ओटीटी प्लॅटफॉर्मवर बॉबी देओलच्या ‘आश्रम’या सीरिजने अवघ्या काही तासातच अनेकांना वेड लावले. आता या सीरिजचा दुसरा भाग रिलीज करण्यात आला आहे. या नव्या सीझनच्या निमित्ताने एका अभिनेत्रीने आपला अनुभव शेअर केला आहे. या सीरिजचा भाग असलेली अनुप्रिया गोयंका हिने आपला अनुभव शेअर केला असून अनेकांना यामुळे धक्का बसला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भोंदू आणि त्यांचे लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या घटनांना सीरिजच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न वादातित अशा ‘आश्रम’ सीरिजमधून करण्यात आला आहे. अभिनेत्री अनुप्रियासोबत नेमंक काय घडलं ? ते आता जाणून घेऊया.
रश्मि रॉकेट’साठी जोरदार मेहनत घेत आहे तापसी पन्नू, असा मेंटेन केला फिटनेस
अनुप्रियासोबत झाला अनुभव
अनुप्रिया गोयंका हिने वयाच्या 18 व्या वर्षी झालेला अनुभव शेअर केला आहे.तिने सांगितले की, त्यांचे कुटुंब एका अध्यात्मिक गुरुकडे जात होते. त्या बाबावर त्यांना फार विश्वास होता. तो अध्यात्मिक गुरु त्यांना अनेक चांगल्या गोष्टी सांगत होता. त्याच्यानुसार तिचे कुटुंब वागत होते. आपल्या जवळच्या व्यक्तिंपेक्षाही अधिक विश्वास या अध्यात्मिक गुरुवर असल्यामुळे सगळ्यांच्याच डोळ्यावर एक पट्टी होती. पण हा अति विश्वास ठेवणे त्यांना भारी पडले. कारण अनुप्रियावर वयाच्या 18 व्या वर्षी या अध्यात्मिक गुरुने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती खूपच घाबरुन गेली.आपण विश्वास ठेवलेली एखादी व्यक्ती अशी करु शकते यावर तिचा विश्वास बसत नव्हता. पण ती यातून बाहेर आली आणि तिने आपले आयुष्य पूर्ववत केले.. समजासाठी काहीतरी चांगले करण्याचा दावा करणाऱ्या या बाबांकडून अशी अजिबात अपेक्षा नसते आणि समाजही या सगळ्या घटनांवर विश्वास ठेवत नाही. अशा दृष्ट प्रवृत्तींना ठेचून काढत नाही. त्यामुळेच या घटना वाढत आहेत.
Bigg Boss 14 : राहुल वैद्यने केले या अभिनेत्रीला प्रपोझ, लग्नाची घातली मागणी
अनुप्रियाने साकारली डॉक्टरची भूमिका
अनुप्रिया ही सीरिजचा पहिल्यापासूनच भाग आहे. एका कणखर डॉक्टरची भूमिका तिने साकारली आहे.आजुबाजूला घडणाऱ्या अन्यायाच्या आणि अत्याचाराच्या घटना पाहून त्याच्या मुळाळी जाण्याचा प्रयत्न ती करताना यामध्ये दिसली आहे. पोलिसांना मदत करत ती या बाबाला सुळावर चढवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे अगदी पहिल्या भागापासून ती यामध्ये चांगलीच उठून दिसत आहे. आता या दुसऱ्या सीझनमध्ये या बाबाचा कशापद्धतीने पर्दाफाश करणार आहे ते पाहावे लागणार आहे.
बॉबी देओलने साकारली उत्तम भूमिका
बॉबी देओलने कायमच हिरो आणि चांगली भूमिका साकारली आहेच. पण व्हिलनच्या भूमिकेत तो पहिल्यांदाच दिसला आहे. अध्यात्मिक गुरुची भूमिका साकारताना त्याने त्यामधील अनेक पैलू बाहेर काढले आहेत. त्यामुळे बॉबीची भूमिका ही अधिक उठून दिसली. ज्यावेळी याचा पहिला भाग आला त्यावेळी बॉबी ही भूमिका कशी करु शकेल किंवा त्याला हा अभिनय जमेल की नाही असे वाटले होते. पण बॉबी देओलने ही भूमिका फार उत्तम पद्धतीने केली. पहिल्या भागातील त्याचा अभिनय चांगला दिसल्यानंतर आता दुसऱ्या भागात नेमकं काय होणार आहे आणि त्याचा बाबाचा हा प्रवास अधिक दाखवला जाणार आहे.
जर तुम्ही आतापर्यंत ही सीरिज पाहिली नसेल तर आताच तुम्ही ही सीरिज पाहा. कारण तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळेल.
Laxmii:अक्षय कुमार आणि शरदच्या अभिनयाचा उत्तम मेळ, तरीही साथऊथला दिली नाही टक्कर
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje