मनोरंजन

’माँ की रसोई’च्या निमित्ताने एकत्र आले दिग्गज

Aaditi Datar  |  Jul 22, 2019
’माँ की रसोई’च्या निमित्ताने एकत्र आले दिग्गज

चांगल्या कामासाठी नेहमी चांगल्या व्यक्तींचा हातभार लागल्यावर ते काम एका वेगळ्याच उंचीवर पोचतं. असंच काहीसं झालं आहे गुजरातमध्ये खास पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या एका प्रोजेक्टबाबत. मुख्य म्हणजे या प्रोजेक्टमध्ये मराठीतील दिग्गजांचाही सहभाग आहे हे विशेष. 

काय आहे माँ की रसोई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील पहिलं न्यूट्रिशन पार्क गुजरात राज्यात तयार  होत आहे. हे पार्क खास लहान मुलांसाठी साकारलं जात आहे. या पार्कमध्ये मुलांसाठी म्हणून खास विविध स्टेशन असतील. या प्रत्येक स्टेशनवर मुलांची छोटी ट्रेन थांबून तिथे असलेल्या खेळ, दूधनगरी, फलाहार, विज्ञान अश्या विविध विभागांत त्या त्या संदर्भात मनोरंजनातून मुलांना माहिती दिली जाईल. 

मराठी दिग्गजांचा सहभाग

या सर्व विभागांसाठी क्रिएटीव्ह दिग्दर्शकाच्या आणि यातीलच एक महत्त्वाचा विभाग असलेल्या ’माँ की रसोई’साठी मराठी चित्रपट निर्माता-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी हिंदी गीत लिहिलं आहे. या गीताला प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलं आहे. तर हे गीत प्रसिद्ध गायिका आशाताई भोसले यांनी गायलंय. याबाबतची पोस्टही महेश टिळेकर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

50 वर्षांनंतर पुन्हा पुनरावृत्ती

महेश टिळेकर यांची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेल्या या गाण्यात ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान आजीच्या भूमिकेत आपल्याला पहायला मिळतील. ’पान खायो सय्या हमार’ हे प्रसिद्ध गाणे आशाताईंनी वहिदा रेहमान यांच्यासाठी गायले होतं..यावेळी पुन्हा एकदा ८६ वर्षांच्या आशाताई, ८२ वर्षांच्या वहिदा रेहमान यांच्यासाठी महेश टिळेकर यांनी लिहिलेल्या “माँ की रसोई ” या गीतासाठी तब्बल ५० वर्षांनंतर गाणार आहेत.

बर्ड फ्लू, चिकुन गुनियासाठी महेश टिळेकर यांनी काही वर्षांपूर्वी तयार केलेली गाणी खूप लोकप्रिय होऊन त्याची लिम्का बुक नॅशनल रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे.

हेही वाचा –

ऐकलीत का गायिका सावनी रविंद्रची नवी म्युझिकल सीरिज

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ कॉलेज डायरी चित्रपटात पाच वेगवेगळ्या भाषेतील गाणी

आनंदी गोपाळरावांच्या नात्याचा गोडवा संगीतातून उलगडला

Read More From मनोरंजन