बॉलीवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट हा किताब असणाऱ्या अभिनेत आमिर खान (Aamir Khan) बाबत बातमी येत आहे की, तब्बल 19 वर्षानंतर तो आता नवाब सैफ अली खानसोबत झळकणार आहे.
दिल चाहता है नंतर पुन्हा आमिर-सैफ एकत्र
सूत्रानुसार, आमिरने मोगुल हा प्रोजेक्ट लांबणीवर ढकलला असून त्याऐवजी विक्रम वेधा या दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये काम करणार आहे. एवढंच नाहीतर या चित्रपटात आमिरसोबत दिसणार आहे दुसरा खान म्हणजेच सैफ अली खान. आमिर आणि सैफ 2001 साली आलेल्या दिल चाहता है या सुपरहिट चित्रपटानंतर पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. दिल चाहता है मधील या दोघांची मित्रांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. हे दोन्ही अभिनेते काही महिन्यांतच हा सिनेमा साईन करतील. या चित्रपटात आमिर खान मोस्ट वाँटेड गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे जी भूमिका विजय सेथुपतिने केली होती. तर सैफ अली खान या चित्रपटात आर माधवनने केलेल्या भूमिकेत दिसेल. विक्रम वेधाचं दिग्दर्शन केलं होतं नवरा-बायको असलेल्या पुष्कर आणि गायत्रीने तर हिंदी रिमेकचं दिग्दर्शन करणार आहे नीरज पांडे.वाय नॉट स्टुडिओज आणि रिलायंस एंटरटेनमेंट एकत्रितपणे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
चित्रपटाच्या नावाची घोषणा नाही
आमिर आणि सैफच्या या आगामी चित्रपटाचं नाव अजून ठरलेलं नाही. पण या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल यात शंका नाही. त्यामुळे हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर रिलीज करण्यात येणार आहे. आमिर खान सध्या आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) च्या स्क्रिप्टवर काम करत आहे. त्याचा हा चित्रपट पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे. तर दुसरीकडे सैफ सध्या ‘जवानी जानेमन’ (Jawaani Jaaneman) आणि तांडव (Tandav) या चित्रपटांमध्ये बिझी आहे. तरीही निर्मात्यांची इच्छा आहे की, आमिर आणि सैफने हा चित्रपट करावा आणि याचं शूटींग 2 ते 3 महीन्यात पूर्ण करावं. सूत्रानुसार जानेवारीमध्ये या चित्रपटाचं शूटिंग लखनौ आणि हैदराबादमध्ये सुरू करण्यात येईल.
कशी असेल कथा
असं म्हटलं जात आहे की, ‘विक्रम वेधा’ राजा विक्रमादित्य आणि वेताळ यांच्या लोककथेवर आधारित आहे. पण तिला आजच्या काळाप्रमाणे रूपांंतरित करण्यात आलं आहे. 2017 साली रिलीज झालेल्या या तामिळ सस्पेंस थ्रिलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता आणि चित्रपटाने दक्षिणेत बॉक्स ऑफिसवरही चांगलीच कमाई केली होती.
मोगलबाबतचा संभ्रम संपला
आमिर खान गुलशन कुमार यांच्या बायोपिक ‘मोगल’ (Mogul) मध्ये काम करणार की नाही, याबाबत अजूनही संभ्रमच असल्याचं चित्र आहे. कारण आधीही आमिरने या चित्रपटातून माघार घेतली होती कारण चित्रपटाच्या दिग्दर्शक असलेल्या सुभाष कपूरवर #Metoo आंदोलनांतर्गत गीतिका त्यागीने गंभीर आरोप लावले होते. याच कारणामुळे आमिरने या चित्रपटाला नकार दिला होता. पण नंतर पुन्हा आमिरने या चित्रपटाला होकार दिल्याची बातमी आली. आता आमिर स्वतः या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमारसोबत करणार आहे.
आमिरच्या लाल सिंग चढ्ढाबाबतही उत्सुकता
आमिरने हाही खुलासा केला आहे की, तो ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर गुलशन कुमारच्या बायोपिक असणाऱ्या मोगल चं शूटींग सुरू करणार आहे. 1994 साली हॉलीवूड अभिनेता टॉम हंक्स (Tom Hanks) च्या ‘फॉरेस्ट गम्प’ (Forrest Gump) या चित्रपटावर आधारित लाल सिंग चड्ढा हा सिनेमा आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje