सलमान खानचा बहुचर्चित राधे चित्रपटाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरने चाहत्यांची मने जिंकली आहेत. सलमानचा राधे खरंतर मागच्या वर्षी ईदला प्रदर्शित होणार होता. मात्र अचानक आलेल्या कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे राधेचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. राधे चित्रपट तयार असूनही कोरोना महामारीमुळे चांगलाच रखडला. शेवटी सलमानने तो येत्या १३ मेला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात काही ठिकाणी आणि भारताबाहेर चित्रपटगृहात आणि ओटीटी माध्यमावर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. मात्र सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे राधे पुन्हा चर्चेत आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमानने राधेमधले चक्क २१ सीन्स कापण्याचा निर्णय घेतला आहे. सेन्सॉर बोर्डाने ग्रीन सिग्नल देऊनही सलमान या चित्रपटातील २१ सीन्स कट करणार आहे हे ऐकून चाहत्यांना धक्काच बसला आहे.
राधेमधून सलमान कापणार चक्क २१ सीन्स
सलमान खानचा राधे आता ओटीटी माध्यमावरही प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे सलमान खान आणि निर्मात्यांच्या राधे एक फॅमिली इंटरटेनर चित्रपट असावा असं वाटत आहे. त्यामुळे त्यांच्या मते या चित्रपटात असे सीन्स असता कामा नये जे कुटुंबासोबत पाहता येणार नाहीत. लहान मुले अथवा कुटुंबातील लोकांना त्रासदायक वाटणारे सीन्स यात असू नयेत यासाठी या चित्रपटातून २१ सीन्स कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चित्रपटात आधी एक १२ वर्षांचा मुलगा ड्रग्ज घेताना दाखवण्यात आला होता. मात्र सलमानने आता हा सीन या चित्रपटातून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर या व्यतिरिक्त त्याने यातून आणखी सहा असे सीन्स कमी केले आहेत. जे ड्रग्ज घेताना शूट करण्यात आले होते. पोलीस स्टेशनबाहेर अजान करत असलेला एक सीनदेखील चित्रपटातून वगळण्यात येणार आहे. स्वच्छ मुंबईची घोषणा असलेला एक सीन चित्रपटातून कमी करण्यात आला आहे. त्या जागी आता स्वच्छ भारतची घोषणा असलेला सीन टाकण्यात आला आहे. असं करत करत सलमानने राधेमधील चक्क २१ सीन्स कट केले आहेत. विशेष म्हणजे या सीन्सला चक्क सेन्सॉर बोर्डानेही ग्रीन सिग्नल दिला होता. मागच्याच आठवड्यामध्ये सेंट्रल बोर्ड ऑफि फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने राधे चित्रपटाला UA सर्टिफिकेट देत चित्रपटातील कोणताही सीन न कापता प्रदर्शित करण्याची मान्यता दिली होती.सलमानच्या राधेमधले २१ सीन्स कमी झाल्यामुळे आता हा चित्रपट ११४ मिनीटांचा असणार आहे. प्रेक्षकांना राधे आता फक्त १ तास ५४ मिनीटांमध्ये पाहता येणार आहे. सलमान खानच्या संपूर्ण करिअरमधला हा सर्वात छोटा चित्रपट असणार आहे. असं असलं तरी सलमान खान आणि निर्मात्यांनी याबाबत कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही.
ओटीटीवर प्रदर्शित होणारा राधे सलमानचा पहिला चित्रपट
कोरोना महामारीमुळे भारतात अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. ज्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी लॉकडाऊन नाही त्या ठिकाणीच भारतात राधे प्रदर्शित केला जाणार आहे. भारताबाहेर मात्र राधे अनेक देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या व्यतिरिक्त राधे ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ज्यामुळे राधे सलमानचा असा पहिलाच चित्रपट आहे जो ओटीटीवर प्रदर्शित होणार. या आधी सलमान खानचे चित्रपट चित्रपटगृहात अगदी जल्लोषात प्रदर्शित झालेले आहेत. ज्यामुळे राधे पाहताना प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे शिट्टा आणि जल्लोषात चित्रपट पाहण्याचा आनंद नक्कीच घेता येणार नाही. मात्र ओटीटीवर घरबसल्या ते त्यांच्या भाईजानला नक्कीच पाहू शकतील. सलमानसोबत राधेमध्ये दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुड्डा असणार आहे. विशेष म्हणजे सलमान खानचा राधे प्रभु देवाने दिग्दर्शित केलेला आहे. राधेच्या निमित्ताने सलमान खान पहिल्यांदाच डिजिटल माध्यमातून चित्रपटातून प्रेक्षकांच्या घरी येणार आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
लग्नाच्या काही दिवसानंतर कॉमेडियनला जाणवले लग्नाचे साईड इफेक्टस, व्हिडिओ व्हायरल
आमिर खान लडाखमध्ये करत आहे शूटिंग,असा रंगणार ‘लाल सिंह चड्ढा’चा वॉर सीन
लॉकडाऊन नियम मोडल्याने लग्नानंतर 9 दिवसातच सुगंधा मिश्राविरोधात FIR दाखल
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje