बॉलीवूड

दीपिकाच्या ‘छपाक’चा ट्रेलर पाहून परफेक्शनिस्ट आमिर खान म्हणाला…

Harshada Shirsekar  |  Dec 10, 2019
दीपिकाच्या ‘छपाक’चा ट्रेलर पाहून परफेक्शनिस्ट आमिर खान म्हणाला…

बॉलिवूडची ‘शांती’ दीपिका पादुकोणचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिनेमा ‘छपाक’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. दीपिका पुन्हा एकदा दमदार भूमिका साकारताना दिसणार आहे. ट्रेलरमधील संवाद थेट मनाला भिडणार आहेत. ट्रेलर लाँचदरम्यान दीपिका अतिशय भावूक झाली होती. कार्यक्रमात दीपिकानं ‘छपाक’संदर्भातील अनुभव सांगण्यास सुरुवात केली तसं तिच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले आणि स्वतःला सांभाळणं तिला कठीण झालं. ‘मैंने सिर्फ इस पल के बारे में सोचा था कि आप सब लोग ट्रेलर देखेंगे फिर हमें स्टेज पर आना है लेकिन इसके बाद बोलना भी पड़ेगा, ये मैंने नहीं सोचा था. जब भी मैं ट्रेलर देखती हूं तो… ‘ हे सांगत असताना दीपिकाला रडू कोसळलं. 

(वाचा : पार्टनरचा हात पकडून चालण्याचे ‘हे’ हेल्दी फायदे आहेत माहिती)

‘छपाक’वर कौतुकाचा वर्षाव

ट्रेलर रिलीज झाल्यानंतर केवळ चाहत्यांकडूनच नाही तर बॉलिवूड कलाकारही दीपिकाच्या  अभिनयावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर सिनेरसिकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. सिनेमाची कहाणी सत्य घटनेवर आधारीत आहे. अॅसिड अटॅक पीडित तरुणी लक्ष्मी अग्रवालच्या संघर्षाची कहाणी आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सिनेमामध्ये दीपिका व्यतिरिक्त अभिनेता विक्रांत मेस्सीचीही प्रमुख भूमिका आहे. 

(वाचा : लतादीदींना 28 दिवसांनंतर मिळाला डिस्चार्ज, हॉस्पिटलमधील PHOTO VIRAL)

दरम्यान, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननंही ‘छपाक’ सिनेमाची स्तुती केली आहे. सिनेमाच्या ट्रेलरचं कौतुक करत आमिरनं ट्विट केलंय की,‘ट्रेलर अतिशय उत्तम आहे आणि हा सिनेमा अतिशय महत्त्वपूर्व आहे. माझ्याकडून खूप शुभेच्छा. गुड लक मेघना, दीपिका, विक्रांत,  फॉक्स आणि संपूर्ण टीम. लव्ह A’

TRAILER : ‘नाक नही है, कान नही है… झुमके कहाँ लटकाउंगी’

रिलीजपूर्वीच छपाक सिनेमामुळे दीपिका पादुकोण चर्चेत आहे. सिनेमाचा ट्रेलर World Human Rights Day म्हणजे 10 डिसेंबर रोजी रिलीज करण्यात आला. अॅसिड अटॅक पीडित तरूणीचं आयुष्य आणि तिच्या अस्तित्वावर संपूर्ण सिनेमा आधारित आहे. सिनेमाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे. 10 जानेवारी 2020 रोजी सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.  

(वाचा : कमालच! 2 वर्षांची चिमुकली गातेय लतादीदींचं गाणं, सोशल मीडियावर धुमाकूळ)

रणवीर सिंहचा आगामी सिनेमा ‘83’चीही उत्सुकता

भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार कपिल देव यांचाही बायोपिक लवकरच प्रदर्शित होणार आहे. अभिनेता रणवीर सिंह कपिल देव यांची भूमिका ‘83’ सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर साकारणार आहे.  ‘83’ या वर्ल्ड कपवर आधारित सिनेमा आहे. याचं चित्रिकरण पूर्ण झालं असून एप्रिल 2020 मध्ये हा सिनेमा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूडसह क्रिकेटप्रेमी देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटासाठी रणवीर केलेल्या कायापालटामुळे तो हुबेहुब कपिल देव यांच्यासारखाच दिसत आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्तानं रणवीर आणि दीपिकाची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

हे देखील वाचा :

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच  POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty  लिंकवर क्लिक करा. 

 

Read More From बॉलीवूड