भविष्य

2019 वार्षिक भविष्य कन्या (Virgo) राशी : थोडी सावधगिरी मग वर्षभर आनंदी आनंदच

Jyotish Bhaskar  |  Jan 6, 2019
2019 वार्षिक भविष्य कन्या (Virgo) राशी : थोडी सावधगिरी मग वर्षभर आनंदी आनंदच

 

2019 हे नववर्ष कन्या राशीसाठी अतिशय उत्तम असणार आहे. मात्र काही ग्रहयोगांमध्ये थोडीशी सावधगिरीही बाळगावी लागणारी आहे. ती बाळगल्यास वर्षभर आनंदी आनंदच असणार आहे. चला तर मग कन्या राशीसाठी 2019 या नववर्षात ग्रहमान कसे असणार आहे याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया.

सर्वात आधी आपण कन्या राशीविषयी आणि लोकांच्या स्वभाव वैशिष्ट्यांविषयी जाणून घेऊया.

कार्यक्षेत्र कुठलंही असो त्यात रममाण होणारी राशी म्हणजे कन्या राशी होय. ही पृथ्वी तत्वाची स्त्री राशी असून द्विस्वभावी आहे. राशी स्वामी बुध असल्यामुळे या राशीचे लोक हे स्वभावत:च बुद्धीवान असतात. त्यामुळेच व्यवहारात कुशलता, धोरणात्मक निर्णय घेणारे, चतुर, कोणत्याही गोष्टीची सखोल चिकित्सा ही या राशीची गुणवैशिष्ट्यं आहेत. कार्यक्षेत्रात रममाण होण्याचा स्वभाव असल्यामुळे काम उत्कृष्टपणे करण्यासाठी त्याचे परिपूर्ण नियोजन करणे, केलेले नियोजन अंमलात आणणे, त्यात सुसुत्रता घडवून आणणे आदी गुणही या राशीच्या लोकांमध्ये असतात. एक दोष या राशीच्या लोकांमध्ये प्रकर्षाने आढळून येतो, तो म्हणजे हे लोक कुठल्याही गोष्टीची गरज नसतांनाही चिंता करत बसतात. आपल्याला काहीतरी विकार झालेला आहे, ही जबाबदारी आपल्यावरच आहे किंवा आपणच याला जबाबदार आहोत अशा भ्रमात हे लोक आयुष्य जगत असतात. कन्या लग्नाला महत्त्वपूर्ण असलेले ग्रह म्हणजे शनि, शुक्र आणि बुध हे होय. याच ग्रहांच्या गोचरीमधून या राशीच्या भाग्याचीही दिशा ठरत असते.  कर्म बुध व गुरु यांच्या स्थानावरुन तर अर्थलाभ ठरत असतो चंद्रावरुन.

कन्या राशीचा स्वामी  असलेला बुध वर्षाच्या सुरुवातीलाच धनु राशीतून कर्म स्थानावर दृष्टी टाकणार आहे. हा योग व्यवसायासाठी सर्वाेत्तम मानला जातो. व्यावसायिकांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब असून वर्षाच्या सुरुवातीलाच व्यवसाय वृद्धीची ही नामी संधी आहे. एवढेच नव्हे तर जोडीला गुरु – शुक्र युतीचा शंखनाद कन्या राशीच्या तृतीय स्थानातुन होणार आहे. हे प्रगतीचे शुभ योग आहेत. याचा आपण योग्य तो लाभ घ्यायलाच हवा. प्रयत्नांमध्ये जराही कमतरता नको.

भाग्योदयाचे वर्ष

2019 हे वर्ष कन्या राशीसाठी भाग्योदयाचे ठरणार आहे. मात्र असे असले तरी आपल्याला बेफिकीर राहून चालणार नाही. थोडी सावधानता बाळगावीच लागणार आहे. कारण चतुर्थ स्थानातून शनि महाराजांची दृष्टी कन्या राशीवर वर्षभर राहणार आहे. दि. 15 एप्रिल 2019 ला कन्या राशीच्या भाग्य स्थानाचा स्वामी असलेला शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मालव्य योगाची निर्मिती होत आहे. कुठल्याही क्षेत्रात काम करणा­-या जातकासाठी हा शुभ योग आहे. या कालखंडात विदेश यात्रा, व्यवसायातील नवी संधी, आर्थिक लाभ अशा आपल्या कार्यक्षेत्रानुसार विविध गोष्टी घडण्याचे शुभ संकेत आहेत. सोबतच आपल्या जोडीदाराशी सुसंवाद राहून कौटुंबिक स्वाथ्यही उत्तम राहणार आहेत. त्यामुळे या काळात शक्य तेवढे पदरात पाडून घ्यायचे आहे.

वार्षिक भविष्य 2019 : मेष रास

जागरूक राहा

असे शुभ योग असले तरी लगेचच तुम्हाला थोडं जागरुक व्हावं लागणार आहे. कारण दि. 7 मे 2019 ला कन्या राशीमध्ये मंगळ – राहू यांचा अंगारक दोष निर्माण होणार आहे. या काळात सावधानता न बाळगल्यास भयंकर परिणाम तुम्हाला सोसावे लागू शकतात. कारण या काळामध्ये व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध षडयंत्र रचले जाण्याचे अशुभ योग आहेत. म्हणून चांगल्या क्षणांमध्ये गुरफटून राहू नका. सावधान राहा.

वार्षिक भविष्य 2019 : मिथुन रास

प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडा

दि. 1 जून 2019 रोजी तुमचा राशी स्वामी बुध मिथुनेत तुमच्या कर्म स्थानात प्रवेश करुन भद्र नामक पंचमहापुरुष योग निर्माण करणार आहेत. हा पुन्हा अत्यंत शुभ योग असून व्यवसाय, बॅकिंग, फायनान्स अशा विविध क्षेत्रांसाठी ग्रहयोग अत्यंत लाभदायक आहे. व्यवसायवृद्धी या काळामध्ये अटळ आहे. फक्त आपण प्रयत्नांमध्ये कुठलीच चूक करायला नको. आपले काम प्रामाणिकपणे करीत राहावे. दि. 3 ऑगस्ट 2019 रोजी कन्या राशीत प्रवेश करणारे बुध प्रेमसंबंधात वाढ निर्माण करणार आहे. दि. 9 सप्टेबर 2019 ला शुक्र आपल्या निच राशीत तर बुध आपल्या उच्च राशीत प्रवेश करतील. यातून तुमच्या राशीमध्ये नीचभंग राजयोग आणि लक्ष्मीनारायण योग असे दोन भाग्योदय करणारे महत्त्वाचे योग निर्माण होणार आहेत. परिणामी अनेक सुवर्णसंधी आपले दार स्वत:हून ठोठावणार आहेत. या काळात भाग्याची आपल्याला पुरेपुर साथ मिळणार असून आपल्या प्रयत्नांना निश्चितच यश मिळणार आहे. त्यामुळे प्रमाणिकपणे कर्तव्य बजावत राहा, जेवढे काम कराला त्यापेक्षा­ अधिक काहीतरी पदरात पडण्याचे हे योग आहेत. असे असले तरी चतुर्थात असलेल्या शनि – केतूच्या जडत्व दोषाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. याचाच अर्थ कुठल्याही परिस्थितीमध्ये बेसावध राहून तुम्हाला अजिबात चालणार नाही. भरीस भर म्हणजे दि. 17 ऑक्टोबर 2019 ला सूर्य तुळ राशीत जात आहेत. आरोग्याच्या दृष्टीने अशुभ योग आहे. कारण या काळामध्ये पोटाचे विकार, लिव्हर, किडनी, अस्थमा या सारख्या समस्या काळजी न घेतल्यास आपल्या आयुष्यात उभ्या राहणार आहेत.

हेही वाचा वार्षिक भविष्य 2019 : वृषभ रास

यश प्राप्त कराल

दि. 5 नोव्हेंबर 2019 पर्यंत हे राहणार असून त्यानंतर मात्र परिस्थिती पूर्वपदावर येऊ शकते. कारण दि. 5 नोव्हेंबरला गुरु बदल होत आहेत. हा गुरु बदल आपल्या राशीमध्ये हंसयोग निर्माण करणारा आहे. याचाच अर्थ पुन्हा आपल्या राशीत शुभयोग निर्माण झालेले आहेत. त्याचा योग्य तो लाभ घेऊन यश प्राप्त करुन घ्यायचे आहे. अशा प्रकारे कन्या राशीसाठी २०१९ हे नववर्ष भाग्योदयाचे ठरणार आहे.

ग्रहमान अनुकूल आहे म्हणून बेफीकीर राहू नका. सावध राहा. विशेष परिस्थितीत शक्य तेवढी काळजी घ्या. मग वर्षभर आनंदी आनंदच भरलेला असेल.

शुभं भवतू|

लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र

Read More From भविष्य