सॉफ्ट आणि गुलाबी ओठ कोणाला आवडत नाहीत? आपल्या चेहऱ्याची चमक अधिक वाढविण्यासाठी आणि आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी ओठ अधिक मदत करत असतात. पण सूर्याचे हानिकारक किरण, धूळ – माती, प्रदूषण या सगळ्यांमुळे आपले ओठ बरचेदा कोरडे पडतात. आपल्या त्वचेप्रमाणेच आपल्याला आपल्या ओठांचीही काळजी घ्यायला हवी. आपल्या पर्समध्ये इतकं सामान असतं की त्यात अजून लिप बाम आणि इतर उत्पादने ठेऊन पर्स जड करायचा कंटाळा येतो. पण त्यासाठीच तुम्हाला आम्ही ऑर्गेनिक हार्वेस्टच्या 5-in-1 लिप बामबाबत या लेखातून सांगत आहोत. ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे 5 रंगही मिळतात आणि तुमच्या ओठांना अधिक सॉफ्ट करण्यासाठी आणि ओठांची सुरक्षा करण्यासाठी याचा उपयोग होतो
काय आहे 5 in 1 लिप बाम
ऑर्गेनिक 5-in-1 लिप बाम (Organic 5 in 1 Lip Balm) तुमच्या ओठांना संरक्षण देण्यासाठी अधिक चांगले ठरते. तुमचे ओठ फाटले असतील, कोरडे पडले असतील अथवा ओठांना भेगा पडल्या असतील तर या सगळ्यासाठी तुम्हाला याचा उपयोग करून घेता येतो. तुमच्या गुलाबी ओठांसाठी हा अत्यंत उत्तम पर्याय आहे. तुम्ही याचा नियमित वापर केल्यास, तुमचे काळे झालेले ओठांवरही याचा उपयोग होतो आणि गडदपणा कमी होऊन ओठ अधिक नरम आणि मुलायम होण्यास मदत मिळते. यामध्ये गुलाबी (Pink), लाल (Red), गडद गुलाबी (Dark Pink), कॉफी (न्यूड – Coffee Nude) आणि हाय ग्लॉस (High Gloss Nude) असे एकूण 5 रंग आहेत, जे तुम्हाला संरक्षण देण्यासह ओठ सुंदर दिसण्यासाठीदेखील मदत करते.
कसे वापरावे
ऑर्गेनिक 5-in-1 लिप बाम (Organic 5 in 1 Lip Balm) कसे वापरावे याची पद्धत –
स्टेप 1: तुमच्या संपूर्ण ओठांना हे लावा
स्टेप 2: तुमच्या ओठांवर हे पसरवा
स्टेप 3: अधिक पोषण मिळण्यासाठी रात्रभर तुम्ही हे लाऊन ठेवा
यामध्ये मँगो बटर, कॅस्टर ऑईल, सनफ्लॉवर ऑईल, कँडेलिया वॅक्स, कार्नाउबा वॅक्स, केस्टर वॅक्स हे सर्व मिक्स असून त्याचा चांगला परिणाम तुमच्या ओठांवर होतो.
ओठ नैसर्गिकरित्या मुलायम आणि गुलाबी बनविण्याच्या टिप्स
ओठ नैसर्गिकरित्या मुलायम आणि सॉफ्ट ठेवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायदेखील करू शकता –
लिंबू – लिंबाचा उपयोग त्वचेवरील काळेपणा दूर करण्यासाठी केला जातो. लिंबामध्ये असणारे ब्लिचिंग गुण हे तुमच्या ओठांचा काळा रंग कमी करण्यासाठी मदत करतात आणि हा खूपच चांगला घरगुती उपाय आहे.
साखर – ओठांवरील डेड स्किन घालविण्यासाठी आणि ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी साखरेचा उपयोग केला जातो. यासाठी तुम्ही साखर लोण्यामध्ये मिक्स करून याचा स्क्रब करून घ्या आणि तुमच्या ओठांना हळूवार लावा. पंधरवड्यातून एकदा याचा उपयोग करा.
बीट – बीटामध्ये ब्लिचिंग घटक असतात जे ओठांवरील काळेपणा दूर करून ओठ मुलायम ठेवण्यास मदत करतात. तसंच नैसर्गिक गुलाबीपणा देण्यासाठीही याचा उपयोग होतो.
तुम्हीही तुमच्या बॅगमध्ये ऑर्गेनिक 5-in-1 लिप बाम (Organic 5 in 1 Lip Balm) चा समावेश करून घ्या. तुम्हाला तुमच्या ओठांची काळजी घेण्यासाठी याचा नक्कीच फायदा होतो. शिवाय यामध्ये नैसर्गिक घटक असल्याने ओठांवर काहीही दुष्परिणाम होत नाही.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From Uncategorized
चार वर्षांनंतर ‘पठाण’मधून परत येण्यासाठी शाहरूखने घेतली मेहनत, ट्रेनरने केला खुलासा
Trupti Paradkar
भारतीय स्किन टोनवर शोभतात हे ब्लश
Dipali Naphade