मनोरंजन

आश्रम 3′ लवकरच, पुढे काय होणार याची उत्सुकता

Leenal Gawade  |  May 11, 2022
aashram 3

ढोंगी बाबा, त्याने वाढवलेले साम्राज्य, महिलांवर होणारे अत्याचार असा सगळ्याचा मिलाफ असलेली प्रसिद्ध अशी सीरिज म्हणजे ‘आश्रम’,लवकरच या सीरिजचा तिसरा भाग येणार आहे. नुकतीच याची माहिती देण्यात आली असून ओटीटीवर हा तिसरा भाग पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या सीझनमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत राहिली होती. आता तरी त्या सगळ्याची उत्तर मिळतील अशी प्रेक्षकांना अपेक्षा आहे. दरम्यान, पहिल्या दोन भागांमध्ये काय घडले आणि आता या नव्या सीझनमध्ये काय असणार आहे चला घेऊया जाणून

नवा सीझन नवी गुपीत

 आश्रमचा पहिला सीझन चांगलाच गाजला. बॉबी देओलने यामध्ये बाबा निरालाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेत तो लोकांना अधिक आवडला. पहिल्या भागात बाबा निराला, त्याचा आश्रम आणि त्याच्या गोष्टींमध्ये फसणारे कुटुंब दाखवण्यात आले. पण त्या घरातील मुलीला म्हणजेच पम्मीला अनेक गोष्टी अशा कळतात की तिला बाबाचे खरे रुप कळते. त्यामुळे तिचा लढा पहिल्या सीझनपासून सुरु होतो. दुसऱ्या सीझनमध्ये बाबा, राजकारण, खून अशा अनेक गोष्टी समोर येऊ लागतात. ज्यामुळे ही सीरिज अधिक रंजक होत जाते. आता दुसऱ्या भागाचा शेवट असा काय झाला आहे की, पुढे पम्मी बाबाचा उलगडा करु शकेल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या तिसऱ्या सीझनमध्ये अभिनेत्री ईशा गुप्ता देखील असणार आहे. 

मोशन पिक्चरनंतर चर्चा सुरु

बाबा निरालाच्या भूमिकेत बॉबी देओल

आश्रम ही सीरिज खूप गाजली असली तरी मधल्या काळात या बद्दल काहीच चर्चा नव्हती. पण या चित्रपटाच मुख्य भूमिका साकारणारा बॉबी देओल आणि ईशा गुप्ता यांनी याचे मोशन पिक्चर शेअर केल्यामुळे पुढच्या सीझनची उत्सुकता वाढणे अगदी साहजिक आहे. खूप जणांनी या पोस्ट खाली कमेंट करुन आपला उत्साह दाखवला आहे. ही सीरिज कधी रिलीज होणार आहे याबद्दल कोणताही खुलासा करण्यात आला नाही. ही केेवळ या सीरिजची झलक होती. कारण यामध्ये आश्रमची म्युझिक आणि 3 या आकड्यापलीकडे काहीही दिसत नाही. त्यामुळे थोडावेळ आपल्याला याची वाट पाहावी लागणार आहे.

ईशा गुप्ताच्या भूमिकेची उत्सुकता

एखाद्या सीरिजमध्ये नवा चेहरा येणार असेल तर तो चेहरा नेमका कोणत्या भूमिकेत येईल याची उत्सुकता असणे साहजिक आहे.  पण तिच्या या भूमिकेचा उलगडाही काही काळानंतरच होईल असे दिसत आहे. त्यामुळ थोडावेळ तरी आपल्याला पाहावी लागणार आहे.

पम्मीची भूमिका काय असणार

मालिकेत अभिनेत्री आदिती पोहनकर ही पम्मीची भूमिका साकारत आहे. पम्मीला बाबाचे रुप कळाले आहे. पण लोकांपुढे खरं आणण्यासाठी ती काय करणार? तिला कोणाची मदत मिळेल? आश्रममध्ये कोणाचा बळी जाईल? असे सगळे प्रश्न आहेत. आता पम्मी दिसली की, या सगळ्याचा उलगडा होईल. आदितीने यामध्ये साकारलेली भूमिका ही वाखाणण्यासारखी आहे. तिची भूमिका ग्लॅमरस मुळीच नाही. पण तरीदेखील ती त्या भूमिकेत सुंदर दिसत आहे. 

तुम्हाला आश्रमच्या नव्या कोऱ्या सीझनची उत्सुकता आहे की नाही?

Read More From मनोरंजन