्हापुरी चप्पलपासून डिझायनर आणि वेडिंग वेअर कोल्हापुरीचाही समावेश आहे. पाहा वेगळी आणि हटके कोल्हापुरी चप्पल डिझाईन्स POPxo च्या लेटेस्ट ट्रेंड्स - पारंपरिक विभागात.
महिलांकडे दागिन्यांचे कितीतरी प्रकार असतात. पण त्यात खुलून दिसतात ते पारंपरिक आणि मराठमोळे दागिने. पारंपरिक दागिन्यांबद्दल सांगायचे झाले. तर आपल्या प्रत्येकाकडे अगदी गळ्यालगतच्या ठुशीपासून ते लांब राणी हारपर्यंत सगळे प्रकार असतात. हल्ली कोल्हापुरी साज हा प्रकार सुद्धा अगदी आवर्जून घातला जातो. तुम्ही कोल्हापुरी साज हा प्रकार कधी वापरुन पाहिला आहे का? जर तुमच्याकडे कोल्हापुरी साज नसेल आणि तुम्ही तो खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला कोल्हापुरी साजच्या वेगवेगळ्या डिझाईन्स या माहीत हव्यात. त्याबाबत तुम्हाला माहिती मिळेल आमच्या लेखातून.
लग्नाचा सीझन सुरु झाला की, खरेदीचा वेग वाढतो. जर लग्न मुलीचे असेल तर मग अगदी साग्रसंगीत शॉपिंग केले जाते. नवरीसाठी तिच्या कपड्यांसोबतच महत्वाचे असते ते म्हणजे तिचे मंगळसूत्र.. मंगळसूत्राची डिझाईन युनिक असावी असे प्रत्येक नवरीला वाटते. मग काय इंटरनेटवरुन किंवा वेगवेगळ्या ज्वेलर्सच्या दुकांनाना भेट देऊन मगळसूत्रांच्या डिझाईन्स शोधल्या जातात. तुमचेही लग्न लवकरच होणार आहे किंवा तुम्हाला तुमच्या जुन्या मंगळसूत्राची जुनी डिझाईन बदलावीशी वाटत असेल तर आम्ही मंगळसुत्राच्या काही नव्या डिझाईन्स तुमच्यासाठी शोधून काढल्या आहेत. तुम्हीही त्या जाणून घेऊ शकता.