बॉलीवूड

लाल सिंह चड्ढा प्रदर्शित होईपर्यंत बंद असणार आमिर खानचा फोन

Trupti Paradkar  |  Feb 1, 2021
लाल सिंह चड्ढा प्रदर्शित होईपर्यंत बंद असणार आमिर खानचा फोन

आजकालच्या डिजिटल जगात कोणतीही व्यक्ती काही सेकंददेखील मोबाईलशिवाय जगू शकत नाही. अशा युगात आमिरने काही महिन्यांसाठी चक्क डिजिटल डिटॉक्सचा निर्णय घेतला आहे. हो आमिर खान पुढचे काही महिने त्याचा मोबाईल बंद ठेवणार आहे. त्याचा आगामी चित्रपट लाल सिंह चड्ढा जोपर्यंत प्रदर्शित होत नाही तोपर्यंत आमिरने त्याचा मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आमिरने डिजिटल युगात असा कठोर निर्णय घेण्याचं कारण आहे तरी काय

का बंद ठेवणार आमिर खान स्वतःचा मोबाईल

आमिर खान हा चित्रपटसृष्टीतील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. जेव्हा तो एखादा चित्रपट बनवतो तेव्हा त्या चित्रपटाच्या कथानक आणि स्वतःच्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करतो. ज्यामुळेच चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची आतूरतेने वाट पाहत असतात. सध्या आमिरच्या लाल सिंह चड्ढाची खूप चर्चा आहे. हा चित्रपट एकतर लॉकडाऊनमुळे आधीच खूप रखडला आहे. आता या वर्षी ख्रिसमसच्या दिवशी लाल सिंह चड्ढा प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटाच्या कामांमध्ये आमिरला खूप अडचणी येत आहेत. या चित्रपटाचं शूटिंग आणि पोस्ट प्रॉडक्शन वेगाने व्हावं असं आमिरला वाटत आहे. यासाठीच त्याने चक्क स्वतःच्या मोबाईलपासूनही दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर त्याच्या चित्रपटासाठी एवढी मेहनत आणि कठोर पथ्य पाळत असेल तर त्याचा हा चित्रपट नक्कीच हिट होणार यात काहीच शंका नाही.

लाल सिंह चड्ढाबाबत चाहत्यांना वाढली उत्सुकता

लाल सिंह चड्ढाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करत आहेत. या आधीही अद्वैतसोबत आमिरने सिक्रेट सुपरस्टारमध्ये काम केलं होतं. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान आणि वॉयोकॉम 18 करत आहे. आमिर खानसोबत करिना कपूर आणि मोना सिंगही या चित्रपटात असणार आहे. मोना सिंगने आमिर आणि करिनासोबत थ्री इडिएटमध्येही काम केलं होतं. त्यामुळे या  तिघांना पुन्हा एकत्र पाहणं नक्कीच उत्सुकता वाढवणारं असणार आहे.  विशेष म्हणजे आमिर या चित्रपटात एक नाही दोन नाही तीन भूमिका साकारणार आहे. करिना कपूर गरोदर असूनही तिने तिच्या पाचव्या महिन्यातच तिचं लाल सिंह चड्ढामधलं शूटिंग पूर्ण केलं आहे. त्यामुळे आता उर्वरित शूटिंग आणि पोस्ट प्रॉडक्शनची कामे आमिरला ख्रिसमसच्या आधी पूर्ण करायची आहेत. ठग्स ऑफ हिंदुस्थानंतर हा आमिरचा आगामी चित्रपट असणार आहे. लॉकडाऊनमुळे तो खूप रखडल्यामुळे आमिरला या चित्रपटाला पूर्ण करण्याची घाई लागली आहे. लाल सिंह चड्ढा हा चित्रपट हॉलीवूडच्या फॉरेस्ट गंप या चित्रपटाचा रिेमेक असणार आहे. आमिरच्या मते फॉरेस्ट गंप प्रमाणेच लाल सिंह चड्ढाही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र बसून पाहण्यासारखा हा एक चांगला चित्रपट असणार आहे.

आमिर आणि ख्रिसमचं नातं

आमिर खान त्याचे चित्रपट नेहमी ख्रिसमसलाच प्रदर्शित करतो. लाल सिंह चड्ढाही मागच्या वर्षीच्या ख्रिसमला प्रदर्शित होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे तसं होऊ शकलं नाही. यापूर्वी आमिर खानचे थ्री इडिअट, धूम 3, दंगल, पीके हे चित्रपट ख्रिसमसला प्रदर्शित झाले आहेत. ज्यांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता यंदाच्या ख्रिसमला आमिर चाहत्यांसाठी त्याचा हा आगामी चित्रपट घेऊन येत आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

Bigg Boss 14 : पवित्रा आणि एजाज खान लवकरच देणार Good News, अडकणार विवाहबंधनात

लग्नाच्या दोन महिन्यानंतर सना खानने शेअर केली अशी पोस्ट की झाली चर्चा

तब्बूमुळे रखडलं आहे कार्तिक आर्यनच्या ‘भूल भूलैया 2’ चं शूटिंग

Read More From बॉलीवूड