‘रंग माझा वेगळा’ मधील तनुजा अर्थात अभिज्ञा भावे लग्नबंधनात अडकत आहे. अभिज्ञा आणि मेहुलच्या मेंदी कार्यक्रमाचे आणि ग्रहमकाचे फोटो अभिज्ञाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यानंतर मराठी इंडस्ट्रीतील तिच्या मित्रमैत्रिणींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. या आठवड्यात अभिज्ञा आणि मेहुल लग्नगाठ बांधत आहेत. काही महिन्यांपूर्वीच साखरपुड्याचे फोटो शेअर करत अभिज्ञाने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. तर आता हे वर्ष आपल्यासाठी अत्यंत आनंददायी असल्याचे सांगत तिने आपल्या लग्नाच्या रितीरिवाजांना झालेली सुरूवात म्हणून फोटो शेअर करत आपला आनंदही व्यक्त केला होता. सध्या तिच्या मेंदीचे आणि ग्रहमकाचे फोटो व्हायरल होत आहेत.
एक था टायगर’फेम दिग्दर्शकाने गुपचूप उरकले लग्न, फोटो व्हायरल
अभिज्ञाची मनमोहक अदा
अभिज्ञाचे अनेक चाहते आहेत. खुलता कळी खुलेना या मालिकेतून नकारात्मक भूमिका साकारून अभिज्ञाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तुला पाहते रे असो अथवा आता रंग माझा वेगळा असो अभिज्ञा आपली व्यक्तिरेखा अचूक साकारते. इतकंच नाही तर चला हवा येऊ द्या या रियालिटी शो मधून तिने आपल्या कॉमेडीचीही झलक दाखवून दिली आहे. अभिज्ञा आता लग्नाच्या बेडीत अडकत आहे. अभिज्ञाने आपल्या कुटुंब आणि मित्रमैत्रिणींसह मेंदीच्या सोहळ्यात मजा केलेली दिसून येत आहे. तिने स्वतः यातील काही फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. अभिज्ञाच्या मनमोहक अदा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. अतिशय आनंदी दिसणारी अभिज्ञा मेहुलच्या प्रेमाच्या रंगात रंगली आहे हे नक्कीच. अभिज्ञाचा स्वतःचा फॅशन ब्रँड असल्यामुळे तिची स्टाईल नेहमीच वेगळी दिसून येते. पिवळ्या रंगाचा टॉप, रंगबेरंगी लाँग स्कर्ट आणि फ्लोरल ज्वेलरी असा अभिज्ञाचा मेंदी लुक चाहत्यांना आवडला आहे. टिपिकल लुक न ठेवता तिने तिच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे मेंदी लुक केला. इतकंच नाही तर तिने तिच्या लग्नाला #nohashtagwedding असंही म्हटलं आहे. तिच्या या कार्यक्रमांना तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी उपस्थिती लावली होती. अभिज्ञा आणि मेहुल गेले काही वर्ष एकमेकांना डेट करत होते आणि आता लग्नबंधनात अडकत आहेत असं सांगण्यात येत आहे.
सैल पडलेली त्वचा होईल टाईट, ट्राय करा जुही परमारचं ब्युटी सिक्रेट
हळदीने सजली नवराई
अभिज्ञाचे हळदीचे फोटोही व्हायरल होत आहेत. एकंदरीतच अभिज्ञाने आपल्या नव्या आयुष्याची सुरूवात नव्या वर्षात धमाकेदार केली आहे. तिची स्टाईल आणि तिच्या अदा सर्वच चाहत्यांना आवडत आहे. आता लग्नात अभिज्ञाचा लुक कसा असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण अभिज्ञा नेहमीच काहीतरी नवं करत आली आहे. साडी असो वा वेस्टर्न वेअर असो अभिज्ञाचा लुक नेहमीच खास असतो. तेजस्विनी पंडीतसह तेजाज्ञा हा ब्रँड अभिज्ञा चालवत आहे. केवळ अभिनेत्री नाही तर एक यशस्वी उद्योजिका असल्याचेही अभिज्ञाने सिद्ध केले आहे. अभिज्ञाच्या लाघवी स्वभावामुळे तिला इंडस्ट्रीमध्येही अनेक मित्रमैत्रिणी आहेत. त्यामुळे लग्नाच्या आधीपासूनच अनेकांच्या घरी तिची केळवणही झाली आहे आणि त्याचेही फोटो अभिज्ञाने शेअर केले होते. अशीही लाडाची नवरी बोहल्यावर चढत आहे. तिला तिच्या भावी आयुष्यासाठी POPxo मराठीकडून भरभरून शुभेच्छा.
कपिल शर्माच्या घरी दुसरी गुड न्यूज, नाही थांबा कपिलने केला खुलासा
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade